Availability
available
Original Title
जू
Subject & College
Publish Date
2016-01-01
Published Year
2016
Publisher, Place
Total Pages
383
Format
Paperback
Country
INDIA
Language
MARATHI
Average Ratings
Readers Feedback
जू
ऐश्वर्य पाटेकर यांचे जू हे आत्मकथन वाचले. एका मनस्वी लेखकाने त्यांचे अत्यंत वादळी आणि वेदनामय बालपण यात शब्दबद्ध केले आहे. बालवयात सोसावे लागलेले चटके, पडणारे...Read More
प्रियांका संपत सोनवलकर , ग्रंथालय विभाग , तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती.
जू
ऐश्वर्य पाटेकर यांचे जू हे आत्मकथन वाचले. एका मनस्वी लेखकाने त्यांचे अत्यंत वादळी आणि वेदनामय बालपण यात शब्दबद्ध केले आहे. बालवयात सोसावे लागलेले चटके, पडणारे प्रश्न त्यांनी अत्यंत समर्पकपणे मांडलेले आहे. जीवावर उठलेली आपलेच माणसे, सततची मारहाण, त्यातून वाचवलेले प्राण पराकोटीचे कष्ट, क्षणोक्षणी संकटांचे आव्हान देणारे प्रश्न त्यातून पिलांना चिमणचारा भरवण्याची आईची कसरत, प्रतिकुल परिस्थितीही भावंडातील उत्तम संवाद, कधी प्रेमाचा, कधी भांडणाचा तर कधी चेष्टेचा यातून त्यांची शहाणीव दिसून येते. आत्मकथन वाचत असतांना उत्कंटा ताणली जातेच परंतु त्याचबरोबर अस्वस्थाही वाढत जाते. मनाला चटके लावणारे अनेक प्रसंग यात घडतात. पुस्तक वाचताना जाणवते.लेखकाला निरागस, आनंदी बालपण जगायला मिळाल नाही.उलट पावलोपावली संकटच वाट्याला आली.
मायलेकरांचा भावंडांचा संवाद वाचताना जणू आपणही त्यात सहभागी आहोत असे वाटयला लागते. एका कणखर आईची हि पाच मुले, चार बहिणी आणि स्वतः लेखक सतत होणारा आईचा छळ लागोपाठ झालेला चार बहिणी पुरुषप्रधान संस्कृतीचे तनामनावर उठलेले ओरखडे आणि हे सोसत आईच जगण.पण हेही दिवस जातील. हा विश्वास आई देते. आणि शिक्षण घेऊन भाऊ हे साध्य करेल याची खात्री देते.
जू हे युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर याचं आत्मकथन बहुसंख्य वाचकांनी डोक्यावर घेतल आहे सुखाची जराशी हि हिरवळ शोधूनही सापडणार नाही अस जगन लेखकाच्या व त्यांच्या आई आणि चोघी बहिणी त्यांच्या वाटायला आल. आणि खरोखरच अत्यंत हृदयस्पर्शी आणि अस्वस्थ करणार आणि शेवटी दिलासा देणार आत्मकथन आहे.
