आयुष्याचे धडे गिरवतांना

By Murty Sudha

 हे पुस्तक २० हून अधिक लहान लहान गोष्टींचा एक रंजक आणि वळणदार स्त्रोत आहे. सुधा मूर्ती या जेव्हा इन्फोसिस फाऊडेशन च्या मदतीने समाजासाठी काम करत होत्या, त्यावेळी त्याच्यासोबत घडलेल्या लहानसहान घटना, त्यांनी भेटलेली अनेक प्रकारची, विविध ढंगाची माणस आणि त्यांचे स्वभाव, त्यातून निर्माण होणारे अनेक प्रसंग हे सर्व लेखिकेने अगदी उत्तम टिपले आहेत.

Price:  
₹150
Share

Book Reviewed by
Miss Ashwini Rajendra Deshmukh, Alumni, TYBA,
MVP’s KSKW Arts, Science & Commerce College Cidco, Nashik.

आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे व सगळ्यांसाठी आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आयुष्यातील अनेक संकटांना समोरे जावे लागते. त्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे नानाविध लोक भेटतात. जीवनाच्या प्रत्येक टप्प्याने माणसे घडत जातात. त्यामध्ये “सुधा मूर्ती” यांनी आपल्या आयुष्यातील काही अनुभव या पुस्तकाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५० मध्ये झाला. त्यांनी विज्ञान संगणक यामध्ये शिक्षण घेतले. व त्या ‘टेस्को’ कंपनीमध्ये नोकरीस लागल्या.

आयुष्याचे धडे गिरत असताना माणसाला अनेक प्रकारच्या संकटांना समोरे जावे लागते. शिक्षण घेत असताना माणसाला नानाविध  समस्या येतात. कधी यश तर कधी अपयश. सुधा मूर्ती यांनी या पुस्तकाद्वारे आपले अनुभव मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आपल्या दोन मुलांना दोन धर्मांने वाढवले. त्यांच्या सहाय्य्क वृत्तीने त्यांना भारत सरकारकडून ” पदमश्री ” हा पुरस्कार प्राप्त झाला. त्या एकदा रेल्वेने प्रवास करत होत्या. त्यात अतिशय गर्दी होती. डबा हा फक्त लेडीजसाठी होता पण गर्दीमुळे त्यामध्ये पुरुष व इतरही माणसे होती. टीसी तिकिट चेक करत करत त्यांच्याजवळ आला. त्यांच्या अगदी जवळच एक मुलगी होती तीने तिकीट ही काढले नव्हते. आणि कुठल्याही प्रश्नाचे उत्तर न देत ती शांत होती. त्यांनी तिला फार विचारले पण ती फक्त शांत बघत होती. सुधा ताईंनी तिचे तिकिट काढले. तिचे कपडेसुद्धा अस्ताव्यस्त होते, ती अतिशय दुःखी मनाने ताईंजवळ आली. बंगरूळ चा स्टॉप आला सगळी रेल्वे खाली झाली ती काही उतरेना म्हणून ताईंनी तिला विचारले तर ती त्यांना बोलली मी या जगात एकटी आहे. ती त्यांना विनवणी करू लागली, ताईंना प्रश्न पडला काय करायचे, त्यांनी तिला आपल्या घरी नेले. व काही दिवसांनी त्यांनी आपले असलेले अनाथ आश्रम यामध्ये तिचे नाव दिले काही दिवसांनी ती तिथे आनंदी राहू लागली. अभ्यासात अतिशय हुशार असल्याने सुधा ताई तिच्याकडे लक्ष देवून काही कमी न पडता तिला हवे ते मिळावे हे तेथील असलेल्या शिक्षकांना सांगितले.

आयुष्य म्हणजे नेमके आहे तरी काय, आयुष्य हे सुख, दुःख, चढ उतार यांनी बनलेले असते. अनेकदा दुःख येते माणसे खचून जातात. दुःखामध्ये माणसाने स्वतःला सावरून आलेल्या संकटांना सामोरे जावे.भलेही आपल्याला कितीही हसले तरी त्याकडे दुर्लक्ष करीत आपण आपले काम प्रामाणिकपणे व प्रयत्नपूर्वक करावे. आपले ध्येय साधत आपण आपल्या मार्गाने जाण्याचा प्रवास सुरु करायचा असतो. बोलणारे, हसणारे खूप असतात. या सर्वांमधून जगाला तोंड देत व सगळ्यांचे मन धरत स्वतःला सांभाळत जो काही करण्याची उम्मेद जागी करतो तो खरा आयुष्याचा धडा गिरवत रेखाटत आहे, असे आपल्याला समजते.

