शिरसाट प्रीती प्रकाश, वर्ग - अकरावी कला , रा. ब. नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर, जि. आहिल्यानगर
Read More
शिरसाट प्रीती प्रकाश, वर्ग – अकरावी कला , रा. ब. नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर, जि. आहिल्यानगर
पुस्तकाचे नाव : पोरका बाबू , लेखक- रामकृष्ण जगताप
प्रस्तावना:
पोरका बाबू ही चरित्रात्मक ग्रामीण कांदबरी, एका प्राध्यापकाची जीवन संघर्ष गाथा आहे. उंदीरगावसारख्या ग्रामीण भागामध्ये बाबूचा जन्म होतो. छोटा बाबू गरिबीवर मात करून कठीण परिस्थितीतून कष्टाने मार्ग काढतो. एका अतिउच्च शिखरापर्यंत पोहोचणाऱ्या संघर्ष विराची ही कथा आहे. पुस्तकाची शैली ही ग्रामीण मायबोलीतून आहे. सदर पुस्तके वास्तव घटनावर आधारित आहे. कथेतील मुख्य पात्र बाबू आणि त्याची आई भामा हे आहेत. कथेतील बाबू हा नायक आहे. हे पुस्तक आवडण्याचे कारण , लेखकाने वर्णन केल्याप्रमाणे, “ पोरका बाबू” वाचताना अनेक प्रसंगाने कळत नकळत डोळे भरून आले. काल्पनिक कथा कादंबऱ्यापेक्षा वास्तव लिहिलेले दिसून आले. कथा सरळ अंतर्मनाला भिडते. बाबूची संपूर्ण जीवनशैली , त्यांनी केलेली अपार कष्ट या कथेतून दिसतात.
सारांश :
कथा ही वर्णनात्मक आहे, कथेमध्ये आई आणि मुलगा यांच्यातील अतूट प्रेमाची ही वास्तव कहाणी आहे. गरिबी, वडीलाचे अकाली निदान त्यामुळे विधवा स्त्रीची झालेली घालमेल, त्या अनुषंगाने मुलाची झालेली परवड. आई अशी का वागते हे न समजलेले कोड? त्यामध्ये मुलाची झालेली हेंडसाळ, त्यावर विजय मिळवणारा बापू होय. आपल्या लाडक्या पोटच्या बाळाला आई सोडून जाते हे न उलगडणारे कोड बाबुला उमगत नाही?. आई आणि मुलांमध्ये असणारे प्रेम, माया, अतूट नातं हे सर्व सोडून आई कुठे गेली? का गेली ? कशी असेल आई? अशा अनेक प्रश्नांनी निर्माण झालेला गुंता होय. सदर पुस्तकाला डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी समीक्षा दिली आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे “पोरकाबाबू म्हणजे कुटुंबाचे सगळे पाश तुटलेला ग्रामीण युवकाची चित्रकथा आहे. शिक्षण घेण्यासाठी धडपडणारा बाबू आपल्या संयमी वृत्तीने, कठोर परिश्रमाने, प्रांजळपणाने माणसे जोडतो. अनेकांच्या घरी पडेल ते कष्ट शोषित बाबूचा बाबूराव कसा होतो. याची लेखकाने केलेली गुंफण भावणारी आहे. जीवनातील अनेक विविध समस्या, समाजातील अज्ञान, गरिबी, उपासमार, कष्ट आणि जगण्यातील अगतिकचे दर्शन ही येथे प्रकर्षाने घडते.”
कथेतील पात्र:
मुख्य पात्र आई-भामाबाई , मूलगा बाबू ही आहेत. खलनायक मामा – मुरली, मामी, काका, काकू. मोठा- भाऊ कामू , आईला आधार देणारे ब्राह्मणकाका – काकू, बाबूला आधार देणारे देशमुखबाई , छल्लाणी कुटुंब , प्रा. व्ही. जी. कसबेकर सर, चांभारबाबा व मित्र सुरेश इ . होय.
विश्लेषण :
लेखकाने वर्णनात्मक पद्धतीने सदर कथेची विवेचन केले आहे. भामाबाई आणि बाबू या मुख्य भूमिका या ठिकाणी स्पष्ट होतात. भामाबाई या विधवा, अशिक्षित आहेत,त्या कष्टाळूआहेत. त्यांना अज्ञानामुळे सक्षम असा निर्णय घेता येत नाही नवरा वारल्यामुळे जीवनाची घडी बसवण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे दिसते. समाज काय म्हणेल ? यापोटी त्या अपमान सहन करू शकत नाही. घरातून निघून जातात , भामाबाईचा भाऊ मुरली या ठिकाणी खलनायकाच्या भूमिकेमध्ये दिसतो . बहिणीच्या नवऱ्याचे अवेळी झालेले निधन. त्यानंतर बहिणीने नवीन संसार थटण्यासाठी केलेला प्रयत्न, तो त्याला सहन होत नाही. बाबूची आई म्हणते की शिक्षण हे श्रीमंताचे काम आहे. ते आपले काम नाही, आपण गरीब आहोत. ही त्यांच्या मनातील धारणा चांभारबाबा दूर करतात. कथेमध्ये अनेक गुंता गुंती आहेत . गरिबी आहे, लोकांचे धुनी आहेत. पुस्तक वाचताना कथेतील पात्र हे पूर्ण सजीव वाटतात लेखकाने अतिशय योग्य पद्धतीने प्रत्येक पात्राला योग्य न्याय दिला आहे. लेखकाने बाबू या पात्र योग्य न्याय दिला आहे .
वैयक्तिक विचार :
सदर कथा ही आपली आहे अशी वाटते. पात्राशी आपण एकरूप होऊन जातो. सदर कथेतून ग्रामीण जीवनाची दर्शन होते. गरिबीत, हालअपेष्टा शोषितांचे जीवन लक्षात येते.
निष्कर्ष :
हे पुस्तके प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचावे असे आहे. जीवनामध्ये संघर्ष काय असतो ?, संघर्ष कसा करावा लागतो?, दोन वेळेची भाकरीसाठी किती काबाडकष्ट करावे लागतात?. लेखकाने वर्णन केल्याप्रमाणे” बाबूने हे दाखवून दिले की गरिवी ही तुमच्या ध्येयाच्या आड येत नाही. आड येते… ती तुमची मानसिकता, कारण ज्याची आई सातव्या वर्षी पोराला सोडून गेली आहे… त्या आईसाठी व्याकूळ झालेला बाबू… ज्याला घरदार नाही… ज्याला कोणत्याच नातेवाईकाने आधार दिला नाही. एवढेच नव्हे , तर ज्याचा भाऊ शिक्षणाच्या आड यायचाः बळजबरीने मजुरीच्या कामाला पाठवायचा गुराढोरासारखा मारायचा… त्याने गाढ़बाबरोबर कामे केली. जोगाच्या घरी पाणी भरलं… भांडी घासली… घरगडी म्हणून राहिलाः पण शाळा शिकता बाबू बऱ्याच वेळा रडला, पण तो रडत बसला नाही. त्याने हरेक संकटाचा सामना केला. संकट हरत गेली, आणि बाबू जिंकत गेला. बाबूच्या आयुष्यात मंदाकिनी आल्यावर त्याचा पोरकेपणा संपला” या कादंबरीमधून दिसून येतो. पुस्तकाला मी पाच पैकी पाच रेटिंग देऊ इच्छिते.
Show Less