रॉबर्ट कियोसाकी हे अमेरिकन उद्योजक, गुंतवणूकदार, आणि लेखक आहेत. त्यांनी आर्थिक साक्षरतेचा प्रसार
Read More
रॉबर्ट कियोसाकी हे अमेरिकन उद्योजक, गुंतवणूकदार, आणि लेखक आहेत. त्यांनी आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी Rich Global LLC आणि Rich Dad Company स्थापन केली. कियोसाकी यांची पुस्तके आणि व्याख्याने आर्थिक स्वातंत्र्य, गुंतवणूक, आणि वैयक्तिक वित्तीय शिक्षण यावर आधारित आहेत.
मराठी अनुवाद अभिजित थिटे यांनी केलेला आहे.
रॉबर्ट कियोसाकी यांनी हे पुस्तक लोकांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी लिहिले आहे.
श्रीमंत होण्यासाठी खूप उत्पन्न हवे हा गैरसमज दूर होतो.
घर हि मालमत्ता आहे या समजाला आव्हान देईल.
“पैशासाठी काम न करता, पैशाला आपल्यासाठी काम करायला शिकवा” हा मुख्य विचार मांडला आहे.
मुलांना भावी आर्थिक यशासाठी पैशाबद्दल काय शिकवावे, हे यातून समजते.
पैशाचे व्यवस्थापन करून आपण श्रीमंत कसे बनू हेच यात सांगितले आहे.
पुस्तक लेखकाच्या जीवनातील दोन प्रमुख व्यक्तींवर आधारित आहे:
1. Poor Dad (गरीब वडील): लेखकाचे जन्मदाते
वडील, ज्यांनी चांगले शिक्षण घेतले, परंतु पारंपरिक दृष्टिकोनाने जगत राहिले.
2. Rich Dad (श्रीमंत वडील): लेखकाचे मार्गदर्शक ज्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून पैसे कमावण्याचे तंत्र शिकवले.
श्रीमंत कसे व्हावे व असलेली मालमत्ता कशी टिकवावी ,पैशाला योग्य प्रकारे कमावणे व सांभाळणे आणि त्यातून अनेक संपत्ती निर्माण करणे गरजेचे असते. या पुस्तकातून लेखक रॉबर्ट टी.कियोसाकी यांनी सुरुवातीला आपले जन्मदाते वडील म्हणजे Poor Dad आणि आपले मार्गदर्शक,मित्र माईकचे वडील (Rich Dad) यांच्या पैशाच्या विषयीअसलेल्या दृष्टिकोनाविषयी तुलना केल्याचे या पुस्तकात दिसून येते.
Poor Dad हे खूप शिकलेली व सकारात्मक विचारांचे प्रोफेसर आहेत,तर Rich Dad हे फक्त आठवी शिकलेले परंतु त्यांचे पैशाचे विचार विस्तृत आहे.
लेखक म्हणतात की Rich Dad सदैव पैसा कसा निर्माण करावा याचे विचार करायचे दोन्ही वडिलांकडून शिकण्यासारखे खूप काही आहे . Poor Dad पैसा कसा वाचवायचे , Rich Dad पैसा कसा गुंतवायचे हे सांगतात नववर्षाचे असताना ठरवले की त्यांनी कडून पैशाची व्यवस्था पण शिकायचे आणि त्यांना पैशाची व्यवस्थापन तीस वर्षापर्यंत शिकवले देखील.
लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी या पुस्तकात सहा प्रकरणांमध्ये पैशाची व्यवस्थापन तसेच मालमत्ता संवर्धन याविषयी महत्त्वाचे विवेचन केल्याचे दिसून येते
*श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाही तर ते पैशाला त्यांची कामे करायला लावतात. श्रीमंत लोक हे पैशातून मालमत्ता निर्माण करतात यामध्ये रियल स्टेटस, स्टॉक मार्केट असेल इ. ठिकाणी गुंतवणूक करून ते पैसे मिळतात. कारण गरीब लोक हे पैसे मिळवण्यासाठी काम करतात आणि मिळवलेला पैसा खर्च करतात व पुन्हा पैशासाठी काम करतात. ही एक प्रकारची रॅट रेस त्यांच्या आयुष्यात असते .याने फक्त गरजा पूर्ण होतात परंतु संपत्ती निर्माण होत नाही .त्यामुळे त्यांनी या रॅट रेस मधून बाहेर यावे आणि पैशासाठी काम न करता पैसा कामाला लावा.