आयुष्य म्हणजे हा एक खेळ आहे, यामध्ये अपयश जेव्हा येते तेव्हाच यश काय असते हे समजते. माणूस स्वतःला बदलवून घेवून आपल्या मार्गाने जातो. यशासाठी अथक प्रयत्न करावे लागता. आपला भार जर दुसऱ्यावर असेल तर त्याचे सार्थक झाले पाहिजे असे नेहमी मनात ठेवूनच पुढे चालावे.

जीवनात भूतकाळात चांगले झाले की, वाईट याचा विचार न करता भविष्यात व वर्तमानकाळात काय करायचे याचा विचार करावा जेव्हा माणसाला, विद्यार्थ्याला स्वतःचा अनुभव येतो तेव्हा माणूस खरा घडत असतो. ज्या गोष्टीमुळे आपण अपयशी झालो याकडे न बघता नेहमी positive राहून एक आदर्श विद्यार्थी बनावे. जगामध्ये कोणीच चांगले विचार करत नाही. केवळ आपले आई, वडील, भाऊ आणि ज्यामुळे आपण शिकून एकमेव जगात उदाहरण बनतो, ती म्हणजे आपली विद्या, पुस्तक, आपले गुरु.

शिक्षण घेत असताना वेगवेगळे पुस्तक आपण वाचतो. बोध कसा घ्यायचा हे आपल्यावर अवलंबून असते. आयुष्यामध्ये सुधा मूर्ती या एक एकमेव उदाहरण आहे. अतिशय चांगल्या प्रकारची सरकारी नोकरी असून सुद्धा त्यांनी ज्यांना आधार नाही शिक्षण घेण्याइतकी परिस्थिती नाही अशा विध्यार्थ्यांना त्यांनी आपली माणसे माणून आधार दिला. प्रत्येक माणसाने जर सुधा मूर्ती यांच्यासारखे वागले पाहिजे. जगात असे उदाहरण नेहमी लक्षात ठेवा की, ज्यांच्यामुळे आपण उदमीत होवून स्वतःसाठी व दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगले कर्म करू शकतो.

सुधा मूर्ती ह्या नेहमी हसऱ्या व पटकन कोणाचीही मदत करणाऱ्या होत्या. त्यांनी हे पुस्तक लिहिताना आपले मत व स्वाभाविक भावना मांडला. त्यांची साध म्हणून अनुवाद  “लीना सोहोनी” यांनी केले. प्रत्येक संकट हे आपल्याला घडवण्यासाठी असते असे समजून जगावे. म्हणतातना  ” अपयश ही यशाची पहिली पायरी असते”. म्हणूनच अपयशाकडे यश म्हणून बघावे हे ताईंनी आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमाद्वारे सांगितले. जे आयुष्यात स्वतःबद्दल नेहमी चांगला विचार करून राहतात. अपयशाकडे दुर्लक्ष करून आपल्या कमतरता भरून काढता व नवी उमेद स्वतःमध्ये निर्माण करतात तोच खरा व्यक्ती असे त्या सांगतात.

उदाहरण सांगायचे ठरले तर जिजाबाई आणि शिवाजीराजे यांचे घ्यावे. अतिशय संकटे समोर असताना देखील जिजाबाईंनी आपल्या पोटात असलेल्या शिवाजीला चांगले धडे देवून  एक चांगला पुत्र बनविला. शिवाजी राजांना आपल्या मातेच्या संस्कारांचा सन्मान ठेवत जगासाठी लढले. तसेच जर प्रत्र्येक व्यक्तीने आपल्या पुत्राला बनवावे व मुलीला जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई यांच्या सारखे घडवावे. कोणीही स्वतःमध्ये कमीपणा न घेत जगावे. कोणीही पूर्णपणे अगदी उत्तम नसते. जन्माला आल्यानंतर माणूस संस्कारांनी घडतो. उत्तम जीवनात आपल्या गुरूंचा हातभार असतो.

भारतीय संस्कृतीमध्ये माणूस हा संस्काराने घडविला जातो. आपण आपल्या गुरु, आई, वडील यांच्यामुळे या जगात आपले स्थान निर्माण करतो. त्यांना कधीही विसरू नये. हे भारतीय संस्कृतीमध्ये सांगितले जाते. सुधा मूर्तींनी  हे समोर ठेवून समाज कार्य चालू केले. त्या अतिशय प्रेमळ, शिस्तप्रिय होत्या. मानवाने आपल्या मधील वाईट गुण, सवयी काढून नवनवे   संकल्प करून जगावे. जसे आपण आपल्या शरीरातील नको असलेले पदार्थ वेळच्या वेळी काढून टाकतो तसेच आपल्या शरीरातील अवगुण, सवयी काढून टाकाव्यात.

