या पुस्तकात नेमकं वेगळं काय आहे ? तर प्रत्येक चॅप्टर हा वेगळाच आहे. यात एकूण ७ प्रकरणं आहेत. आणि
Read More
या पुस्तकात नेमकं वेगळं काय आहे ? तर प्रत्येक चॅप्टर हा वेगळाच आहे. यात एकूण ७ प्रकरणं आहेत. आणि प्रत्येक प्रकरणाचं एक वेगळेपण आहे. पण त्याआधी याचा लेखक रूईज हे Toltec कोण आहेत हे सांगतो. त्याच्या मते हे Toltec नाव हजारो वर्षांपासुन दक्षिण अमेरिकेतल्या त्याच स्त्री आणि पुरूषांना दिलं जातं ज्यांना मनुष्य जन्मल्यावर ते मरेपर्यंत नेमकं शांत, भरभरून आणि ऊमेदीनं जगावं कसं याचं ज्ञान आहे; ज्यांना इथला प्रत्येक दिवस भरभरून जगता येतो. हे भरभरून जगणं म्हणजे नेमकं काय आहे तर या जगण्यालाच ते लोक ‘A Toltec Wisdom’ असं म्हणतात. या जगण्याची हजारो वर्षांपासुनची काही सुत्रे आहेत. ती आयुष्यात पेरली, जोपासली की आपोआप आपलं आयुष्य भरभरून वाढतं, फुलतं. याच Eagle Knight Lineage वंशातून पुढे आलेला हा मिगेल रूईज आपल्या पुर्वजांनी नेमकं आपल्यासाठी काय दिलंय हेच इथे सांगतो.
Chapter 1: Domestication and the Dream of the Planet
पहिल्यांदाच लेखक सांगतो की आयुष्य हा एका अनामिक अशा निर्मिक शक्तीचा निरंतर असा प्रवाह आहे. इथे प्रत्येक जण ईश्वरी अंश नाही तर स्वतः ईश्वरच आहे. मानवी वंश हा जन्मतःच प्रेम आणि प्रकाशाचा अखंड स्त्रोत आहे. प्रत्येक व्यक्ती ही स्वतःसाठी आणि इतरांसाठीही आरशासारखी लख्ख आहे. आपण म्हणजेच इतरांचे अंश आहोत आणि जग म्हणजेच आपल्यासाठी लख्ख असा आरसा आहे. आपण भरभरून जगत नाही कारण उघड्या डोळ्यांनी आपल्याला जगाकडे बघता येत नाही. कारण समोरचं जग आणि आपण यात मंद अशा काही चुकीच्या सामाजिक समजूती असतात (a wall of fog). आपण नैसर्गिकरित्या स्वतंत्र जन्मतो; पण सामाजिक नियमांनी आपण जग बघण्याचा प्रयत्न करतो (a material frame/ the world of illusion) आणि इथेच आपण आपल्यातलं जगणं बाजूला ठेऊन ‘ऊसनं जगण्याचा जू’ खांद्यावर घेऊन पुढे जायला लागतो. जगाच्या चौकटमय सामाजिक जगण्याला तो the dream of planet ही सुंदर संज्ञा वापरतो, ज्यामधे सामाजिक प्रथा, सरकारी शासन, शिक्षण, धर्म आणि इतर ब-याच गोष्टी आहेत. समाज जसा जगतो तीच स्वप्नं तो आपल्याला मुद्दाम बघायला लावतो (social domistaction). पण समाज आणि आपण वैयक्तीक या दोघांमधे एक भिंत आहे. समाज जे पेरेल तीच आपली स्वप्ने असावीत असं काही नाही आणि नसावं. मुळात तुमच्या आत वाहणारी ऊर्जा तुम्हाला ओळखता यायला हवी; ती ओळखुन तिचा प्रवाह कुठे आहे तो समजायला हवा. तरच कुठे आयुष्य भरभरून आणि आनंदी जगता येतं.