*आर्थिक साक्षरता असावी. पैसा नसल्याचे खरे कारण म्हणजे लोकांना मालमत्ता आणि उत्तरदायित्व फरक कळत नाही श्रीमंत लोक मालमत्तेतून पैसा का म्हणतात तर गरीब लोक फक्त उत्तरदायित्व (कर्ज)यासाठी पैसा कमावतात. मालमत्ता पैसे कमावून देते तर दायित्व तुमच्या खिशातून पैसे काढून घेतात श्रीमंत लोक नेहमी आपली मालमत्ता वाढविण्याचा प्रयत्न करतात तर गरीब किंवा मध्यमवर्गी लोक आपला पैसा खर्च करण्याचा प्रयत्न करतात आणि जास्त पैसा जरी आला तरी आणखीन खर्च केला जातो. यामध्ये उपभोगासाठी किंवा चैनीच्या वस्तूसाठी ते खर्च करतात वेळी प्रसंगी कर्ज देखील काढतात ( उदा. गाडी,सोने इ.)
परंतु श्रीमंत लोक आपले पैसे मालमत्ता विकत घेण्यात लावतात त्यांचा पैसा अशा ठिकाणी गुंतवतात की जिथे त्यांना चांगला परतावा मिळेल. उदा. स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड, रियल इस्टेट इ.
नवीन घर विकत घेणे हे मालमत्ता आहे की उत्तरदायित्व हे लोकांना कळत नाही. लोक घर विकत घेताना त्याला मालमत्ता संपत्ती समजतात .परंतु हे घर एक दायित्व यआहे कारण घरावर आपला खर्च होत असतो. परंतु हेच घरात जर भाडेतत्त्वाने दिले तर त्यातून तुम्हाला उत्पन्न मिळेल व हेच घर तुम्हाला पैसा कमावून देईल हाच श्रीमंत होण्याचा मार्ग आहे घरासाठी लावलेला पैसा हा तुम्हाला काम न करता पैसा देईल असे लेखकाचे म्हणणे आहे. श्रीमंत लोक आपल्या मुलांना पैशाचे व्यवस्थापन शिकवतात .
*आपल्या कामाशी काम ठेवा अनेक लोक आपल्या नोकरीचे प्रामाणित राहून नोकरी करतात परंतु यातून ती फक्त आपल्या मालकाला सीमंत बनवत असतात आपण नोकरी करीत असताना देखील या व्यतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग शोधले पाहिजे. यासाठी त्यांनी मॅकडोनाल्ड या कंपनीचे उदाहरण दिलेले आहे. मॅकडोनाल्ड चा मला फक्त खाद्यपदार्थ विकून श्रीमंत झालेला नाही नाहीतर त्यांनी आपल्या मालमत्तेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणीरियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून तो श्रीमंत झाल्याचे दिसून येते. त्यामुळे नोकरी व्यतिरिक्त देखील इतर उत्पन्नाची मार्ग मध्यवर्ग यांनी शोधले पाहिजे.
*टॅक्स चा इतिहास आणि कॉर्पोरेशनची ताकद:
या प्रकरणामधील लेखकाने कराचा इतिहासाबद्दल सांगितलेले आहे. कर लागताना सरकार गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी कमी करण्यासाठी लावतात ,म्हणजे सुरुवातीला कर हा फक्त श्रीमंत लोकांवरच लागला जायचा व या करातून गरीब लोकांना सोयीसुविधा पुरविल्या जायच्या व त्यांच्यावर खर्च केला जात होता. पण कालांतराने मध्यम वर्गीय लोकांवर देखील कर लागला जाऊ लागला आहे ,यामध्ये देखील श्रीमंत लोक टॅक्स किंवा कर कसा कमी करता येईल हे पाहतात, कर कमी करण्याचा किंवा वाचविण्याचा प्रयत्न करतात . प्रथम श्रीमंत लोक पैसा कमवतात त्यात त्यांच्या गरजा इच्छा पूर्ण करतात व थोडासा पैसा उरतो त्यातून ते कर भरतात. पण मध्यम वर्गीय लोक हे कर आधी भरतात नंतर आपल्या गरजा,उपभोगावर खर्च करतात. कर मध्यमवर्गीय लोकांना मालमत्तेत गुंतवणूक न करता फक्त कर्ज काढलेले हप्ते भरणामध्ये ते खुश असतात. आज सरकारी तिजोरी मध्ये जो कर जमा होतो तो फक्त मध्यमवर्गीय लोकांचाच असतो.
यावरून लेखक सांगतात की श्रीमंत व्हायचे असेल तर कोणतीही संधी सोडू नका पैसे कमविणे सदैवच चालू ठेवा.
*शिकण्यासाठी काम करा पैशासाठी शिकू नका.
