चाणक्य

Share

Availability

available

Original Title

चाणक्य

Language

मराठी

Average Ratings

Readers Feedback

चाणक्य

(ग्रंथपाल )पवार कल्याणी शांतीलाल निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव इ. स. पूर्व 300 वर्षापूर्वीची ही कहाणी. त्यावेळी भारतात अनेक गणराज्य नांदत होती....Read More

Kalyani Pawar

Kalyani Pawar

×
चाणक्य
Share

(ग्रंथपाल )पवार कल्याणी शांतीलाल निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव
इ. स. पूर्व 300 वर्षापूर्वीची ही कहाणी. त्यावेळी भारतात अनेक गणराज्य नांदत होती. परंतु त्यांच्यात एकमेळ नव्हता. आपापसात सतत संघर्ष होत होती. मगध हे त्यांपौकीच एक ! त्या राज्याचा राजा धनानंद हा विलासी राजा होता. अतोनात कर लावून तो प्रजेची पिळवणूक करीत असे. त्याच्या अनियंत्रित कारभाराला प्रजा कंटाळली होती. चाणक्य विष्णुगुपत हा त्या राज्यातील एक तेजस्वी ब्राह्मण. तक्षाशिलेला जाऊन विद्यासंपन्न झालेल ! राजाचा दानाध्यक्ष या नात्यानं काम करताना धनानंद राजानं त्याचा अपमान केला. ते पाहून चाणक्यनं शपथ घेतली की, उन्मत्त धनानंद राजाचं सिंहासन मी यथावकाश उलथून टाकीन.’ त्याच वेळी जगज्जेता बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून ग्रीक सेनानी सिकंदर यानं भारतावर आक्रमण केलं. चाणक्यानं अपार परिश्रम करून सिकंदराचं आक्रमण थोपविण्यासाठी अनेक योजना आखल्या. त्याचीच परिणीती म्हणून सिकंदराला भारतविजेता न होता परतावं लागलं. चंद्रगुप्ताला हाताशी धरून चाणक्यानं त्याला उत्तम शिक्षण दिलं. अनेक तेजस्वी तरुणांची एक मळी उभी केली आणि अनेक युक्त्या-प्रयुक्त्या योजून त्यानं धनानंद राजाला पदच्युत केलं. त्याच्या सिंहासनावर चंद्रगुप्त मौर्याला अधिष्ठित करून त्याच्याच सहाय्यानं चाणक्यानं एकसंध, बलसंपन्न आणि अखंड भारत निर्माण केला. आपल्या आयुष्याच्या उतरार्धात “कौटिलीय अर्थशास्त्र’ हा ग्रंथ लिहून भारतीय साहित्यात अनमोल भर घातली. अशा या नृपनिर्मात्या युगंधर क्रांतिकारी महापुरुषाच्या जीवनावरील ही ललितरम्य कादंबरी अनेक नाट्यपूर्ण, रहस्यमय प्रसंगांनी सजलेली !

Submit Your Review