ताओ' एक जीवनशैली "जगावं कसं?
By वाघ. बी जी
आयुष्य तारेवरची कसरतच. उणीव जाणुन घेतल्याशिवाय आपण कुठं कमी पडतो हे जाणुन घ्यायचे असेल तर त्याच्या मुळाशी जाणं महत्वाच. मनुष्य अखेरच्या श्वासापर्यंत एका खोटया संकल्पनांनी जखडलेला असतो. मृगजळाला सत्य समजुन संघर्षाची सुरुवात करून जन्माला येते मन, मनाच्या या अज्ञानाच्या कोठारात आठवणी हया पुसट दाट असतात. संवेदन शुन्य घटक जेव्हा एकत्र येतात व आयुष्याची सारी गृहितके कोसळून पडतात. वैचारिक चिंतनसुत्रे म्हणजेच एक बंडखोर तत्वज्ञान. व्यक्तीने स्वतःला विवारले पाहिजे विकासासाठी मार्ग कोणता आहे. सभोवताली चांगल्या वाईट गोष्टी आहे त्यावर विजय मिळवता नाही आला तर जगायचं कस ?
अभिजित महादेव चव्हाण, LL.M, 2nd year.
Department of law, SPPU.
शेवट झाल्यानंतर प्रारंभ चांगला सुरू होतो मग ते आयुष्य तारेवरची कसरतच. उणीव जाणुन घेतल्याशिवाय आपण कुठं कमी पडतो हे जाणुन घ्यायचे असेल तर त्याच्या मुळाशी जाणं महत्वाच. मनुष्य अखेरच्या श्वासापर्यंत एका खोटया संकल्पनांनी जखडलेला असतो. मृगजळाला सत्य समजुन संघर्षाची सुरुवात करून जन्माला येते मन, मनाच्या या अज्ञानाच्या कोठारात आठवणी हया पुसट दाट असतात. संवेदन शुन्य घटक जेव्हा एकत्र येतात व आयुष्याची सारी गृहितके कोसळून पडतात. वैचारिक चिंतनसुत्रे म्हणजेच एक बंडखोर तत्वज्ञान. व्यक्तीने स्वतःला विवारले पाहिजे विकासासाठी मार्ग कोणता आहे. सभोवताली चांगल्या वाईट गोष्टी आहे त्यावर विजय मिळवता नाही आला तर जगायचं कस ?
जीवन जगायला स्वत. ला मुक्त केले पाहिजे. तेजस्वी जागत नेतृत्व समानाला अपेक्षित आहे. आपण नियंत्रण कक्षेच्या बाहेर डोकावुन पाहत नसू तर काही काळाने समीकरणे बदलणार, चिंतनसुत्रे उरणार ! धर्मशास्त्र सांगते निरिक्षणातुन मनुष्य हुशार व प्रगल्भ बनतो. विवेकाच्या योगे सर्वांची ओळख होऊन वाटचाल सुखमनोहारी होते. एखादया जिवाकडील ज्ञान हे विकासाचा आग्रह करू शकते पण परंपरा भिन्न स्वरूपाच्या असतात. एकटक पाहणारे कशाला ही अंतर्मुख न होता जेव्हा ते हृदय आणि मन हे एकच आहे हे समजल्यावर लौकिक जग म्हणजे त्याचे प्रतिबिंब आहे म्हणजेच प्रतिछाया जीवन कस जगावं हा चालु असलेला प्रवास सांगतो की, भौतिक जगाची उपेक्षा करून सत्याची साथन करू शकत नाही. स्वतःला जाणून घेण्यासाठीची धडपड असते. मग भावनिक सुखाचा शोध घेणारे अंधाराला का घाबरत असावे ? वस्तुस्थितीची अनेक रूपे असतात म्हणजे अंधाराला प्रकाश आणि प्रकाशाला अंधार म्हटले तर दोघांना एकमेकांचा अभाव जाणवेल, काही नियमांना अपवाद नाही मग सुरुवात कुठून आणि कशी करावी हयासाठी वेळ अनुकूल असेल नसेल. निर्सगाची एखादी किमया जीवन जगण्याच्या प्रवाहाला आधुनिक पध्दतीने जीवन तत्वाचा वापर करून समाधान पुरेसे नसते. वेदनेचा वापर अमर्याद भ्रामक वृत्तीने न पाहता हित कल्याण व सुसंवाद सहनिर्मिती असेल त्यापेक्षा चांगल्या ठिकाणी मुक्काम करतो त्याची फलश्रुति एक सखोल अनुभूतीचा जन्म घेऊन प्रवासाच्या हेतूने चालायला लागते.
