Subject & College
Publish Date
2011-12-08
Published Year
2011
Publisher, Place
Format
Soft Cover
Language
Marathi
Average Ratings
Readers Feedback
God Shevat
गोड शेवट हे साने गुरुजींच्या अत्यंत लोकप्रिय आणि हृदय कथासंग्रहातील एक सुंदर उदाहरण आहे. या पुस्तकामध्ये साने गुरुजींनी जीवनातील विविध पैलूंना सहज, साध्या भाषेत समजावले...Read More
Bhalerao Om Ganesh
God Shevat
गोड शेवट हे साने गुरुजींच्या अत्यंत लोकप्रिय आणि हृदय कथासंग्रहातील एक सुंदर उदाहरण आहे. या पुस्तकामध्ये साने गुरुजींनी जीवनातील विविध पैलूंना सहज, साध्या भाषेत समजावले आहे. प्रत्येक कथेत मानवी भावना, समाजातील विविधता, नीतिमूल्ये आणि आयुष्यातील महत्त्वाचे धडे यांचा समावेश आहे.
साने गुरुजींना त्यांच्या कथांमध्ये सहजतेने जीवनाच्या गोड आणि दुःखद दोन्ही गोष्टी दाखवण्याची कला अवगत होती ” गोड शेवट ” या कथेत त्यांनी अशी एक गोष्ट मांडली आहे. त्यामुळे वाचकाला जिवणाच्या शेवटच्या क्षणामध्येही गोडवा आणि आशा दिसू लागते.
पुस्तकाचे शालेय वाचण्यासाठी विशेष महत्त्व आहे, कारण ते विद्यार्थ्यांना जीवनाचे महत्त्व, सत्य आणि सद्गुन शिकवते. कथा मर्मस्पर्शी असून त्यातून, प्रगल्भ विचार आणि मानवतेला संदेश मिळतो. साने गुरुजींच्या लेखनाची शैली साधी आणि सोपी आहे, जी वाचकांना सहज समजते “गोड शेवट” हे पुस्तक वाचल्यावर एक प्रकारची शांती आणि समाधान मिळते. “गोड शेवट” हे साने गुरुजींचे एक असामान्य कार्य आहे, त्यात जीवनातील विविध तत्व आणि गोड अनुभव वाचकांना दिले आहेत हे पुस्तक वयोमानानुसार वाचण्यासाठी योग्य आहे, कारण त्यात जीवनाच्या गोड आणि दुःखद दोन्ही अंगांचा समावेश आहे. या पुस्तकात लेखकाने जीवनाच्या विविध अंगावर सुसंगत विचार मांडले आहेत. गोड शेवट म्हणजे जीवनाच्या शेवटी आपल्याला जे आत्मिक सुख आणि शांतता मिळते ती एक अत्यंत गोड अनुभूती आहे अशी भावना या पुस्तकात व्यक्त केले आहे.
पुस्तकाची संकल्पना मुख्यतः आपल्या जीवनातील चढ-उतार संघर्ष आणि त्यातून मिळणारी शिकवण यावर आधारित आहे. लेखकाने व्यक्त केलेल्या विचारांनी वाचकाला आत्मसात केले आहे विचार करायला प्रवृत्ती केले. पुस्तकाच्या शैलीमध्ये साधेपणा आणि गोडपणा दोन्ही आहेत ज्यामुळे वाचन करताना वाचक सहजपणे लेखकांच्या विचारांमध्ये रमतो शेवटी गोड शेवट ही एक सुंदर प्रेरणादायी आणि जीवन शक्ती प्रदान करणारी कथा आहे. जी प्रत्येक वाचकाला एक नवीन दृष्टिकोन आणि जीवन जगण्याची दिशा दाखवते.
संपूर्ण पुस्तकाचं भावनिक टोन स्वतः भाषेतून दिलेले संदेश आणि त्यातील सकारात्मक वाचकाच्या मनावर स्थायी ठरते हे पुस्तक प्रत्येक वाचकाला एक उज्वल जीवन जगण्याची प्रेरणा देणार आहे.
