Availability
available
Original Title
फकिरा (FAKIRA)
Subject & College
Publish Date
2018-01-01
Published Year
2018
Publisher, Place
Total Pages
145
Format
Paperback
Country
INDIA
Language
MARATHI
Average Ratings
Readers Feedback
समाज परिवर्तनाचा दृढ विचार मांडणारी कादंबरी
फकिरा ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. ही कादंबरी इ.स. १९५९ साली प्रकाशित झाली. इ.स. १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला. अण्ण भाऊ साठे यांच्या इतर कादंबऱ्यांप्रमाणेच, संघर्ष...Read More
साळवे वैभव संतोष
समाज परिवर्तनाचा दृढ विचार मांडणारी कादंबरी
फकिरा ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे.
ही कादंबरी इ.स. १९५९ साली प्रकाशित झाली. इ.स. १९६१ मध्ये महाराष्ट्र
सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला.
अण्ण भाऊ साठे यांच्या इतर कादंबऱ्यांप्रमाणेच, संघर्ष हा फकिरा या
कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे. या कादंबरीला वि.स. खांडेकरांची प्रस्तावना
आहे. प्रस्तावनेत ते म्हणतात, अण्णा भाऊंना प्रतिभेचे देणे आहे. जीवनात आग
ओकणाऱ्या हर तऱ्हेच्या गोष्टींचा अनुभव त्यांना आहे. त्यांच्या मनात एक प्रकारचा
पीळ आहे आणि शोषणाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा तो पूजक आहे.या
कादंबरीच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊ साठे सांगतात ,"ही कादंबरी केवळ माझ्या
प्रतिभेने निर्माण केली नाही. प्रतिभेला सत्याचे – जीवनाचे दर्शन नसेल, तर
प्रतिभा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत, असा माझा अनुभव आहे. सत्याला
जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते.
जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते, तद्वतच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे
आवश्यक असते आणि अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल, तर आपण का
लिहितो याचा पत्ताच लागणे शक्य नाही. हा ‘फकिरा’ही माझा होता. जे पाहिले,
अनुभवले, ऐकले तेच मी लिहिले आहे. त्यातून हा फकिरा निर्माण झाला
आहे."फकीरा ही कादंबरी अनेक दृष्टींनी महत्त्वाची आहे .ग्रामीण, प्रादेशिक,
दलित ,ऐतिहासिक कादंबरी म्हणून जशी ती महत्त्वाची आहे तशी ती एक उपेक्षित
नायकाचे बंडखोर जीवन समाजासमोर आणणारी कादंबरी म्हणूनही महत्त्वाची
आहे.फकीरा ही कादंबरी अनेक दृष्टींनी महत्त्वाची आहे .ग्रामीण, प्रादेशिक, दलित
,ऐतिहासिक कादंबरी म्हणून जशी ती महत्त्वाची आहे तशी ती एक उपेक्षित
नायकाचे बंडखोर जीवन समाजासमोर आणणारी कादंबरी म्हणूनही महत्त्वाची
आहे.फकिराचे बंड सामाजिक न्यायाची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन येत
असल्यामुळे त्याचे जगणे त्याचा संघर्ष हा व्यवस्था परिवर्तनाचा इतिहास ठरणार
आहे .अण्णाभाऊंच्या या फकीरा कादंबरी मध्ये नैतिकतेचे वेगळेच अधिष्ठान
आपल्याला पाहायला मिळते.
