परिवर्तन: शास्त्रही, कलाही

By डॉ. आ.ह. साळुंखे

Share

Availability

available

Original Title

परिवर्तन: शास्त्रही, कलाही

Publish Date

2023-01-01

Published Year

2023

Total Pages

56

ISBN

9789392880971

Format

Paperback

Country

India

Language

Marathi

Average Ratings

Readers Feedback

परिवर्तन: शास्त्रही, कलाही

Review By प्रा. शेखर संपत बुलाखे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी, पुणे-२७ या पुस्तकामध्ये एकूण २० प्रकरणे दिलेली आहेत यामध्ये डॉ.आ. ह....Read More

Prof. Shekhar Bulakhe

Prof. Shekhar Bulakhe

×
परिवर्तन: शास्त्रही, कलाही
Share

Review By प्रा. शेखर संपत बुलाखे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी, पुणे-२७
या पुस्तकामध्ये एकूण २० प्रकरणे दिलेली आहेत यामध्ये डॉ.आ. ह. साळुंखे यांनी असे सांगितले आहे की, परिवर्तनाचे प्रक्रिया ही एक सुंदर तपश्चर्या आहे आणि आपण ही तपस्या निष्ठेने विवेकाने, संयमाने, परस्पर विश्वसाने आणि परस्पर सहकार्याने करूया. परिवर्तनवादी कार्यकर्ता होण्यासाठी व्यक्तीने आधी चांगला माणूस कसा बनवायचा ते शिकलं पाहिजे आणि तसं बनलेही पाहिजे असे लेखक मानतात.परिवर्तनाचा चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने आधी स्वतःमध्ये परिवर्तन करणे हे पहिलं आणि कठीण आव्हान असतं आणि त्यांनी ते स्वहितासाठी आणि समाजासाठी हे पेललं पाहिजे. समाजात परिवर्तन घडवून आणणे हे देखील एक वेगळ्या प्रकारचे युद्ध जिंकण्यासारखंच असतं ते जिंकण्यासाठी काम करणारा कार्यकर्ता कार्यक्षम असायला हवा हे करत आहे त्याचबरोबर त्याच्याकडे युक्तिवादाचा आणि संत तुकारामाच्या भाषेतील शब्दांचे शस्त्र असावंच लागतं. जीवना वरचं उत्कंठ प्रेम सृष्टी विषयी अखंड जिज्ञासा नव्या अनुभवासाठीचे आतुर उत्कंठा जोपर्यंत शिन वा नष्ट होत नाही तोपर्यंत आपल्या अस्तित्वाचा पात्र सदैव माधुर्यान ओथांबलेलं असतं .आपल्या अस्तित्वातून जीवनाचा प्रवाह अखंड वाहतच असतो .आपल्या आतले आनंदाचे झाले कधी आटणार नाहीत याची खबरदारी मात्र घ्यायला हवी ! शेवटचा श्वास ही नवनिर्मितीच्या ध्यासन सापडलेले असावा या आयुष्याच्या अंता विषयी अतिशय कोवळ आणि सुंदर स्वप्न होय आणि हे स्वप्न आपण आपल्या हळुवारपणानं जरूर जपायला हवं आणि कायमचं जपायला हवं!. माणसाने कसं जगाव? तो मोटर गाडी सारखा निर्जीव नाही म्हणजे त्या गोष्टीचा अनुकरण करू नये? वेसण असल्यामुळे गुलाम बनल्यासारखी स्थिती असेल तर ती गुलामी झटकून मुक्त होण्याच्या आटोकाट प्रयत्न करावा आणि दावणीतल्या वैरणीच्या मोहपायी स्वतंत्र गमावून दाव्यात अडकून घेण्याचा नकार द्यावा .माणूस म्हणून त्याला हे शोभून दिसणार आहे. आपलं मन आपल्यालाच विचारात राहतं कोण जवळच कोण दूरच हे कसं ठरवायचं? अंतकरणातील एखादा निर्मल हेतू लोकांना एकमेकाशी जोडत असतो. अत्यंतिक स्नेह हा काही बाह्य कारणावर अवलंबून नसतो. परिवर्तनवादी कार्यकर्त्याला खरोखरच वाटत असेल तर त्यांनी पाणी साठवण्याचा हौद बनण्यापेक्षा वाहता जरा बनव. गणित शास्त्र मानशास्त्र येथील सारखी कोणतीही ज्ञानशाखा घेतली तर तीच शास्त्रशुद्ध शिक्षण द्यावस लागतं नेमकं तेच परिवर्तन शास्त्राच्या बाबतीतही आहे. स्वतः शिकून घेतल्याशिवाय कोणी या शास्त्र मधलं काहीही दुसऱ्याला शिकवू शकणार नाही. संस्कृती, नीती, इतिहास, धर्म ,सण ,उत्सव ,देवता इत्यादीच्या बाबतीत गांभीर्याने केल्याशिवाय कोणालाही त्या क्षेत्रात निर्दोष परिवर्तन घडवता येणार नाही. खरंतर, परिवर्तनाच्या प्रक्रियेत काम करण्याच्या व्यक्तिमत्त्वात शास्त्र याचा एकात्मिक असा समन्वय व्हायला पाहिजे. त्याची एक रेशमी गुंफण व्हायला पाहिजे आणि जसं शास्त्राच्या शिक्षण घेतलं पाहिजे तसंच केले तेही शिक्षण घेतलं पाहिजे निदान अंतः स्फूर्तीने का असेना, जाणीवपूर्वक स्वतःची स्वतः काही तपश्चर्या तरी करायलाच हवी!

Submit Your Review