आयुष्याचे धडे गिरवताना

Share

Original Title

आयुष्याचे धडे गिरवताना

Publish Date

2013-01-01

Published Year

2013

Publisher, Place

ISBN 13

९७८८१८४९८४८७३

Language

मरठी

Translator

लीना सोहोनी

Readers Feedback

आयुष्याचे धडे गिरवताना

अरविंद बिराजदार द्वितीय वर्ष ,ॲडव्हान्स कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी , अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे मूर्ती यांच्या लघुकथांचा हा अनुवाद. सुधा मूर्तींना आयुष्यात...Read More

Arvind Birajdar

Arvind Birajdar

×
आयुष्याचे धडे गिरवताना
Share

अरविंद बिराजदार द्वितीय वर्ष ,ॲडव्हान्स कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी , अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे
मूर्ती यांच्या लघुकथांचा हा अनुवाद. सुधा मूर्तींना आयुष्यात ज्या विविध व्यक्ती भेटल्या, ज्या प्रसंगातून त्यांना नवीन अनुभव मिळाला, ते सारे कथारूपाने त्यांनी मांडले आहे. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील, त्यांच्या नोकरीच्या कालखंडातील व इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून काम करताना अनेक माणसं त्यांना भेटली, त्यातील काही यातील कथांमध्ये अवतरली आहेत. मूल्यांवर असलेली श्रद्धा, तसेच माणुसकी या बाबी सर्व कथांचा पाया आहेत.
आयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटतात, अनेक घटना-प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातून वेगवेगळे अनुभव येतात. त्यातले काही अनुभव चांगले असतात, काही घटना वाईट. काही सुखकारक असतात, तर काही दु:खदायक. काही व्यक्ती चमत्कारिक असतात, तर काही अनुभव मन थक्क करणारे…. हे अनुभव, या व्यक्ती आपल्याला बरेच काही शिकवून जातात. आपले आयुष्य विविध अंगांनी संपन्न करतात; परिपक्व बनवतात. या संग्रहात सुधा मूर्ती यांनी या अनुभवांना आणि व्यक्तिरेखांना कथारूप दिले आहे. या कथा जशा सुधा मूर्ती यांच्या आहेत, तशा त्या तुमच्या-आमच्या आहेत; विलक्षण चमत्कृतींनी भरलेल्या, गुंतागुंतीच्या जीवनाविषयीच्या आहेत. सहजसोप्या कथनशैलीतून उलगडत जाणाऱ्या या कथा ‘आयुष्याचे धडे’ देतात; अंतर्मुख करतात.

Submit Your Review