गांधी आणि त्यांचे टीकाकार साधना प्रकाशनाच्या या पुस्तकात 18 लेख आहेत, गांधीजी आणि सावरकर व
Read More
गांधी आणि त्यांचे टीकाकार साधना प्रकाशनाच्या या पुस्तकात 18 लेख आहेत, गांधीजी आणि सावरकर व हिंदुत्ववादी, गांधीजी आणि आंबेडकर, गांधीजी आणि क्रांतिकारक, गांधीजी आणि गोखले व टिळक मार्क्सवादी व समाजवादी, जिना व फाळणी, सरदार वल्लभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाष चंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, विल्सन चर्चिल, रवींद्रनाथ टागोर, टॉलेस्टाई अशा विविध व्यक्तींचे गांधीजींच्या विचारांशी असलेले संबंध या पुस्तकात प्रामुख्याने मांडण्याचा सुरेश द्वादशीवार यांनी प्रयत्न केला आहे. महात्मा गांधींवरील टीकाकारांची टीका, त्या टीकेमागील त्यांची भूमिका, त्या टीकेतले खरे-खोटेपण सांगणे आणि त्या टीकाकारांना कमी न लेखता ते सांगणे या उद्देशाने लिहिलेले हे पुस्तक आहे
गांधीजींचा गौरव थांबून त्यांची उणीदुणी काढणे सुरू झाले आहे. देशाचे नवे सत्ताधारी व त्यांचे प्रचारक व हस्तक, गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लोकलढा आणि त्यात केलेले बलिदान पुसून टाकायला निघाले आहेत. गांधी हा राष्ट्रपिता जणू आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. टिकेमागील भूमिका, त्याचा खरेखोटेपणा तपासातुन इ. गोष्टी तपासून पाहिल्या आहेत. गुंतागुंतीच्या अनेक प्रश्नांतून टीकेच्या बाबत स्पष्ट स्वरूप मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे विविध अंगाने आकलन करण्यासाठी सुरेश द्वादशीवार आपल्याला या पुस्तकात नवीन आणि वेगळी दृष्टी देऊ पाहतात.
द्वादशीवार गांधीजी सोबत टिळक, गोखले यांचा तुलनात्मक अभ्यास मांडतात तर त्यांचे गूढ उलगडताना कस्तुरबा आणि गांधीजींच्या वाट्याला आलेल्या स्वातंत्र्याचा देखील उहापोह करतात. गांधीजी आणि टागोर यांच्यातील राष्ट्रवादाच्या संकल्पनेतील वैविध्य मांडत असताना गांधीजी व टॉल्स्टॉय यांची देखील तुलना केली आहे. सर्वात रंजक आणि मजेशीर मांडणी आहे. ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्या संघर्षातील या दोन नेत्यांच्या एकमेकांवरील प्रभावाची चर्चा आपल्याला इथे वाचायला मिळेल. गांधीजी आणि नेताजी सुभाष, मार्क्सवादी, जिना, अबुल कलाम आझाद याच बरोबर विस्टन चर्चिल यांच्यावर देखील स्वतंत्र लेखन या पुस्तकात आहे. गांधीजींना वेगळ्या, त्यांच्या टीकाकारांच्या नजरेतून कसे पाहता येईल आणि सगळ्या विविध भूमिका कश्या लक्षात घेता येतील यावर हे पुस्तक प्रकाश टाकते. शेवटी दोन ओळीत लेखकाने स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे तो म्हणतो- हे लेखन… यातली भूमिका तटस्थ नाही, ती सत्याच्या अधिकाधिक जवळ राहण्याची आहे. हे पुस्तक राज्यशास्त्राचे,इतिहास आणि तत्वज्ञानाच्या विद्यार्थी व अभ्यासकासाठी मोठी ठेव आहे.
