Availability
available
Original Title
मृत्युंजय
Subject & College
Series
Publish Date
1967-01-01
Published Year
1967
Publisher, Place
Total Pages
801
ISBN
ISBN 81- 7766
Format
hardcover
Country
india
Language
marathi
Readers Feedback
मृत्युंजय
शिवाजी सावंत लिखित ‘मृत्युंजय’ ही मराठी साहित्यातील एक महत्त्वपूर्ण आणि अजरामर कादंबरी आहे. महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवून रचलेली ही कादंबरी केवळ कर्णाचे जीवनच...Read More
सा.प्रा.कुतवळ मीनाक्षी ज्ञानदेव
मृत्युंजय
शिवाजी सावंत लिखित ‘मृत्युंजय’ ही मराठी साहित्यातील एक महत्त्वपूर्ण आणि अजरामर कादंबरी आहे. महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवून रचलेली ही कादंबरी केवळ कर्णाचे जीवनच नाही, तर मानवी जीवनातील संघर्ष, दु:ख, प्रेम, मैत्री आणि न्याय-अन्याय यांवर भाष्य करते.
‘मृत्युंजय’ची रचना आत्मकथनाच्या स्वरूपात आहे. यात कर्ण, त्याची आई कुंती, त्याची पत्नी ऋषाली, त्याचा मित्र दुर्योधन आणि भगवान कृष्ण यांच्या नजरेतून कथा उलगडत जाते. प्रत्येक पात्राच्या दृष्टिकोनातून कर्णाचे जीवन समजावून सांगण्याचा लेखकाचा दृष्टिकोन वाखाणण्याजोगा आहे.
कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे सावंतांनी सुरेखपणे मांडले आहेत. सूर्यपुत्र असूनही तो आयुष्यभर ‘सूतपुत्रा’चा डाग पुसण्यासाठी लढत राहिला. त्याच्या महानतेला आणि योध्देगिरीला महाभारतात तोड नाही. मात्र, त्याच्या नशिबात आलेली दुर्दैवी परिस्थिती, कुंतीचे त्याच्यावर झालेले अन्यायकारक वागणूक, त्याचे दुर्योधनाबद्दल असलेले निस्सीम प्रेम आणि त्याग यामुळे तो वाचकांच्या मनाला चटका लावतो.
शिवाजी सावंतांनी वापरलेली भाषा साधी, प्रवाही आणि भावनिक आहे. त्यांच्या लेखनातून कर्णाच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास जिवंत होतो. कर्णाच्या अंतर्मनातील घालमेल, त्याचे स्वाभिमानासाठीचे झगडे, मित्रासाठीचे त्याग आणि त्याचा अंतिम पराभव हे वाचकांच्या मनावर खोलवर प्रभाव पाडतात.
‘मृत्युंजय’ ही केवळ एका ऐतिहासिक पात्राची कहाणी नाही, तर ती मानवी स्वभावाचे गूढ उकलणारी आणि जीवनाच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधणारी साहित्यकृती आहे. शिवाजी सावंतांनी कर्णाच्या रूपाने एक अजरामर व्यक्तिरेखा साकार केली आहे, जी प्रत्येक पिढीला नव्याने प्रेरणा देते.
‘मृत्युंजय’ ही केवळ वाचण्यासाठीच नव्हे, तर अनुभवण्यासाठीची कादंबरी आहे. ती कर्णासारख्या नायकाला एका नवीन दृष्टीकोनातून समजून घेण्याची संधी देते. ‘मृत्युंजय’ हे मराठी साहित्यातील एक कालातीत रत्न आहे.
मृत्युंजय
शिवाजी सावंत लिखित कर्णाची अमर गाथा मृत्युंजय अनेक वर्षांच्या दीर्घकाळानंतर आजही मराठी व सर्वच पुस्तक प्रेमी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे. मृत्युंजय ही कादंबरी महाभारतातील...Read More
Asst. Prof. Wable Arti Anna
मृत्युंजय
शिवाजी सावंत लिखित कर्णाची अमर गाथा मृत्युंजय अनेक वर्षांच्या दीर्घकाळानंतर आजही मराठी व सर्वच पुस्तक प्रेमी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे. मृत्युंजय ही कादंबरी महाभारतातील पात्र महापराक्रमी, दानशूर, महारथी कर्णाला समर्पित आहे.