सुधा मूर्ती सांगतात, ज्यांच्याकडे खूप पैसा, श्रीमंती असते, अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल. धन दौलत, पॉपर्टी असते, अशा लोकांनी आपले जीवन कशा प्रकारे घालवावे हे यामध्ये सुधा मूर्तींनी दाखवून दिले. वेळेचा उपयोग योग्य प्रकारे कसा करावा, हे यामध्ये त्या सांगता.

आयुष्यामध्ये वेळ ही कधीही परत येत नाही, गेलेला पैसा धन, ऐश्वर्य मिळवता येते, पण माणसे आणि वेळ ही कधीही थांबवता येत नाही. याचा नेहमी सदुपयोग करावा असे त्या सांगतात. त्यांनी आपल्याला हे सुद्धा दाखवून दिले की, अडचणीत असलेल्या माणसाला आपण मदत करावी नाही की, त्याला बघून हसत पुढे जावे.

आयुष्यात अनेक प्रकरचे लोक भेटतात काही न बोलणारे, काही तर बोलणे न थांबवणारे मग अशा लोकांबाबत आपण काय सांगाल हे यामध्ये शिकायला मिळते. प्रत्येक माणसामध्ये विविध गुण व सुप्त गुण लपलेले असतात ते कसे जगासमोर मांडण्यात येईल हे यामध्ये त्यांनी अतिशय छानपणे मांडले. आयुष्याबद्दल अनेक लेखकांनी कविता केल्या. पण खरच सांगा आयुष्याबद्दल कधी कविता होवू शकते का? नाही, आयुष्याबद्दल कविता केली तर ती शक्य नाही. आयुष्य हे तीन चार शब्दांएवढे नाही. आयुष्य हा शब्दच असाच आहे की तो दोन शब्दांचा मिळून झाला आहे. म्हणजेच आयुष्यात जगताना आपल्या मार्गदर्शनाची, ज्ञानाची व महत्वाचे म्हणजे समोर घडत असलेल्या उदाहरणांची गरज असते. आयुष्य हा काही खेळ नसतो हे यामध्ये आपल्यासमोर मांडतात. विविध पुस्तके वाचून स्वतःला उत्तेजीत करावे, अनुभवातून माणूस जगासमोर येतो. जगात आपल्या समवेत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करावा. प्रत्येकासोबत हसत राहावे. गरजू व्यक्तींना प्रत्येक वेळी मदत करावी असे त्या यातून मांडण्याचा प्रयत्न करतात. आपण स्वतःला घडवायचे कसे हे आपल्या स्वतःवर अवलंबून असते.

शेवटी फक्त हेच वाटते, डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम, शिवाजी महाराज इ. अनेक व्यक्तींचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून आपण आपल्याला घडविण्याचा प्रयत्न करावा.

आयुष्याचे धडे गिरवताना ह्या पुस्तकाचे वाचन केले. त्यातून फक्त एवढेच लक्षात आले की, माणूस हा आपल्या विचारांनी आणि आपल्या गुणांनी मोठा होतो. जगात नेहमी खरे राहावे. कुणाशीही तुलना करू नये, असे त्या सांगतात. धन्यवाद सुधाताई तुमच्यामुळे जगण्यात नवी उमेद निर्माण झाली व काहीतरी करावे वाटते. व नाव उज्ज्वल करून एक छान, स्वच्छ व्यक्तिमत्व बनवावे अशी एक इच्छा मनात आहे.

 

Original Title

आयुष्याचे धडे गिरवतांना

Series

Publish Date

2013-01-01

Published Year

2013

Total Pages

160

ISBN 10

8184984871

ISBN 13

9788184984873

Format

Paperback

Country

India

Language

मराठी

Translator

सोहनी लीना

Dimension

21*14

Weight

213gm

Avarage Ratings

Readers Feedback

आयुष्याचे धडे गिरवतांना
महिमा दत्तात्रेय सोमवंशी, कॉम्पुटर इंजिनिअरिंग

महिमा दत्तात्रेय सोमवंशी, कॉम्पुटर इंजिनिअरिंग

January 21, 2025January 21, 2025

Submit Your Review