लंडन शहरातील भारतीयांची सभा इंडिया हाऊस मध्ये आयोजित झालेली होती. सभेचे मुख्य वक्ते होते सावरकर आणि तिच्या अध्यक्षस्थानी होते गांधीजी तीच त्यांची पहिली भेट ही होती कार्यक्रमाच्या ठरल्या वेळेआधी काही मिनिटं सावरकर सभासस्थानी आले. सावरकर आणि गांधी या दोन बॅरिस्तरांच्या वागण्यातील हे अंतर सगळ्यांना अचंबित करून गेलेलं होतं आणि कार्यक्रम सुरू झाला. सावरकरांनी त्यांच्या भाषणात गोदंड दारी रामाची गौरव गाथा त्यांच्या वक्तृत्व पूर्ण शैलीत सगळ्यांना ऐकवली. दुष्टजणांचा त्यांना केलेला नाश रावणाचा वध वालीचा अंत आणि यज्ञकार्यात अडथळे आणणाऱ्या राक्षसांचा बंदोबस्त इत्यादी इत्यादी सीतामाईच्या सुटकेसाठी रामानं केलेली पराक्रमाचे सार्थ आणि त्याला मिळालेली सुग्रीव आणि हनुमंताचा सेनेची जोड वगैरे सगळं नंतरच्या अध्यक्षीय भाषणात गांधींनी प्रजाहित दक्षरामाची कथा सांगितली. प्रजेच्या कल्याणासाठी समाधान सुखासाठी संवेदनशील असलेला रामराजा हा आपला आदर्श असल्याचा ते म्हणाले भारतात येणारे स्वराज्य तशा रामराज्यासारखा असावं असंही त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणात रामाचं धनुष्य किंवा त्याचा टणक कारण होता त्यांना प्रजेच्या केलेल्या सेवेची वडिलांच्या पाळलेल्या आज्ञाची आणि लक्ष्मणा मार्फत रावणाकडून समजून घेतलेल्या राजधर्माची गोष्ट होती सावरकर आणि गांधी यांच्यात नुसते मतभेद नसून प्रकृतीभेद आहेत. सावरकरांनी हिंदूंचा सैनिकीकरण करण्याची घोषणा करून भारतीय तरुणांना इंग्रजी फौजेत सामील होण्याच आवाहन केलं धर्माच्या नावावर गांधींनी देशाचा होऊ घातलेल्या फाळणीला विरोध करणारी भूमिका घेतली. 1925 पर्यंत हिंदू आणि मुसलमान दोन वेगळी राष्ट्र आहेत अशी सर सय्यद अहमद यांच्या पातळीवर जाणारी भूमिका घेणारे सावरकर हे हिंदूंचं राष्ट्र आहे असं म्हणत गांधींवर मात करण्याचा प्रयत्न करू लागले. प्रत्यक्ष पाणी झाली तेव्हा मात्र त्यांनी आणि त्यांना मानणाऱ्या महाराष्ट्रातील त्यांच्या अनुयायांनी फाळणीच्या पापाचा खापर गांधींच्या माथ्यावर फोडलं आणि तसा प्रचार केला मात्र त्यांनी किंवा त्यांचा नेतृत्वातील हिंदू महासभेने फाळणीविरुद्ध इंग्रज विरोधी न होता गांधीविरोधी बनली. गांधीजी 1909 च्या जुलै महिन्यात लंडनला आले दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या कैपीयती सरकार समोर मांडणं हा त्यांच्या लंडन भेटीचा हेतू होता हे मूल्य मानणाऱ्या गांधींना तरुणाईतला सशस्त्र उत्साह मानवणारा नव्हता. दक्षिण आफ्रिकेत जाताना गांधींनी त्यांचे हिंद स्वराज्य हे महत्त्वाचं छोटे खणी पुस्तक बोटीवरच लिहिलं त्यात त्यांनीही मॅझिनीवर लिहिलेलं आहे मात्र त्यात मॅझिनीच्या शस्त्रधारी पराक्रमाची महती नाही. मॅझिनी त्यांनी रंगवलेला आहे हा फरकही सावरकर आणि गांधी यांच्या दृष्टिकोनातलाच नाही तो त्यांच्यातील प्रकृतीभेदाचे दर्शन घडवणार, युद्ध आणि शांतता सशस्त्र लढा आणि आयुष्यात सत्याग्रह आणि सेनापती आणि संत यात असावं तेवढं अंतर या दोन प्रकृतीमध्ये आहे. दुसऱ्या गोलमेज परिषदेत देशाचे एकमेव प्रतिनिधी म्हणून त्यांनी इंग्रज सरकारशी वाटाघाटी केलेल्या होत्या सावरकरांचा त्याग आणि त्यांना अनुभवाव्या लागलेल्या यातना महाराष्ट्र वगळता देशाच्या फारशा चर्चेत नव्हत्या त्यांच्या पाठीशी राष्ट्रीय पातळीवरचा कोणताही पक्ष आणि संघटना नव्हती शिवाय स्वतःला क्रांतिकारी म्हणून घेणाऱ्यांचे गटही विखुरले आणि क्षीण झालेले होते.
गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’ (साधना प्रकाशन) हे पुस्तक वाचले. सुरेश द्वादशीवार यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत सदर पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकातून जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, जीना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर व इतर तत्कालीन नेत्यांचे जीवन, कार्य, स्वभाव, सामर्थ्य, मर्यादा व गांधीजींशी त्यांच्या असलेल्या संबंधांवर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. अनेक ग्रंथ, पत्रव्यवहार, डायऱ्या यांचा अभ्यास करून, आवश्यक तेथे त्यातील संदर्भ दिलेले आहेत. या पुस्तकाच्या वाचनाने गांधींजीच्या संदर्भातील अनेक गैरसमज दूर होतील आणि ज्या महापुरुषाने आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी व देशातील सामान्य माणसाच्या उद्धारासाठी खर्ची घातले. भारतातील विविध जाती-धर्मामध्ये शांतता, सौहार्द, बंधुभाव निर्माण व्हावा, यासाठी हौतात्म्य पत्करले. जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा लोकलढा जगाच्या इतिहासातील आजवरच्या सर्वात मोठ्या साम्राज्याविरूद्ध पुकारला व तो यशस्वी करून दाखविला, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल.
Show Less