Availability
available
Original Title
Subject & College
Publish Date
2024-01-01
Published Year
2024
ISBN
978-81-964937-3-8
Country
India
Language
Marathi
Average Ratings
Readers Feedback
बिनपटाची चौकट
Review By सौ.नाईकवडी तेजस्विनी, Baburaoji Gholap College, Pune आतापर्यंत खूप पुस्तके वाचली पण माझ्या मनात कायम घर करून राहिलेले आत्मचरित्र म्हणजे 'बिनपटाची चौकट' हे लेखिका...Read More
सौ.नाईकवडी तेजस्विनी
बिनपटाची चौकट
Review By सौ.नाईकवडी तेजस्विनी, Baburaoji Gholap College, Pune
आतापर्यंत खूप पुस्तके वाचली पण माझ्या मनात कायम घर करून राहिलेले आत्मचरित्र म्हणजे ‘बिनपटाची चौकट’ हे लेखिका इंदूमती जोंधळे यांचे आत्मचरित्र नुकतेच वाचनात आले. हया पुस्तकातील ‘बिनपटाची चौकट’ ही अशी चौकट आहे. निराशेच्या वेळेस आशेचा किरण दाखवणारी ही चौकट दोन खांबांवर उभी आहे एक खांब ऋणतेचा आणि दुसरा क्रूरतेचा! या खांबांवर इंदूचे आयुष्य आकाराला आले आहे. बिनपटाची चौकट म्हणजे इंदूच्या संघर्षाची, जबाबदारीची, सुखदुःखाची, सहनशीलतेची, आत्मनिर्भरतेची चौकट आहे.
आईच्या अकाली निधनाने अवघ्या सहा वर्षाच्या इंदूवर तीन भावंडांची जबाबदारी येते. कारण वडिलांच्या रागीट स्वभावामुळे आईचा मृत्यू होतो. आणि इंदुमतीच्या वडिलांना जेल होते. येथूनच इंदूचा संघर्ष सुरू होतो. या आत्मकथनामध्ये कुठेही आक्रोश नाही. भडकपणा नाही. अतिशय शांतपणे लेखिकेने आपल्या दूरदशेचे चित्रण केले आहे. यामध्ये काळीज पिळवटून टाकणारे प्रसंग आहेत. सहा वर्षाच्या लहान वयातच लेखिकेवर तिच्या पेक्षा लहान भावंडांची पडलेली जबाबदारी आणि वाचकांचे मन हेलावून टाकणारे लिखाण आहे. वाढते वय, भावंडांच्या ताटातूट, भेटीची ओढ सहा महिन्याच्या (मुन्नी) बहिणीचा कुपोषणाने मृत्यू आणि आयुष्यात आलेले अपाट कष्ट, चारित्र्याला आव्हान देणारे प्रसंग यांचे चित्रण आहे. अनाथालयात राहत असताना शिक्षणाबरोबर अनुभवांची पायरी चढत असताना त्या सांगतात आई, वडील आणि घर नसलेल्या इंदूला अपार माया लावणारी नाती मिळाली आयुष्याला वळण देणारी माणसेही मिळाली. आपल्या या परिस्थितीला वडील कारणीभूत असताना या कथेमध्ये कोठेही वडिलांबद्दल द्वेष किंवा अपशब्द वापरलेला नाही. विवाह नंतर प्रारंभीच्या यातना आणि नंतर सुखाचे दिवस हे प्रसंग वाचकांना अंतर्मुख करतात.
अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आत्मचरित्र म्हणजे इंदुमती जोंधळे यांचे ‘बिनपटाची चौकट’ हे होय. इंदुमती जोंधळे यांची ‘बिनपटाची चौकट’ यातनामय परिक्रमेचा नितळ आविष्कार आहे.