फकीरा
विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती नाव - सोनवणे स्नेहा अंबादास अकरावी सायन्स पुस्तकाचे नाव - फकीरा लेखक - अण्णाभाऊ साठे लेखक अण्णाभाऊ...Read More
सोनवणे स्नेहा अंबादास (अकरावी सायन्स)
फकीरा
विद्या प्रतिष्ठानचे
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती
नाव – सोनवणे स्नेहा अंबादास अकरावी सायन्स
पुस्तकाचे नाव – फकीरा
लेखक – अण्णाभाऊ साठे
लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीला मराठी साहित्यात मानाचे पान लाभले आहे मराठी कादंबरीच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अण्णाभाऊंची फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊ जे लिहितात ते त्यांनी भोगलेले असते त्यांच्याविषयी ते लिहितात ती सारी त्यांची माणसे असतात फकीरा राधा विष्णुपंत इत्यादी सर्व व्यक्ती अण्णाभाऊंच्या साक्षात परिवारातल्या आहेत तळागाळातील उपेक्षित वंचित माणसा आणि त्यांची सुखदुःख चित्रित करण्यात अण्णाभाऊ रंगून गेलेले त्यांच्या कथाकार्यातून जगण्यासाठी लढणाऱ्यांच्या शौर्यगाथा वाचायला मिळतात ही माणसं अन्यायाविरुद्ध लढतात सतत झुंजतात आणि प्रसंगी प्राण अर्पणही करतात त्यांची मानव मूल्यावर श्रद्धा ढळत नाही इंग्रज सत्तेला आव्हान देणारा फकीरा आणि त्यांची शौर्यगाथा सांगताना अण्णाभाऊ सारखा नोकरशाही या उपेक्षित माणसाची तेजरची प्रतिमा सादर करतात कलादृष्ट्या श्रेष्ठ ठरलेल्या या कादंबरीला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन तर गौरविलेच पण फकीराचे भारताचे भाषांबरोबर रशियन झेक पोलीश जर्मन या भाषांतही अनुवाद झाले आहे
फकीरासारख्या झुंजार माणसाची कथा डॉक्टर आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अण्णाभाऊंनी अर्पण केली यात केवढे औचित्य आहे राज्य सरकारने प्रथम पारितोषक देऊन गौरवलेली कादंबरी कैफियत फकीरा विषयी थोडं सांगावं म्हणून लिहीत आहे ते असं की ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेने निर्माण केली नाही प्रतिमेला सत्याचं जीवनाचे दर्शन नसेल तर प्रतिमा अनुमती वगैरे शब्द निरर्थक आहेत असा माझा अनुभव आहे कारण सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिमा अंधारातील आरशाप्रमाणे निरोपयोगी ठरते मग कितीही प्रयत्न करत त्यात प्रतिबिंबित दिसत नाही आणि कल्पकता निर्मल होते अगदी पंख विरहित पाखरा प्रमाण ती उडूच शकत नाही मी तरी अशी भरावी मारण्यात भलताच जड आह
जशी प्रतिमेला वास्तवाची गरज असते तत्वताच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते आणि अनुमतीला सहानभूतीची जोड नसेल तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागत नाही.
ही कादंबरी आजची नाही ती एक प्रकारची ऐतिहासिक कादंबरीच आहे ऐतिहासिक म्हणजे शिवाजी तानाजी केव्हा अशोकचंद्र गुप्त यांच्या काळातली नव्हे इंग्रजी अंमल प्रस्थापित झाल्यानंतर या शतकात आरंभी दक्षिण महाराष्ट्रातल्या खेडेगावच्या परिस्थितीचा विशेषता एका खेड्या गावातल्या मांग जमातीचा आणि तिच्यातल्या शूर बाबलेखाचे चित्रण करणारी कादंबरी आहे वारणेच्या खोऱ्यात लिही कादंबरी अण्णाभाऊ स्वाभाविकच आहे त्यांचे बालपण याच खोऱ्यात गेला आहे आणि ज्या जमातीचे 50 60 वर्षांपूर्वीच चित्रण त्यांनी केला आहे तिच्यातच त्यांचा जन्म झाला आहे प्रत्येक लिहीत लेखक कळत नकळत आत्मचरित्राचा उपयोग करीत असतो लहानपणी पाहिलेल्या ऐकलेल्या परंपरेने चालत आलेल्या आणि मनावर खोल संस्कार करून गेलेल्या अनेक गोष्टी ललित लेखनात प्रतिबिंबित होत असतात आपण अण्णाभाऊ या नियमाला काही अपवाद नाहीत अशी नामांकित कादंबरी मला वाचण्यास मिळाली हे माझं भाग्यच आहे.