थांबून घ्यावं हे निसर्गाला मान्य नसावे म्हणजे घडयाळ बंद जरी पडले तरी कालचक्र सुरू राहते पण कायम गतिशील राहिल्याने माणूस परावर्तित होतो. झाडाच्या फांदीला बांधलेला एखादा झोका तीव्र गती मिळाल्यानंतर त्याच वेगाने पुनः माघारी स्तब्ध होतो. जीवनाला आरंभ आहे तर अंत असणारच ! आठवणीचे बंध तोडणे इतके सोप्पे नसते. माणसे, क्षण, स्वप्ने ही हृदयात रक्तासारखी वाहत राहतात. थांबणे म्हणजे संपणे व न बदलणे म्हणजे मृत्यु. माणसाचे तत्वज्ञान, संस्कृती, धर्म, विज्ञान हे विश्वाचे रहस्य आहे. किर्तीच्या लाभापोटी जे जीवन साधना करतात ते सुध्दा विफल होतात. जर दूर वर गेलो तरी परताव लागतं, आनंदमयी आणि समाधानी जगण्यासाठी कुठल्याही श्रीमंतीची गरज नसते. कठोर श्रमाने आनंदी जीवन जगता येते. पैसा हे फक्त विनिमयाचे साधन आहे. एकेरी मनुष्य हा विसंवाद झाल्यानंतर तो स्वतः मध्ये हरवून जातो आणि देवाचा शोध घेऊन चुकीचा विचार करून दुखी होतो. माणसाच्या अमर्याद शक्ति अशांततेने जगाला जिंकण्यापेक्षा ज्ञान विवेक व संयमाने जिंकणे उत्तम ठरते. संकल्प विफल ठरले की विकल्प मिळत नाही. हे सुंदर जग आपण निर्माण केल्याने त्याला जबाबदार आपणच आहोत, सकाळ झाली म्हणून कधी सुर्य उगवत नसतो, सुर्य उगवला म्हणून सकाळ होते. स्वामित्व भावना आली की सत्ता येते आणि सोबत दुर्गुणही येतात. जिथे स्वामित्वाची भावना नाही तिथे नेतृत्व विश्व वंदनीय असते कारण ते नेतृत्व स्वयंभू आणि स्वयंपूर्ण असते.
अपेक्षा त्रासाचे उगमस्थान आहे, जिवंतपणी मनमुराद आयुष्य जगू न देणारे लोक सुध्दा आपल्या अंत यात्रेत सामील होतात. निःस्वार्थी मनुष्य हा कसलीही अपेक्षा न करता तो आनंद देतो. त्याच्यात प्रामाणिकतेचा शृंगार असतो, त्याच्या मनात व्देष नसतो. जग बदलायचे असेल तर मानवी अस्तित्वाचा सन्मान करा आपोआप विकासाचे मार्ग सापडतील. सामर्थ्य सुध्दा पराजित होत, जर त्याचा आधार अधर्म असे ! आयुष्यात स्वतः विरूध्द लढले पाहिजे. कुठलेही ध्येय नसेल तर समाजात वागणे उथळ होऊन जाते. जगाव कस हा मंत्र आयुष्य अमर्यादित करून देतो. पोकळ आनंदाचे प्रदर्शन करून महोत्सव मानून घेणे हा याचा अर्थ नव्हे, जीवनात आनंदाची निर्मिती ही गांर्भीग्रातून होते. माझ्याकडे कुठलाही पर्याय उपलब्ध नाही म्हणून तक्रार करत बसू नका, की एकटयाने प्रवास करतोय, कारण हयाच वेळी स्वतःला सिध्द करण्याची वेळ असते. ध्येयाचे गांभीर्य नसेल तर आयुष्याचा पाया कमकुवत राहतो. दिशाहीन सामर्थ्य म्हणजे नकारात्मक उर्जा. ज्ञान एकटे येत नाही ते त्याच्या असण्याचा अहंकार सुध्दा जन्माला घेऊन येतो, जोवर हा त्याग साधत नाही तोवर त्या ज्ञानाचा प्रारंभच होत नाही. ज्ञानी असाल तर शब्द व अनुभवी असाल तर ‘अर्थ’ समनतात. उलट प्रवास आपण करू शकत नाही. लाभलेला प्रत्येक क्षण मोलाचा आहे. वृध्दत्वाकडून तारुण्याकडे मग बालपण अस न होता, नीवनाकडून मृत्युकडे प्रवास होतो याची जाणीव होते तो खरा ज्ञानी.
अति महत्वकांक्षा अधःपतनाचे कारण व सन्मान प्राप्त करून घेणे ही माणसाची मुळ आकांक्षा. इमानदारीची जाणव असेल तर विकास होतो. आंधळ्या आकांक्षा जन्मत नाही. ज्यात फक्त प्रेम जिव्हाळा, आपुलकी, स्वर, आर्तता, वेदना इ. समावेश असतो. तसेही प्रेमात अपरिमित दुःख भोगल्याशिवाय जीवनाचा व मरणाचा अर्थ कळू शकत नाही. प्रेम माणसाला अस्तित्वाच्या मुळाशी नेते व सगळं विस्कळीत करून सोडते, धरणीकंप झाल्यासारखं. प्रेमाच्या जीवघेण्या अनुभवापुढे जीवन शून्य व मरणाचा काळोख घनगर्द होऊन युध्द सुरू राहते. प्रेम जाणणारे जीवन जाणतात व प्रेमावर विजय मिळवणारे मृत्यूवर विनय मिळवतात. प्रेम करणारे बंडखोर आत्मे कधी विध्वंसक तर कधी विधायक होतात. त्यातून विश्वात्मक करूनेचा जन्म बंधना पलीकडचे ने जखमी हृदय संपुर्ण जगाला भरभरून प्रेम देतात ते क्रांतिकारी होतात किंवा संत महात्मे.