THE CANTONMENT CONSPIRACY

By Manoj Naravane

Share

Original Title

THE CANTONMENT CONSPIRACY

Publish Date

2025-01-01

Published Year

2025

Publisher, Place

Total Pages

288

Format

Paperback

Language

English

Readers Feedback

THE CANTONMENT CONSPIRACY

Book Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता,...Read More

Manish Baliram Sawkar

Manish Baliram Sawkar

×
THE CANTONMENT CONSPIRACY
Share

Book Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana
THE CANTONMENT CONSPIRACY
पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले असते. ‘द कॅन्टोन्मेंट कॉन्स्पिरसी- अ मिलिटरी थ्रिलर’ या पुस्तकाचं जंगी स्वागत अलीकडेच झालं. दिल्लीकर बुद्धिवाद्यांसह राजकारणी आणि विविध क्षेत्रांत छाप उमटवणाऱ्यांचाही राबता जिथं असतो, त्या ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’मध्ये १३ एप्रिल रोजी, ‘फ्रॉम सोल्जर टु स्टोरीटेलर’ असा एक गप्पांचा कार्यक्रमही झाला. त्याआधीच या पुस्तकाच्या प्रती दिल्लीत अनेकांना उपलब्ध झाल्या होत्या. महिनाभर आधीच, म्हणजे ११ मार्च रोजी खवटपणाचा अर्क असलेले मुलाखतकार करण थापर यांनी ‘द वायर’ साठी ‘कादंबरीकार’ जनरल मनोज नरवणे यांच्याशी बातचीत केली होती- नरवणे यांचं हे पुस्तक आपल्याला वाचनीय वाटल्यामुळेच, त्यांनी यापुढेही ‘मिलिटरी थ्रिलर’ प्रकारचं लेखन करावं अशी दिलखुलास दादसुद्धा (चक्क) थापर यांनी त्यानंतर एका वृत्तपत्रात या पुस्तकाचा परिचयलेख लिहून दिली.
माजी लष्करप्रमुखांच्या या पुस्तकातली गोष्ट- आणि पात्रंही- कल्पित आहेत’एनडीए’ च्या पहिल्या महिला बॅचची (२०२२) स्नातक आणि आता पद मिळालेली लेफ्टनंट रेणुका खत्री आणि त्याच तळावरचा लेफ्टनंट रोहित वर्मा हे दोघे एकमेकांविषयीची किल्मिषं, परस्परांबद्दलचे संशय विसरून जोडीनं एका खुनाचा छडा लावू पाहतात, अशी ही कथा. त्या तपासात त्यांना काही धक्कादायक माहिती मिळत जाते. ही काय माहिती असते ? लष्करापर्यंत कोणाची ‘पोहोच’ आहे, याबद्दल काही गंभीर बाबी त्यांना कळतात का ? – या प्रश्नांच्या उत्तरं खुद्द पुस्तक वाचूनच मिळवलेली बरी.
जसं राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून नवीन आलेले दोन अधिकारी पश्चिम उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या काठावर असलेल्या एका आरामदायी लष्करी चौकीत तैनात होतात. लेफ्टनंट रोहित वर्मा लष्करी पार्श्वभूमीतून येतात, त्यांना सर्व गोष्टी माहीत असतात आणि त्यांना काम सोपे असते. दुसरीकडे, लेफ्टनंट रेणुका खत्री ही नागरी पार्श्वभूमीची आहे आणि एनडीएमध्ये प्रवेश मिळालेल्या मुली कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीतून येते. त्या दोघांनाही सिद्ध करावे लागते की त्या लष्करी अधिकारी होण्यास पात्र आहेत. ऑफिसर्स मेसमध्ये स्वागत समारंभात, एका महिलेवर हल्ला होतो आणि संशयाची सुई रोहितवर येते. कोर्ट ऑफ इन्क्वायरी करण्याचे आदेश दिले जातात, ज्यामध्ये रेणुका यांच्यातील अधिक भयानक संबंधांकडे लक्ष वेधणारे महत्त्वाचे पुरावे सापडतात.
जनरल नरवणे यांची भाणेवरची पकड आणि कौतुक जसं या खरं तर त्यांनी लिहिलेल्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या आत्मचरित्रासाठी होऊ आत्मचरित्रच त्यांनी लिहिलेलं पहिलं पुस्तक होतं. ‘द कॅन्टोन्मेंट कॉन्स्पिरसी’ हे दुसरं – पण प्रकाशित झालेलं मात्र पहिलंच पुस्तक. ‘अॅमेझॉन’ सारख्या पुस्तकविक्री संकेतस्थळांवर या पहिल्या पुस्तकाची छबी दिसते, पण विकत घेऊ गेलं तर ‘उपलब्ध नाही’ अशी सूचना येते. पण पहिल्याआधीच प्रकाशित झालेल्या या दुसऱ्या पुस्तकाला मात्र वाचकांची दाद मिळत आहे !

Submit Your Review