फकिरा
फकिरा- अण्णा भाऊ साठे अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य नाव असून, ते एक क्रांतिकारी विचारांचे साहित्यिक होते. त्यांच्या साहित्यात कामगार, शेतकरी, दलित,...Read More
प्रा. डॉ.बापू देवकर
फकिरा
फकिरा- अण्णा भाऊ साठे
अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य नाव असून, ते एक क्रांतिकारी विचारांचे साहित्यिक होते. त्यांच्या साहित्यात कामगार, शेतकरी, दलित, आणि शोषितांच्या व्यथा, वेदना व संघर्ष यांचे प्रभावी दर्शन घडते. अण्णा भाऊ साठे यांनी कादंबऱ्या, कथा, लोकनाट्ये आणि लावण्यांच्या माध्यमातून समाजाच्या दुःखाला वाचा फोडली आहे.
“फकिरा” ही अण्णा भाऊ साठे यांची गाजलेली व पुरस्कारप्राप्त कादंबरी आहे. ही कादंबरी शोषितांच्या संघर्षमय जीवनाचे प्रतिबिंब आहे. दलित समाजातील एका शूर व कणखर व्यक्तिमत्त्वाची, फकिराची ही कथा आहे. ही कथा केवळ एका व्यक्तीची नाही, तर ती संपूर्ण समाजाच्या संघर्षाची व अस्मितेची कथा आहे.
फकिरा ही कादंबरी एका गरिब, शोषित, परंतु स्वाभिमानी तरुणाची गोष्ट सांगते. फकिरा हा समाजातील अन्यायाविरोधात आवाज उठवणारा व बंड करणारा युवक आहे. त्याच्या जीवनप्रवासात त्याला अनेक संघर्षांना सामोरे जावे लागते. कादंबरीत ब्रिटिशकालीन शोषण, जातीय व्यवस्थेचा अन्याय, आणि सामाजिक विषमतेचा वेध घेतला आहे.
फकिराचा संघर्ष हा समाजातील गरिब व दलितांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या समाजाच्या उद्धारासाठी त्याने केलेला त्याग व संघर्ष पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे. त्याची व्यक्तिरेखा कणखर, परंतु हळव्या मनाची आहे.
1. सामाजिक विषमता: कादंबरीत समाजातील विषमता व शोषण यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
2. ब्रिटिशकालीन पार्श्वभूमी: कादंबरीत तत्कालीन सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे चित्रण आहे.
3. फकिराचा संघर्ष: त्याचा संघर्ष फक्त स्वतःसाठी नसून समाजाच्या उद्धारासाठी आहे.
4. साहित्यिक शैली: अण्णा भाऊ साठे यांची लेखनशैली प्रवाही, रसपूर्ण व प्रभावी आहे.
5. कथा वाचकाला अंतर्मुख करते व त्याला शोषितांच्या व्यथा समजून घेण्यास भाग पाडते.
6. अण्णा भाऊ साठे यांची साधी व प्रवाही भाषा कथेचे आकर्षण वाढवते.
“फकिरा” ही केवळ एक कथा नाही, तर ती एक प्रेरणा आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद व स्वाभिमान जपण्याचा संदेश ती देते.
“फकिरा” ही कादंबरी समाजातील शोषितांच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी आहे. अण्णा भाऊ साठे यांचे हे अमूल्य साहित्य समाजाला नवी दिशा देणारे व प्रेरणा देणारे ठरते. हे पुस्तक केवळ वाचकाचे मनोरंजन करत नाही, तर त्याला विचार करण्यास भाग पाडते.
