पाश्चिमात्त्या तत्त्वज्ञानाची कहाणी

By साने गुरुजी

Share

Original Title

पाश्चिमात्त्या तत्त्वज्ञानाची कहाणी

Publish Date

2012-01-01

Published Year

2012

Total Pages

582

Language

MARATHI

Readers Feedback

पाश्चिमात्त्या तत्त्वज्ञानाची कहाणी

पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी हे पुस्तक साने गुरुजी यांनी विल ड्युरंट यांच्या ‘The Story of Philosophy’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचा अनुवाद केला आहे. हे पुस्तक चरित्र प्रकारात...Read More

Karale shrddha Dilip

Karale shrddha Dilip

×
पाश्चिमात्त्या तत्त्वज्ञानाची कहाणी
Share

पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी हे पुस्तक साने गुरुजी यांनी विल ड्युरंट यांच्या ‘The Story of Philosophy’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचा अनुवाद केला आहे. हे पुस्तक चरित्र प्रकारात मोडते. या पुस्तकाचे लेखक साने गुरुजी आहेत. या पुस्तकात 582 पृष्ठे आहेत. या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती मार्च 2012 मध्ये प्रकाशित झालेली आहे. प्लेटो, अॅरिस्टॉटल, बेकन, व्हॅाल्टेअर, कान्त, शोपेनहॉवर, स्पेन्सर, नित्शे आणि समकालीन अमेरिकन तत्त्वज्ञानाची कहाणी 11 प्रकरणे आणि 138 उपविभागांत सांगितलेले आहे. या पुस्तकात मानवी इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी मांडलेले आहेत. त्या -त्या घडामोडीतील महत्त्वाच्या व्यक्तींच्या घडामोडी रंगवलेल्या आहेत. या पुस्तकाची किंमत 570 रुपये आहे. रिया पब्लिकेशन, कोल्हापूर यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
यामध्ये प्लेटो ची माहिती दिलेली आहे. सॉक्रेटिसची भेट प्लेटोच्या जीवनात क्रांती कशी घडून आणली याचे विश्लेषण दिलेले आहे.प्लोटोचे खांदे रुंद होते म्हणून त्याला प्लेटो असे म्हणतात.इस्थामिअन खेळात त्याने दोनदा बक्षिसे मिळवली होती. प्लेटो म्हणतो की मी इतर रानटी लोकांत न जन्मता ग्रीस देशात जन्मलो याबद्दल देवाचा मी आभारी आहे. गुलाम न जन्मता मी स्वतंत्र मनुष्य म्हणून जन्मलो. स्त्रीचा जन्म न घेता मी पुरुषजन्म घेऊन आलो. याबद्दल मी देवाचा आभारी आहे. परंतु सर्वात अधिक आभार जर कोणत्या गोष्टीविषयी मानायचे असतील तर ते यासाठी की, ज्या काळात सॉक्रेटिस होता त्या काळात मी जन्माला आलो. यावरून प्लेटोचे देशाविषयीची प्रेम दिसून येते. प्लेटो समाजाला थोडा अवघड वाटतो कारण त्यांनी काव्य आणि तत्वज्ञान एकमेकात मिसळून टाकली आहेत.
अॅरिस्टॉटल व ग्रीक शास्त्र याबद्दल माहिती दिलेली आहे. अॅरिस्टॉटलच्या विचारांवर प्लेटोच्या विचारांची खूप मोठी छाप पडली आहे. प्लेटोने अॅरिस्टॉटलला व्यापिले आहे. अॅरिस्टॉटल हा शिक्षक होता. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी लायसियम नावाने संस्था स्थापन केली. अॅरिस्टॉटल यांनी फार मोठे लिखाण केलेले आहे. काही पुस्तके त्यांच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेले आहेत. त्यांनी तर्कशास्त्र विषयाचे देखील लिखाण केले आहे.
फ्रॅन्सिस बेकन यांचा जन्म 1561 मध्ये लंडनमध्ये झाला. बेकन हा विज्ञानवादी होता. बेकनची तत्त्वज्ञानाची पुस्तके फार मोठ्या प्रमाणात वाचली जात नसली तरी, त्याचे ज्ञान अफाट होते. बेकन असे म्हणतो की माणसे म्हणजे केवळ उभी राहणारे प्राणी नाहीत, तर ते अमर असे देव आहेत. या सर्व जगाला पुरतील असे आत्मे, एवढेच नाही तर सर्व जग जरी मिळाले तर त्यांने तृप्त न होणारे आत्मे विधात्याने आपणास दिलेली आहे. मनुष्याला सर्व काही शक्य आहे.
या पुस्तकात स्पिनोझा याचे विचार आहेत. स्पिनोझा जन्म एका व्यापारी कुटुंबात झाला होता. तो अति बुद्धिमान विद्यार्थी होता. ईश्वर व ईश्वर एकरूप आहेत हा विचार त्याला फार आवडला. स्पिनोझाला ज्यू जातीपासून बहिष्कृत करण्यात आले होते. तरी त्यांनी ते मोकळे मानाने स्वीकारले. स्पिनोझाचा नीतीशास्त्र हा ग्रंथ मरणानंतर छापला गेला. व्हॅल्टेअर अभिनय शिकवित होता. व्हॅल्टेअर असे म्हणतो की या जगातील जीव सुसह्य व्हावे म्हणून कामाला जीवन वाहिले पाहिजे. आत्महत्या टाळायची असेल तर नेहमी काहीतरी करीत राहावे. अशा विविध तत्त्वज्ञानाची माहिती या पुस्तकात असल्यामुळे हे पुस्तक वाचताना मन एकाग्र होते यातून जागतिक तत्त्वज्ञान ची माहिती मिळण्यास मदत होणार आहे

Submit Your Review