खरंतर मिगेलच्या मते भाषा हे खुप प्रभावी शास्त्र आहे. जी भाषा अथवा शब्द आणि त्याचे अर्थ आपण घरात वापरतो तीच नंतर मुलांच्या मनात ‘पेरली’ जाते. सामाजिक संकेत हे भाषेमधून पुढे येतात आणि त्यांचच पुढे अप्रत्यक्षपणे The Book of Law तयार होतं. ” We need a great deal of courage to challenge our own beliefs” असं मिगेल सरळ सरळ म्हणतो. म्हणजे समाज खरंच बरोबर असतो का ? हा प्रश्न आपण स्वतःला आणि समाजालाही विचारायची हिंमत आपल्यात असायला हवी. आपली वैयक्तीक स्वप्नं ही समाजाच्या स्वप्नांच्या ओझ्याखाली दबून संपून जायला नको. कारण हा जन्म एकदाच आहे. “Ninty-five percent of the beliefs we have stored in our minds are nothing but lies” असं धडधडीतपणे बोलण्याचं मिगेलचं कसबं खरंच वेगळेपण दाखवतं. प्रत्येकाची स्वप्नं वेगवेगळी असु शकतात. सगळ्यांच जगणं एकाच पध्दतीचं कसं असु शकतं ? हा त्याचा प्रश्न खुप महत्वाचा वाटतो. ‘इथे मरण्यापेक्षा या पृथ्वीवर जगणं हीच मोठी भिती माणसाच्या मनात तयार झाली आहे’ असं मिगेल संबोधतो. आणि ते खरंही आहे. इतरांनी आपल्याला स्विकारावं म्हणून आपण इतरांच्या मर्जीप्रमाणे वागत जातो. यालाच तो Domestication and the dream of planet असं तो म्हणतो. आपण स्वतःला judge करताना आपलं स्वत्व विसरून ते इतरांच्या नियमाने करतो. कारण आपण कसेही असलो तरी इतरांनी आपला स्विकार करावा. ही काही Social Agreements आहेत ज्याला कधीकधी छेद देता यायला हवा. याला छेद द्यायचा असेल तर काय करावं लागेल ? तर आपली agreements ही भितीपोटी आलेली असतात. त्यांच्या ऐवजी माणूसकीने, आवडीने अथवा प्रेमभावनेने आलेली agreements यांची ‘नव्याने लागवड’ करून आयुष्यात अनुभवास येणा-या फरकाचा तो विचार करायला लावतो. “But the agreements that come from love help us to conserve energy and even gain extra energy”.
Chapter 2: Be Impeccable with Your Word
मानवी भाषेला आणि त्याच्या शब्दाला काहीतरी किंमत असावी असं मिगेलला वाटतं. कारण ते फक्त शब्द नसतात तर अर्थपूर्ण जगण्याचे मार्ग असतात. आपण जे बोलतो त्याला समाजाच्या लेखी आणि आपल्यालेखीही खरंच काही किंमत असते का ? नसेल तर मग आपलं कुठेच अस्तित्व नसतं. “What you dream, what you feel, and what you really are, will all be manifested through the word” अशा वाक्याची झापड मारून ” Like a sword with two edges, your word can create the most beautiful dream, or your word can destroy everything around you” म्हणत आपण भाषेविषयी किती गंभीर आहोत, किंबहुना आपली भाषा अथवा वाणीच आपल्या जगण्याची खरी वाहिनी आहे असं लेखक सांगतो. यासाठी संदर्भ म्हणून लेखकाने हिटलरच्या भाषणांचा संदर्भ दिलाय, ज्यामुळे नंतर काय घडलं हे तो दाखवून देतो. तिरस्कारविरहीत, द्वेषविरहीत भाषा ही माणसांना बांधून ठेवते. बुध्दांनीही आधीच सांगीतलंय की माणसाने कामा व्यतिरीक्त बोलणंच बंद केलं अथवा मर्यादीतच बोललं तर जग एका ठराविक कालावधीत आनंदी आणि शांत होऊन जाईल. मनावर जी भाषा पडते त्याचीच पिकं नंतर आयुष्यात जन्म घेतात. एक भिती अथवा एखादी शंकाही नंतर आयुष्याचा नर्क बनवुन टाकते. Impeccable याचा अर्थच मुळात ‘without sin’ असा आहे. लेखकाच्या मते पाप म्हणजे काय याची साधी सरळ व्याख्या म्हणजे “anything that you do which goes against yourself”. आपल्या मनाविरूध्द जे जे आपण करतो ते म्हणजे पाप ही किती शास्त्रशुध्द व्याख्या दिलीय. “Sin begins with rejection of yourself. Self-rejection is the biggest sin that you commit”. स्वतःच्या विरूध्द जाऊन वागणं हाच मुळात खरा मानवी दोष. हे सांगताना समाजाचा आजचा सगळ्यात मोठा दुर्गुण कुठला तर तो gossiping. मिगेलच्या मते “Misery likes company”. दुःखाची सुरूवात ब-याच अंशी एकमेकांची ऊणीधुणी काढण्यापासुन होते, आणि ते खोटंही नाही. Gossiping मधून एकमेकांचे दोष काढायला सुरूवात होते, आणि नंतर ते दोष सार्वजनिक होतात. अशातुन त्या माणसाची image तयार होते आणि मग तो तसाच ‘सार्वजनिक’ universal stamp मारला जातो. नंतर ज्याला हा stamp लावलाय तोसुध्दा तसाच वागत जातो आणि संपतो. म्हणून स्वतः स्वतःबद्दल ठाम असणं खुप आवश्यक असतं.
