अंतः अस्ति प्रारंभः

By Vaibhav Dhus

Share

Availability

available

Original Title

अंतः अस्ति प्रारंभः

Publish Date

2024-01-01

Published Year

2024

Publisher, Place

Total Pages

149

ISBN

978-8197418310

Format

Paperback

Country

India

Average Ratings

Readers Feedback

अंतः अस्ति प्रारंभः
Vikram dahare

Vikram dahare

×
अंतः अस्ति प्रारंभः
Share

Ok

अंतः अस्ति प्रारंभ

Review By Prof Pravin Khade, Baburaoji Gholap College, Pune अंतः अस्ति प्रारंभः” हा एक महत्वाचा आणि तात्त्विक विचार आहे जो आपल्याला जीवनातील विविध घटनांचा आणि...Read More

Prof Pravin Khade

Prof Pravin Khade

×
अंतः अस्ति प्रारंभ
Share

Review By Prof Pravin Khade, Baburaoji Gholap College, Pune
अंतः अस्ति प्रारंभः” हा एक महत्वाचा आणि तात्त्विक विचार आहे जो आपल्याला जीवनातील विविध घटनांचा आणि स्थितींचा, वर्तमान परिस्थितीचा विचार करायला लावतो. या विचाराचा अर्थ असा आहे की, जिथे एक गोष्ट संपली आहे असे आपल्याला वाटते, तिथूनच दुसऱ्या गोष्टीची नवीन सुरुवात होते. जीवनात होणारा प्रत्येक अंत काहीतरी नवीन बदलाची सुरुवात घडवतो. संभाव्य परिवर्तनाची चाहूल देतो.
उदाहरणार्थ, जेव्हा एका व्यक्तीचे शालेय शिक्षण संपते, तेव्हा त्याच्या जीवनातील एक नवीन अध्याय म्हणजे महाविद्यालयीन जीवन सुरू होते. तसेच, एखाद्या नोकरीचा किंवा कामाचा समारोप होताना, एक नवीन संधी आपल्यासमोर येते. जीवनातील प्रत्येक घटनेचा प्रवास असतो एक सुरुवात एक मध्यवर्ती का आणि एक शेवट. परंतु हा शेवट म्हणजे अंतिम नाही, आंत नाही . तर तो एक नवीन प्रवासाचा प्रारंभ असतो. प्रत्येक संकट,आव्हान ,किंवा पराभव यामध्ये नवीन काहीतरी शिकण्याची आणि अनुभवाची सुरुवात असू शकते याचे उत्तम उदाहरण आहे. लेखकाने तरुण पिढीतील विद्यार्थ्यांच्या मनातील संकटांना कसं सामोरे जाणे त्याची मार्ग सांगितले आहेत. जीवनातील अपयशांच्या क्षणात “अंत”म्हणून पाहणे हा मर्यादित दृष्टिकोन असू शकतो. यामुळेच”अंत: अस्ति प्रारंभ:”हा विचार आपल्याला नेहमीच पुढे पहाण्याची प्रेरणा देतो. आपण कोणतीही स्थिती अंत म्हणून पाहू नये, तर त्या क्षणाचे एक नवे पाऊल म्हणून स्वागत करावे. या विचारांमध्ये एक पारदर्शकता आहे. आपल्याला शिकवते की, प्रत्येक घटना, अनुभव आणि घडामोडी जीवनाच्या एका मोठ्या प्रवाहाचा भाग आहेत. आयुष्य म्हणजे एक सतत चालणारी यात्रा आहे, ज्यात प्रत्येक अंत आणि प्रारंभ या एका साखळीतील दोन वेगवेगळ्या कडे आहेत. शेवट हीच सुरुवात या विचारधारेच अजून एक महत्त्वाचा अंग म्हणजे परिवर्तन आणि पुनर्जन्म होय. जीवनातले एखाद्या घटनेचा शेवट म्हणजे संपला नाही तर त्यातून काहीतरी नवीन उगम पावण्याची शक्यता असते. म्हणजेच एखादी नोकरी, नातं किंवा जीवनातील एखादा टप्पा संप होतो तेव्हा सुरुवातीला खूप दुःख होते, पण त्यातून नवीन संधी आणि अनुभव येतो. या विचारधारेला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर, आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक शेवट आला एक नवीन संधी म्हणून स्वीकारू शकतो. त्यामुळे, बदल घडवून आणण्याची आणि स्वतःला नव्याने घडवण्याची प्रेरणा मिळू शकते यामुळे आपल्या संकट आणि आव्हान यांच्याशी अधिक आत्मविश्वासाने सामना करता येतो.
गुलामी नाहीतर राज्य करायला शिकवणारी पुस्तक अंत असती प्रारंभ the end is a beginning. शेवट हीच खरी सुरुवात असते आपण लढलो पडलो हरलो तरी आपला शेवट झाला असे नसते. एखाद्या क्षेत्रात अपयश आले तर आपण संपलो असे नसते. पुन्हा उठायचे पुन्हा लढायचे त्याच टाकते ना त्याच जमाने त्याच जोश, पण लढायचे कसे आणि घडायचे कसे, या सर्व गोष्टींचा सार सांगणारे पुस्तक म्हणजे अंत असती प्रारंभ. परिस्थिती पुढे गुडघे टेकून स्वाभिमान घाण ठेवण्यापेक्षा मृत्यू जरी समोर ठरला. तरी लढण्याचा समाधान हे हारण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. हेच लढायला आणि घडायला शिकवणारे पुस्तक या स्पष्ट करणे अखंड महाराष्ट्राला आपल्याशी करून घेतले. संगतसूत्र व्हायला शिकवणारे पुस्तक आपल्या चुका सुधारवायला शिकवणारे पुस्तक अंत असती प्रारंभ म्हणजेच जिथून शेवट होतो तिथूनच नवीन गोष्टींची सुरुवात होते म्हणतात ना देव सुद्धा दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा कधीच बंद करत नाही याचाच एक उत्तम उदाहरण लेखकाने या पुस्तकाच्या माध्यमातून अनेकांच्या मनातील चालत असलेला संवाद पुस्तकाद्वारे प्रदर्शित केला आहे

Submit Your Review