“फकिरा” हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे, कारण ते केवळ साहित्य नाही, तर समाजाच्या बदलासाठीचे एक क्रांतिकारी साधन आहे.
फकिरा संघर्ष
नावः पशिक काशिनाथ पाईकराव वर्ग:-TYBCA(SCI) पुस्तकाचे नावः फकिरा पुस्तकाचे लेखकः अण्णाभाऊ साठे फकिरा हि कादंबरी अण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणाचे सर्वोत्तम उदाहरण वा त्यांची स्वातंत्र्य लढ्याची...Read More
पशिक काशिनाथ पाईकराव
फकिरा संघर्ष
नावः पशिक काशिनाथ पाईकराव
वर्ग:-TYBCA(SCI)
पुस्तकाचे नावः फकिरा
पुस्तकाचे लेखकः अण्णाभाऊ साठे
फकिरा हि कादंबरी अण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणाचे सर्वोत्तम उदाहरण वा त्यांची स्वातंत्र्य लढ्याची वृत्ती चे प्रतिबिंब दाखवणाऱ्या लेखणीचा भाग आहे.
हि कादंबरी फकिरा नावाच्या दलीत युवकाच्या आयुष्यातील अडचणी आणि त्याची जिद्द त्याचे धैर्य यांची आहे. फकिरा दलीत जरी असला तरी जो अन्यायाला झुकत नाही आणि आपल्या हक्कांसाठी संघर्ष करतो. फकिरा हे पात्र फक्त एका व्यक्तीचे प्रतिबिंब नसून, शोषित वर्गाच्या वेदनांचे आणि त्यांच्या उठावाचे प्रतीक आहे.
कथेतील पात्र तेव्हाच्या तत्कालीन परिस्थितीची जाणीव करून देतात फाकिराचे कुटुंब त्याविरुद्ध ची लढाई दाखवीत असतात. कथेतली पात्रे त्याकाळचे विविध धर्म जात त्यांतील संघर्ष, दलितांवरील अन्याय त्यांचे लढे जे परप्रांतीय सोबत नसून देशातील च नीच मानसिक वृत्ती सोबत आहे
फकिरा हा नायक केवळ दलितांचा प्रतिनिधी नाही, तर संपूर्ण समाजातील शोषित, गरीब आणि वंचित वर्गाचा आवाज आहे.
कादंबरीत देशभक्तीची भावना वेगळ्या पद्धतीने मांडली आहे. इथे देशभक्तीचा अर्थ फक्त परकीय सत्ता विरुध्द लढण्यापुरता मर्यादित नाही, तर देशातील जातीय विषमता, शोषण आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याला जोडलेला आहे. फकिरा समाजाला स्वातंत्र्य, समानता आणि न्याय मिळवून देण्याचा ध्यास घेतो. त्याचा संघर्ष केवळ वैयक्तिक नाही, तर संपूर्ण समाजासाठी आहे, त्यामुळे त्याची देशभक्ती ही अधिक मोठी आणि अर्थपूर्ण ठरते.
ही कादंबरी आजही समाजासाठी महत्त्वाची आहे कारण ती सामाजिक विषमतेचे आणि त्यातील तत्वांचे दर्शन घडवते. जातीयवाद, शोषण आणि असमानता ही आजही समाजात अस्तित्वात आहेत, आणि फकिराचा संघर्ष त्याविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देतो. फकिरा ही केवळ एका युगापुरती मर्यादित कथा नाही, तर ती मानवतेच्या सार्वत्रिक हक्कांसाठी लढण्याचा संदेश देते. अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या लेखणीतून एका शोषित वर्गाचा आवाज जगापर्यंत पोहोचवला, जो आजही तितकाच सजीव आणि प्रभावी आहे आणि त्या घटकांना लढण्याचे आव्हान करतो जे स्वतः साठी लढू बघतात ज्यांना अन्याय फोडून काढायचाय..