Chapter 3: Don’t Take Anything Personal
आपल्याभोवती जे जे घडतं ते सगळं आपल्यासाठीच असतं ही समजूत कुठेतरी मोडकळीस काढता यायला हवी असं लेखकाचं मत आहे. अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करता यायला हवं. हा सोपा वाटत असला तरीही मानवी स्वभावातला खुप मोठ्ठा गुण आहे. हे ज्याला जमलं त्याला एक सुखाचं नाणं सापडलं असं आपण म्हणूयात. जगाची बडबड याला लेखक emotional garbage अशी सुंदर पण मार्मिक संज्ञा वापरतो. “You eat all their emotional garbage, and now it becomes your garbage”. खरं आहे ना ? जगाने तुम्हाला कुरूप म्हटलं म्हणून तुम्ही कुरूप होता का ? तर नक्कीच नाही. जगाची काही तत्वं तुमच्यापेक्षा वेगळी असतात म्हणून जग तुमच्याविषयी चर्चा करतं. पण होत असलेली चर्चा आणि तुम्ही या दोघांमधे एक defensive wall असायला हवी. तुमचं मन म्हणजे एक सुंदर बाग असते. त्याचं सौंदर्य अबाधीत ठेवण्यासाठी त्याच्या संरक्षण भिंती या भक्कमच असायला हव्यात. बाहेरून कोण तुमच्या आत काय फेकतंय यापेक्षा तुम्ही ते किती आत येऊ देता अथवा आतली विचारांची बाग सुंदर ठेवायची असेल तर बाहेरचं garbage बाहेरचं फेकता याला खुप महत्व आहे. हलक्या मनाची माणसं समाजाची प्रत्येक गोष्ट काळजावर घेतात आणि मग नंतर त्यांच सुंदर मन त्यात गुरफटत जाऊन आतुन ती विध्वंसक होतात. आपलं आणि आसपासचं जग सुंदर करायचं असेल तर आपण इतरांच्या वैचारिक बागेत काही टाकायचंही नाही, आणि आपल्या आतही हानिकारक असं काही येऊ द्यायचं नाही. हा नियम जमला की इथलं जगणं जमलं. कधीकधी स्वतःची स्वतःबद्दल मतंही तपासुन बघायला हवीत. आपण स्वतःबद्दल जे मत बनवतो ते नेहमीच योग्य असेल तसंही नसतं. थोडक्यात, समाजच नाही तर आपण स्वतः स्वतःचे वैरी असु शकतो. भावनेवरचं हे नियंत्रण आणि त्यातला balance साधता यायला हवा. यासाठी काय आवश्यक असतं तर चिंतन. लेखक म्हणतो ,”Do not expect people to tell you the truth because they also lie to themselves. You have to trust yourself and choose to believe or not to believe what someone says to you. Not taking anything personally helps to avoid many upsets and needless suffering”. जग स्वतःच स्वतःशी खोटं बोलत असल्यामुळे त्यांच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करणंच चूक आहे.
