Availability
available
Original Title
अक्टूबर जंक्शन
Subject & College
Publish Date
2021-01-01
Published Year
2021
Publisher, Place
ISBN
9789352202966
ISBN 13
9789352202966
Format
paperback
Country
भारत
Language
मराठी
Translator
गीते विलास
Readers Feedback
ऑक्टोबर जंक्शन.
नाव :- टकले अमोल दादा (ग्रंथालय प्रशिक्षणार्थी) जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे . सत्य आणि स्वप्न या दोन्हीदरम्यान असलेल्या लहानशा अवकाशात,...Read More
Amol Dada Takale.
ऑक्टोबर जंक्शन.
नाव :- टकले अमोल दादा (ग्रंथालय प्रशिक्षणार्थी)
जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र ,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे .
सत्य आणि स्वप्न या दोन्हीदरम्यान असलेल्या लहानशा अवकाशात, 10 ऑक्टोबर 2010 रोजी चित्रा आणि सुदीप, यांची भेट होते आणि पुढची 10 वर्षे- ती दोघं दरवर्षी 10 ऑक्टोबरला भेटत राहतात. या गोष्टीत एकीकडे आहे सुदीप, ज्याने बारावी नंतर शिक्षण व घर दोन्हीही सोडून दिलं आणि तो मिलेनिअर बनला ; तर दुसरीकडे आहे चित्रा, जी तिनं लिहलेल्या पुस्तकांच्या लोकप्रियतेमुळे आजकाल प्रत्येक साहित्य उत्सवाचा केंद्रबिंदू ठरतेय. कथा एका घटनेपासून सुरु होते. आणि विविक्षित बिंदूवर संपते. दहा वर्षाचा कालखंड गेल्यानंतर जे भावबंध नायक-नायिकेमध्ये निर्माण होतात. त्यामुळे ती कथा ठरते. सुदीप आणि चित्रा या दोन अगदी भिन्न व्यक्ति आहेत. या दोघांच्या समजदार वयातील मैत्रीची ही कथा आहे. दोघेही अपघाताने एकमेकांना भेटतात. निरलस, निस्वार्थ मैत्र होते आणि हळूहळू प्रवाह एकमेकांत सहज सामावत जातात. एकमेकांच्या आयुष्याबद्दल अजिबात काहीही माहिती नसताना लेखनाचा धागा दोघांनाही जोडून ठेवतो. सुदीप दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात असुनही त्याला चित्राच्या मैत्रीची अनावर ओढ असते. ही ओढ पुढे प्रेमाच्या बंधनात अडकते. दोघांची ओळख आती मैत्री आणि मग प्रेम या राजमार्गविरून जाताना सगळ्या शक्याशक्तेला फाटा देऊन फुलत जाते .
आपली दोन आयुष्य असतात. जे आपण दररोज जगतो ते आणि दुसरे, जे आपल्याला दररोज जगावंसं वाटतं ते. “ऑक्टोबर जंक्शन” ही चित्रा आणि सुदीपच्या त्याच दुसऱ्या आयुष्याची कहाणी आहे…..