मृत्युंजय कादंबरीन सारांश- शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय कादंबरीला इसवी सन 1967 साली प्रकाशित करण्यात आले होते. मृत्युंजय शब्दाचा अर्थ आहे मरणानंतरही जिवंत राहणे. महाभारताच्या युद्धात अनेक महारथी धारातीर्थी पडले, परंतु मृत्यूनंतरही जो मृत्युंजय ठरला तो होता महादानशूर कर्ण. कर्णाच्या व्यक्तिरेखेवर आधारित या कादंबरीला भारतीय ज्ञानपीठ संस्थेद्वारे 12 वा मूर्तिदेवी पुरस्कार 6 फेब्रुवारी 1996 ला देण्यात आला. याशिवाय देखील महाराष्ट्र शासन व इतर संस्थांद्वारे मृत्युंजय ला अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत.
मृत्युंजय ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. सर्वसामान्यांना महाभारतातील खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्वाच्या मागोवा घेणारी ही कादंबरी आहे या कादंबरीतील बऱ्याच कथा अनेकांना परिचित आहेत. खलनायक म्हणून भासणारा कर्ण प्रत्यक्षात महाभारतातील सर्वात मोठा नायक आहे हे ही कादंबरी पटवून देते. दानशूरपणा कशाला म्हणतात, संयम कसा असावा, मैत्री कशी जोपासावी व शक्तीची घमेंड कशी मोडावी हे सर्व शिकवणारी ही कादंबरी आहे. कर्ण त्याच्या परिवर्तनाच्या वाटेवर तो अमर झाला. त्याने स्वतःला सुतपुत्र मानले जेव्हा त्याला त्याची ओळख कळली तेव्हाही त्याने आपली ओळख सांगितली नाही, ज्याने स्वतःच्या गुरूचा शाप ही वरदान समजून घेतला.
या कादंबरी ला वाचतांना जणू आपणही त्रेतायुगात वावरत आहोत असा भास होऊ लागतो. मृत्युंजय कादंबरी हाती घेतल्यावर कर्णाचे जीवन नव्याने मनात उलगडू लागते. साक्षात इंद्रदेवाला दान देणाऱ्या त्या सूर्य पुत्रसारखा दानविर या धर्तीवर आजवर झाला नाही अन् भविष्यात होणारही नाही. कर्ण ज्याने स्वतःच्या शब्दासाठी आपलं अस्तित्व. दान केले आपले प्रण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले, स्वतःचे वचन पूर्ण केले.
इंद्र देव आणि कर्ण- कर्णाने दिग्विजया दरम्यान जमवलेली सर्व संपत्ती दान म्हणुन देण्याचा सपाटा सुरू केला होता. या दरम्यान एका रात्री साक्षात सूर्यदेव त्याच्या स्वप्नात आले व सूर्य देवाशी त्याचे संभाषण झाले सूर्यदेवाने कर्णाला सांगितले की “उद्या प्रत्यक्ष इंद्र याचक म्हणून तुझ्या द्वारात येणार आहे ! धन, संपत्ती, वस्त्र, गाई यापैकी काही न मागता तो तुझ्याकडून तुझी कवचकुंडले मागणार आहे. परंतु तू त्या कवच कुंडलांचे दान कधीही करू नको. हे दान नाही; हे दास्य ठरणार आहे.परंतु कर्णाने सूर्याला वंदन करून सांगितले, हे सूर्य देव जर प्रत्यक्ष देवराज इंद्र याचक म्हणून माझ्या द्वाराशी येणार असेल तर अशा या याचकाला शोभणारे कवच कुंडलांचे दान मी अवश्य देईन. व अगदी सूर्य देवाने सांगितल्या प्रमाणेच ज्यावेळी कर्ण नित्यासारखे स्नान, आंहिक आणि अर्ध्यदान आटोपून दानासाठी बसला त्या वेळी कृश शरीराचा ब्राह्मण रुपी इंद्र त्याच्या समोर आला. इंद्राने धन, धनु, धरती, धाम, अश्व, वस्त्र, फुल, पुष्प, सेवक, सेविका यापैकी काहीही न मागता कर्णाच्या कवच कुंडलांचे दान मागून घेतले. कर्णाला सूर्य देवांचे शब्द लक्षात आले. क्षणाचाही विलंब न करता त्याने सर्रकन कंबरेचे खड्ग मैदानाबाहेर काढले व वृक्षावरची साल काढावी तसे आपल्या हातांनी आपले अभेद्य कवच शरीरापासून अलग केले. अंजिराचे फळ काप्तच आतला रक्तवर्णी गर्भ उघडा पाडवा तसे कर्णाचे मांसल शरीर दिसू लागले. मंद मंद हसत कर्णा ने कवाचासोबत आपल्या कानातील कुंडले देखील कापून देवराज इंद्राच्या समक्ष ठेवली.