Chapter 4: Don’t Make Assumptions:
ब-याचवेळेला आपण काही मतं बनवतो. ती मतं नेहमीच निष्कर्षाच्या कसोटीवर तपासलेली असतात असं नाही. जर ती तशी तपासली नाहीत तर नंतर आपण ती खरीच आहेत असं ‘गृहीत’ धरतो. नंतर तीच श्रध्दांमधे रूपांतरीत होतात. आणि ती एकदा रूपांतरीत झाली की आपण आंधळेपणाने हेच खरं अथवा हेच सत्य असं जगत पुढे जातो. एकतर आपल्याला स्वप्नवत जगायला खुप छान वाटतं. आणि मग तयार केलेले निष्कर्ष खोटे ठरायला लागले की नात्यांमधे दरी पडायला सुरूवात होते. हे निष्कर्ष फक्त समाजाबद्दलच असतात असं नाही तर ते स्वतःबद्दलही असतात. आपल्या आयुष्यात माणसांना स्थान देताना आपली काही तत्वं असतात. त्या तत्वांना योग्य व्यक्ती वाटली की ती आपली होते. अथवा मग ती मनाविरूध्द होऊन जाते. हा एक मोठ्ठा समाजदोष हे असं या लिखाणातून वाटतं. आपल्याला तत्वांनीच जायला शिकवलं जातं. काही प्रमाणात ते योग्यही असेल. पण *माणसांची तत्वं ही स्थलकाल सापेक्ष असतात. त्या त्या भागातल्या भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतीक घटकांचा त्यावर प्रभाव असतो. माणूस जसा आहे तसा स्विकारणं आपल्याला शिकवलंच जात नाही. हे जेव्हा जमेल तेव्हा समोरचाही माणूस तेवढ्याच मोकळेपणाने आपल्या सोबत राहतो. नात्यातली ही मोकळीकता आपल्याला साधता यायला हवी. लेखक म्हणतो “The day you stop making assumptions you will communicate cleanly and clearly, free of emotional poison. Without making assumptions your word becomes impeccable” हा इथला साधा नियम.
Chapter 5: Always Do Your Best:
मिगेलच्या मते तुम्ही जे जे करता त्यामागे एक नियम असायला हवाय आणि तो म्हणजे ‘जे कराल ते चांगलंच कराल’. पण हा नियम सगळीकडेच सारखा असेल असा नाही. ऊदा. एखाद्या ऑफिसमधे एखादा बाॅस कर्मचा-याला काही बोलला तर त्या कर्मचा-याची अंतर्गत अवस्था ढवळलेली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग इथे ऊपयोगी पडते ती वैयक्तीक विचारसरणी. खरंच एखादी चूक झाली असेल तर कर्मचा-याने तो अपमान न समजता सुधारण्याची संधी म्हणून त्याकडे बघणं आवश्यक असतं. पण आपण इतरांबद्दल आधीच assumptions बांधले तर मात्र तो कर्मचारी आणि बाॅस यांच्यात मतभेदाची भिंत तयार होऊ शकते. “Learning from your mistakes means you practice, look honestly at the results, and keep practicing. This increases your awareness”. आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी action घेता यायला हवी. Action घेणं, कृती करणं म्हणजेच आपल्यातला जीवंतपणा असतो. तुमच्या आत लपलेल्या असमजूतदार माणसाविरूध्दचा तो नव्यानं एक बंड असतो. हा बंड करता यायला हवा. हे जमलं की जिथे तुम्ही जाता तिथलं जगणं समृध्द होऊन जातं. आपला जन्मच मुळात आनंदी होऊन जगण्यासाठी झालाय. आणि आनंदी राहायचं असेल तर स्वतःत बदल करत राहीलं पाहीजे. स्वतःत नेहमी चांगल्यासाठी बदल करणं यालाच मिगेल A Master of Transformation असं म्हणतो. “Every action then becomes a ritual”.
