Original Title
मेंदूची मशागत
Subject & College
Publish Date
2024-01-01
Published Year
2024
Publisher, Place
Total Pages
212
ISBN 13
789348458148
Language
मराठी
Readers Feedback
मेंदूची मशागत
मेंदूची मशागत या बहुचार्चित आणि डोकी नांगरणाऱ्या प्रेरणादायी पुस्तकाचे लेखक देवा झिंजाडनी या पुस्तकात लहानपणी गरीब परिस्थितीमुळे खडतर प्रवास करताना कशा प्रकारे अडीअडचणीतून वाट काढत...Read More
प्रा.राहुल ठवाळ
मेंदूची मशागत
मेंदूची मशागत या बहुचार्चित आणि डोकी नांगरणाऱ्या प्रेरणादायी पुस्तकाचे लेखक देवा झिंजाडनी या पुस्तकात लहानपणी गरीब परिस्थितीमुळे खडतर प्रवास करताना कशा प्रकारे अडीअडचणीतून वाट काढत परिस्थितीवर मात करून एक आदर्श उभा केला आहे. तरूणाईसाठी जर उद्देश साध्य करायचा असेल तर मोबाईल बाजूला सारून अभ्यासासाठी रात्रंदिवस मेहनत, कष्ट घेतले पाहिजे यासाठी उपदेश केला आहे.
मेंदूची मशागत या पुस्तकाचे वाचन केल्यावर देवा झिंजाड सरांनी लहानपणापासून वाचन केल्याने त्यांचे लिखाण, शब्दरचना, ग्रामीण भागात आजपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी काबाडकष्ट करून वेगवेगळे अनुभव आल्याने तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या बोलीभाषेचा इत्यंभूत वापर करण्याची हातोटी,कला त्यांच्या नसानसात भिनलेली आहे व म्हणूनच ते अतिशय मार्मिक लिखाण करू शकतात.मी मात्र लिखाण व वाचन यापासून कोसोदूर होतो.
ग्रामीण स्त्री ही शेतातील सर्व समस्यांवर कशी मात करते, स्त्री ही समाजाचा कणा आहे.ती मातीतून ज्ञानेश्वरी फुलवते, इतकी कणखर आहे.तसेच सतत वाचन केल्यावर आकलन शक्ती वाढते, मनाची शक्ती प्रगल्भ होते, माणसाला समृद्ध करण्याचे माध्यम व आत्म्याची मशागत करते हे पटवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे.
देवा सरांनी गरीब परिस्थितीवर कसे शिक्षण घेतले याचे उदाहरण म्हणजे सरांनी अक्षरशः निवडणुकीच्या काळात प्रचार करतांना हॅंडबील गावात वाटण्यासाठी देतात,ते सरांनी अर्धेच वाटून बाकीच्यांचे घरीच दाभणाने शिवून वह्या तयार करून अभ्यास करण्यासाठी उपयोग केला.यासाठी आईने पण मदत केली.आई सतत शिक्षण घेण्यासाठी मदत करत असे म्हणून सरांनी आईला सावित्रीबाई हे नाव दिले आहे.
देवा झिंजाड त्यांची लेखनशैली वाचकाला सहजपणे कथेच्या आत ओढते. अगदी सोप्या भाषेत लिखाण केले आहे.
सध्या नवीन पिढी कामधंदा सोडून अक्षरशः फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हाट्सअपच्या आहारी गेली आहेत.फ्लेक्समुळे होणारे वाईट परिणाम, सहनशीलतेचे प्रयोग या लेखाचा झालेला परिणाम उदाहरणासह वर्णन केले आहे.
मोबाईलमुळे समाज वाचनाकडे दुर्लक्ष करत आहे, तंत्रज्ञान हे साधन आहे, ध्येय नाही हे तंतोतंत पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.
शेवटी मेंदूची मशागत या पुस्तकाचे वाचन केल्यावर सध्या समाजात काय काय चुकीचे घडते आहे व त्यावर काय उपाय करू शकतो, याबाबत अगदी तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन लिखाण करून मार्गदर्शन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.खरच समाजात जर जागृती निर्माण झाली तर बरेच रितीरिवाज व तरूणाई सुधारेल.