लेखकाच्या poor Dad चे शिकणे सर्व काही होते कोणतीही कल्पना जेव्हा आपण शिकतो त्यातून ज्ञान घेतो आणि अंमलात आणतो. तेव्हा ती यशस्वी होते. लेखकाने आपल्या जीवनात अनेक काम केले त्यामुळे त्यांना अनेक अनुभव आले प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्ञान मिळत गेले म्हणून फक्त एका महिन्याच्या उत्पन्नासाठी काम करू नका तर वेगवेगळ्या क्षेत्राची माहिती घ्या कौशल्य शिका, आणि श्रीमंत व्हा . श्रीमंत लोक वेतन, रिअल इस्टेट, शेअर्स , इत्यादी मध्ये गुंतवणूक करून पैशाची व्यवस्थापन करतात.
*नवीन कौशल्य नवीन कौशल्य शिकल्याने देखील आपले व्यवसायात वाढ होत जाते. श्रीमंत लोक हे सारखे काही ना काही नवीन शिकत असतात ते शिकवणे थांबवत नाहीत व या सवयीमुळे त्यांना कळून येते की आपली वस्तू जगासमोर कशी मांडायची,आणि त्यातून कशाप्रकारे पैसा मिळवायचा.
लेखकाची लेखनशैली साधी, सरळ आणि संवादात्मक आहे. कियोसाकी यांनी सोप्या उदाहरणांद्वारे जटिल आर्थिक संकल्पना समजावल्या आहेत. त्यांची भाषा प्रेरणादायक असून वाचकाला कृती करण्यासाठी प्रवृत्त करते.
‘मालमत्ता विरुद्ध कर्ज’ हा स्पष्ट आणि मार्गदर्शक दृष्टिकोन पुस्तकाला वेगळेपण देतो.
भावी आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, यशासाठी काय करावे हे सांगते.
रोजच्या आर्थिक व्यवहारांवर लागू होणारे सल्ले आणि मार्गदर्शन दिले आहे.
पैशाचे व्यवस्थापन, शिक्षण शाळेतच मिळेल हा समज चुकीचा ठरेल.
आर्थिक साक्षरतेसाठी सुरुवातीचे मार्गदर्शन प्रभावी आहे.व्यावहारिक उदाहरणे आणि अनुभव यामुळे विषय समजायला सोपा झाला आहे.
काही सल्ले सर्व परिस्थितींना लागू होणार नाहीत, विशेषतः जोखीम घेण्याचे प्रोत्साहन.
गुंतवणुकीतील तांत्रिक माहितीची उणीव जाणवते.सर्व व्यक्तींना योग्य गुंतवणुकीचे मार्ग मिळतातच असे नाही.
श्रीमंत होण्यासाठी खूप उत्पन्न मिळवावे लागतील हा समज दूर होतो.
तरुण वाचक, उद्योजक, गुंतवणुकीत सुरुवात करू इच्छिणारे, आर्थिक साक्षरतेत सुधारणा करू इच्छिणारे लोकांना नक्कीच फायदा होईल.
मालमत्ता तयार करणे, कर्ज व्यवस्थापन कसे, करावे व्यावसायिक दृष्टिकोन कसा असावा आणि आर्थिक निर्णय घेण्याचे महत्त्व आयुष्यात किती असते.याची जाणीव होते.
हे पुस्तक आयुष्यात एकदा तरी वाचायला हवे कारण यातून आर्थिक व्यवस्थापन, आर्थिक शिस्त ,आणि आर्थिक साक्षरता समजून येते.. लेखकाने मांडलेले विचार प्रेरणादायी आहेत, आणि ते वाचकाला स्वतःच्या आर्थिक व्यवस्थेबद्दल विचार करायला लावतात.
मी हे पुस्तक प्रत्येकाला वाचण्याची शिफारस करेन, ज्यांना आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये आर्थिक शिस्त हवी.विशेषतः ज्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे आहे. या पुस्तकाचा दुसरा भाग ( Rich Dad cash flow quadrant guide to financial freedom) देखील प्रकाशित आहे.(300पृष्ठे व व तीन भावात विभाजित आहे.
Rich Dad Poor Dad हे केवळ आर्थिक पुस्तक नसून, आर्थिक स्वातंत्र्याचा दृष्टीकोन विकसित करणारे प्रेरणादायी मार्गदर्शन आहे.लेखकाने सुलभ भाषेत महत्त्वाच्या आर्थिक संकल्पना मांडल्या आहेत, ज्यामुळे वाचकाला नवी दिशा मिळते. हे पुस्तक आपल्याला शिक्षण, पैसे, गुंतवणूक, आणि संपत्ती यांच्याबद्दल नव्या दृष्टिकोनातून विचार करायला लावते.
Show Less