Chapter 6: Breaking Old Agreements:
चालत आलेली पारंपारिक जीवनशैली बरोबर असेलच असं नाही. कदाचित काळानुसार त्यात बदल करून पुढेही जाणं आवश्यक असतं. त्यासाठी जुन्यात नेमकं काय चुकतंय याचं शास्त्रीय ज्ञान असणं आवश्यक असतं असं रूईजचं म्हणनं आहे. “We need to be aware of what the problem is in order to solve the problem” आणि यासाठी तो Toltecs ने अवलंबलेल्या तीन तत्वांचा आधार घेतो.
(1) The Mastery of Awareness-who we really are (2) The Mastery of Transformation-how to change, how to be free of domistication आणि (3) The Mastery of Intent-the part of life that makes transformation of energy possible; its life itself, the mastery of love.रूईजच्या मते अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना इथली लोकं स्वतःला Warriors अथवा योध्दा समजतात. योध्दा या अर्थाने नाही की कुठेतरी युध्दासाठी लढायला जायचंय. तर या अर्थाने की बाहेरचा कुठलाही हानिकारक परजीवी घटक (parasite) याला आपल्या आत, आपल्या मनभूमित येऊ न देता त्याचा नेहमी प्रतिकार करता यायला हवा. “The warrior is one who rebels against the invasion of the parasite”. हा पॅरासाईट काहीही असु शकतो. ऊदा. चुकीची समाजधारणा, स्वतःबद्दलचं चुकीचं मत, भिती, द्वेष, मत्सर, कुचेष्टा, अथवा काहीही. याच्या विरोधात माणसाचा खरा लढा असतो. आतुन मुक्त व्हायचं असेल तर बाहेरून आत काय येऊ द्यायचं नाही यावर आतलं स्वातंत्र आणि स्वर्ग अवलंबून असतो. “Heaven is a place that exists within our mind. Its a place of joy and love”. मुळात हा Parasite (परजिवी) जेव्हा तयार होतो तेव्हा त्याला तिथेच मारता यायला हवं. म्हणजे घर बांधण्याआधीच चुकीचा पाया जमिनदोस्त करता यायला हवा.
जगण्यातल्या या सगळ्या बदलासाठी आपल्याला जर काय आवश्यकता असेल तर reprogramming ची आवश्यकता. जेव्हा आतुन-बाहेरून बदलायचं असतं तेव्हा reprogramming आणि त्यासाठी आवश्यक ते बदल आणि त्याची तत्वं जवळ असणं आवश्यक आहे. यात खासकरून जुनं विसरून क्षमा अथवा माफ करून पुढे जाता यायला हवं. अगदी स्वतःलाही माफ करता यायला हवं. हाही नियम खुप महत्वाचा आहे. पण तो वाटतो एवढा सोपा नाही. तो समोरच्या कृतीवरच अवलंबून आहे. खरंतर आपण आपली जुनीच विचारधारा सोडायला तयार नसतो त्यामुळेच बहुधा बहुतेकांच्या आयुष्याचा नर्क होतो. नर्क म्हणजे आपल्याच कृत्यांनी ओढवून आणलेलं दुःख. सुखाचं नेमकं ऊलटं आहे.
Chapter 7: Heaven on Earth
आयुष्याला नव्यानं झळाळी द्यायची असेल तर reprogramming म्हणजेच “Dream different dream” साधलं गेलं पाहीजे. जुनी कात टाकून नव्यानं त्यातुन बाहेर पडता यायला पाहीजे. निसर्गाचा हाच खरा सुवर्ण नियम आहे. नव्याने फुलायचं असेल तर जुनं विसरून मनात नवीन लागवड, मशागतीत वाढ धरली पाहीजे. आणि हेच मानवी जीवनाचं खरं सत्य आहे असं तो म्हणतो. ऊदाहरणासाठी मिगेलच्या मते, ” Moses called it the Promised Land, Buddha called it Nirvana, Jesus called it Heaven and the Toltecs call a New Dream” असं सहज म्हणून जातो. मिगेलच्या मते आपल्या दुःखाचं कारण आपण आहोत. The only reason you suffer is because you choose to suffer. We have a choice between hell and heaven”. आयुष्याचा स्वर्ग अथवा नर्क हा आपण स्वतः आपल्या आयुष्यात कोणत्या विचारांनी राहतो यावरच अवलंबून असतो. खरंय ना ?
Show Less