एक उपेक्षित लोकनायक
Ingle Komal Shivhari, S. Y. M. Pharmacy, MVP’s College of Pharmacy, Nashik कादंबरी: फकिरा लेखक: अण्णाभाऊ साठे आण्णाभाऊ साठे यांनी लिहलेली एक उत्कृष्ठ कादंबरी. फकिरा...Read More
Ingle Komal Shivhari
एक उपेक्षित लोकनायक
Ingle Komal Shivhari, S. Y. M. Pharmacy, MVP’s College of Pharmacy, Nashik
कादंबरी: फकिरा लेखक: अण्णाभाऊ साठे
आण्णाभाऊ साठे यांनी लिहलेली एक उत्कृष्ठ कादंबरी.
फकिरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी एका सत्यघटनेवर लिहिली आहे. त्यांची शब्द रचना मराठी साहित्यात एका वेगळ्याच शैलीची जाणीव करून देते. भाऊंच लिखाण पाण्यासारखं नितळ, आपोआपच लोकांच्या मनात घर करून जाणारी साधीसरळ भाषा मनाला मोहून टाकते.
फकिरा’ कादंबरीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे सामाजिक एकीकरण, संस्कार, राष्ट्रधर्म, राजकीयव्यवस्था, प्रेम अशा मूल्यांची पेरणी करताना दिसतात. याचबरोबर दिनदलितांचे हीन जीवन, सहिष्णुता, लढवय्येपणा, राष्ट्रीय कर्तव्य या मूल्यांची ही शिकवण देतात म्हणून ‘फकिरा’ सामाजिक व राष्ट्रीय उदात्त व उन्नत भावनेने ओतप्रोत भरलेला लेख ठरतो.
ही कादंबरी असली तरी सत्यघटनेवर आधारित आहे म्हणून अण्णाभाऊंच्याच शब्दात सांगायचं म्हणजे त्यांनी कुठेही कल्पनेचे पंख लावून उड्डाण केलेले नाही .
कादंबरी वाचताना मी एखादा सिनेमा बघत आहे आभास मला होत होता. कादंबरीची शब्ब्दरचना इतकी सोपी आहे जवळपास प्रत्येक ओळ डोळ्यात मावत होती. असं वाटायचं कि आता पुस्तक संपवूनच उठाव मधेच सोडल्यामुळं पुढे काय होईल हा विचार करून माझं पूर्ण लक्ष त्याकडेच लागलेलं असायचं व रात्री कधी जाऊन एकदा मी वाचायला सुरवात करते असं मला होत असायचं.
शुद्र म्हणून हिनवलेल्या फकीरा नावाच्या पात्रावर हि कादंबरी सांगते. समाजामध्ये त्यावेळेस असलेल्या रूढी परंपरेवर हि पूर्ण कथा अधोरेखित केली असल्यामूळ त्याकाळात जे जे हाल या समाजाला सोसावे लागले व त्याकाळात घडत असलेल्या बऱ्याच अनिपेक्षित गोष्टी मला हे पुस्तक वाचल्यानंतर समजल्या. या समाजाला कस वाळीत टाकल गेल होत. त्यांना आपली जात काय आहे हे पण सांगणं म्हणजे चूक वाटत होती, जोगणी पळवून न्यायची प्रथा, लोकावरती होणार अन्याय अश्या बऱ्याच गोष्टी अगदी टोकापर्यंत समजल्या व याबाबतीत केलेलं लिखाणमनाच्या अगदी खोलपर्यंत रुजलं गेलं. फकिरा खरंच खूप रुबाबदार माणूस होता. सर्वच पात्र फकिरा, राधाआई, शंकररावपाटील, पंत, प्रांत, साळोजी, दौलती, फकिराच्या भाऊ, आजी सर्वच अगदी भरपूर आणि पुरेपूर मांडल्यासारखं वाटत कोणालाही भाऊंनी कमी लेखलं नाही.
अण्णाभाऊंची मला सगळ्यात जास्त आवडलेली कादंबरी म्हणजे ” फकिरा “.
