Availability
available
Original Title
शेती इस्राईलची
Subject & College
Publisher, Place
Total Pages
232
ISBN
81-7434-266-4
Format
Paperback
Country
India
Language
Marathi
Average Ratings
Readers Feedback
शेती इस्राईलची
Review By Prof. (Dr.) Arjun Baban doke, Professor, Baburaoji Gholap College, Sangvi, Pune-27 अतिशय ग्रामीण मातीशी आपले नाते जुळलेले एक प्रतिभावंत लेखक सुधीर जगन्नाथ भोंगळे...Read More
Prof. (Dr.) Arjun Baban doke
शेती इस्राईलची
Review By Prof. (Dr.) Arjun Baban doke, Professor, Baburaoji Gholap College, Sangvi, Pune-27
अतिशय ग्रामीण मातीशी आपले नाते जुळलेले एक प्रतिभावंत लेखक सुधीर जगन्नाथ भोंगळे यांचे स्वलिखित पुस्तक म्हणजे शेती इस्राईलची 1993 रोजी ॲग्रीटेक या इस्राईल मधील जागतिक शेती प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर त्यातूनच हे पुस्तक जन्माला आले आहे. लेखक, यांनी दैनिक सकाळमध्ये आपली वृत्तपत्रीय कारकीर्द सुरू केली आणि एक धडाडीचे पत्रकार म्हणून नावारूपाला आले. पत्रकार ते संपादक असा प्रवास केला आणि आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवला
इस्राईल एक असा देश की ज्याला क्वचितच कोणी ओळखत नाही किंवा माहित नाही असे होईल अन्यथा विसाव्या शतकामध्ये आणि एकविसाव्या शतकामध्ये त्याची एक धगधगती भूमी म्हणून ओळख सर्वांना ज्ञात आहे परंतु तो असाही एक देश आहे की जो संपूर्ण युरोप खंडाला भाजीपाला आणि फळे पुरवतो.
निसर्गाशी फारशी कृपा नसलेल्या भूप्रदेशावर जवळपास संपूर्ण जगाने नाकारलेल्या (खरे तर हाकललेल्या) मुठभर माणसांनी स्वतःच्या कर्तुत्वाने अथक परिश्रमाने, कल्पकता आणि विज्ञानाची सांगड घालत, देशभक्तीच्या जोरावर इस्राईल हे राष्ट्र उभे केले खरे तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या प्रकारचे हिंदू राष्ट्र अभिप्रेत होते नेमके त्याच पद्धतीचे आणि देशभक्तीची कणखर धार असलेल्या विचारांशी जुळणारे असे हे यहुदी धर्मियांचे राष्ट्र. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला तर ते पुणे, अहिल्यानगर आणि संभाजीनगर या तीन जिल्ह्या एवढेच भौगोलिक क्षेत्रफळ. पर्जन्यमानाचा विचार केला तर अत्यल्प तरीही जगामध्ये समृद्ध शेती ज्या देशांमध्ये केली जाते त्या देशामध्ये प्रथम क्रमांक यांचाच.
लेखक, ॲग्रीटेक 1993 हे इजराइल मध्ये भरलेले सातवे आणि जगातले बारावी आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर इजराइल मध्ये केली जाणारी शेती आणि त्या शेतीमधील आधुनिकता याविषयी पुस्तकामध्ये सविस्तर विवेचन केलेले आहे.
पुस्तकामध्ये एकूण 11 प्रकरणे असून ही प्रामुख्याने राष्ट्राची निर्मिती, जलसंपत्ती, उच्च तंत्रज्ञान, फळबागांची उभारणी, ग्रीन हाऊस प्रकल्प, भाजीपाला उत्पादन, फुलांची शेती, किडीवरील जैविक नियंत्रण, कौशल्य पूर्ण निर्यात आणि कुक्कुटपालनाची जोड याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
ईतभर जमीन तीही वाळवंट सततची पाणी टंचाई प्रतिकूल निसर्ग आणि युद्धाचे टांगती तलवार ही सर्व आव्हाने स्वीकारली आणि केवळ कष्ट जिद्द कल्पकता या जोडीला प्रखर देशभक्ती आणि विकासाची तळमळ यामुळे इजराइल मध्ये शेतीचा प्रचंड विकास झाला आणि तो जगाने पाहिला ही या विकासाची नेमकी दिशा कोणती होती? स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा इजरायने स्वीकार केला आणि त्यात शेतकऱ्याचा आणि सरकारचा कसा सहभाग होता. ठिबक सिंचन ग्रीन हाऊस नवे तंत्रज्ञान संगणकीय नियंत्रित सिंचन पद्धती, जैविक नियंत्रण, निर्यात बाजारपेठ आणि व्यापार अर्थशास्त्र या सर्व आघाड्यांवरती इस्राईलने आज नेत्र दीपक प्रगती करून जागतिक बाजारपेठेमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. हे या पुस्तकाच्या वाचनातून आपल्या सहज लक्षात येते तसे पाहिले तर सकाळचे संपादक म्हणून लेखकाने हे पुस्तक महाराष्ट्रीयन लोकांसाठी मराठीमध्ये लिहून प्रकाशित केलेले आहे.
पुस्तकांमध्ये आधुनिक शेतीबरोबरच पाणी देण्याच्या पद्धती आणि शेती कसण्याच्या पद्धती यामध्ये अमोलाग्र असा बदल सुचविलेला आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राला भेडसावणारी समस्या म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या आणि अशा पार्श्वभूमीवर या पुस्तकाचे वाचन व अकलन या समस्येवरती उपाय ठरू शकते. अर्थातच वाचून समजून घेणे हे व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकते तरीही शेती सुधारणा करण्यासाठी हे पुस्तक एक मैलाचा दगड ठरते.
लेखक सुधीर भोंगळे व प्रकाशन राजहंस प्रकाशन यांनी एक शेती विषयीचे आधुनिक तंत्रज्ञान महाराष्ट्रीयन लोकांना माहिती करून दिले याबद्दल त्यांचे धन्यवाद वाचकांनी जरूर हे पुस्तक वाचावे.