कर्णाच्या या दानशूरतेने संतुष्ट आणि प्रभावित झालेल्या इंद्रदेवाने त्याला एका शत्रूला वधू शकणारे वैजयंती अस्त्र भेट म्हणून दिले. “जयतु दानविर कर्ण” करीत आशीर्वाद देऊन ब्राह्मण वेशातील देवेंद्र तेथून निघाले.
कादंबरी चे वैशिष्ठ – या कादंबरीचे एक पाहताक्षणीच नजरेस येणारे खास वैशिष्ट्य म्हणजे ही इतर कादंबऱ्याप्रमाणे एकमुखी गोष्ट नाही आहे. तर महाभारतातील विविध पात्रांच्या मुखांतून पुस्तकाच्या प्रत्येक पानावर झरझर उतरणारा कर्णाचा जीवनपट आहे. कुंतीला मिळालेले असामान्य वरदान, त्यातूनच कर्णाचा झालेला असामान्य जन्म , जगाच्या भीतीने कुंतीने घेतलेला कठोर निर्णय, गुरु द्रोण आणि पांडवांकडून कर्णाचा झालेला अपमान, त्यातूनच दुर्योधानासोबत जन्मास आलेले मित्रप्रेम, द्रौपदी वस्त्रहरण, कुरुक्षेत्रातील युद्ध या सर्वच गोष्टी वरवर प्रत्येकास माहित आहेतच. पण या प्रत्येक गोष्टींत काही बारीक बारीक अशा कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत ज्या पुस्तक हाती घेण्याआधी आपल्या विचारांतही नसतात किंवा वर्षानुवर्षे आपण या प्रश्नांची उत्तरे शोधत आलो आहोत पण जी अजूनही अनुत्तरीत आहेत. उदाहरणार्थ कुंतीला ही पुत्रप्राप्ती नक्की कशी झाली ? सारथ्याच्या घरी कर्णाचे बालपण कसे असेल? शोण म्हणून असलेला राधेचा मुलगा या कर्णासोबत कसा वागत होता? कर्णाची पत्नी वृषाली नक्की कशी होती.त्यांच्यातील प्रीतीचे क्षण कधी फुलले होते कि इंद्राला कवच कुंडल दान केल्यानंतर निस्तेज झालेल्या कर्णाप्रमाणे त्याचे प्रेमजीवनही कोमेजलेले होते? सूर्याचा पूत्र असूनही त्याने धर्माच्या विरोधात अधर्मी दुर्योधनास नेहमी साथ का दिली….केवळ मैत्रीसाठी? द्रौपदी वस्त्रहरणात त्याने द्रौपदीचे रक्षण नक्की का केले नाही ? अभिमन्यूला धर्माविरुद्ध जात मारणाऱ्यात कर्ण का सामील झाला ? खरेच तो अधर्मी होता ? जर असे होते तर मग श्रीकृष्ण विरुद्ध पक्षात असतानाही त्याने या सूतपूत्राचा अंतिम संस्कार करण्यात रस का दाखवला? जसजसे आपण एकेक पान वाचत जावू तसतसा हा हळूहळू उलगडत जाणारा खुलासा आपल्याला जागीच खिळवून ठेवतो.
आजचा तरुण व प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने अवश्य वाचावी अशी हि मराठी साहित्यातील सावंत यांनी लिहिलेली अमर मृत्युंजय कादंबरी आहे.
