ए पी.जे अब्दुल कलाम संपूर्ण जीवन

By Arun Tiwari

Share

Availability

available

Original Title

ए पी.जे अब्दुल कलाम संपूर्ण जीवन

Subject & College

Series

Publish Date

2016-01-01

Published Year

2016

Publisher, Place

Total Pages

496

ISBN 13

9789386204028

Format

PAPERBACK

Language

Marathi

Average Ratings

Readers Feedback

ए पी.जे अब्दुल कलाम संपूर्ण जीवन

Name of the Reviewer: Khushi Raosaheb Randhir Name of the College: Nowrosjee Wadia College, Pune ए. पी. जे अब्दुल कलाम, संपूर्ण जीवन या पुस्तकाचे •...Read More

Khushi Raosaheb Randhir

Khushi Raosaheb Randhir

×
ए पी.जे अब्दुल कलाम संपूर्ण जीवन
Share

Name of the Reviewer: Khushi Raosaheb Randhir
Name of the College: Nowrosjee Wadia College, Pune
ए. पी. जे अब्दुल कलाम, संपूर्ण जीवन या पुस्तकाचे • एकूण सहा भाग आहेत, या पुस्तकाचे लेखक अरुण तिवारी हे आहे. या सहा भागांपैकी पहिला भाग ‘नांदी’ हा आहे आणि तो अॅरिस्टॉटलच्या (माणूस हा निसर्गतःच एक समाजप्रिय प्राणी आहे, या वचनावर आधारलेला आहे. या भागातील आठ प्रकरणांमध्ये कलाम यांची बालपण ते प्रौढावस्थेपर्यंतची वाढ चित्रित केली आहे. दुसरा भाग निर्मिती, हा आहे त्यात
कलामांची एरोस्पेसमधील वर्ष वर्णन केली आहेत. तिसरा भाग जाणीव हा आहे. त्यामध्ये त्यांनी भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या केलेल्या नेत्तृत्वाचे • सविस्तर वर्णन केले आहे. विस्तार, हा चौथा भाग आहे आणि त्यात कलाम यांच्या आयुष्यातील दिल्ली येथे वैज्ञानिक नोकरशहा म्हणून घालवलेल्या कालखंडाचे वर्णन आहे यात भारताच्या फारशा यशस्वी न झालेल्या हलक्या लढाऊ विमान प्रकल्पाच्या – इंडियन लाइट कॉम्बैट एअरक्राफ्ट प्रोजेक्टच्या – अपयशामागील कारणे शोधण्यात आली आहेत. या पुस्तकाचे अखेरचे दोन भाग विखुरणे, आणि बंधमुक्तताहे आहेत. यामध्ये त्यांच्या भारताचे अकरावे राष्ट्रपती या भूमिकेतील कालखंडाचे आणि राष्ट्रपती पद सोडल्या नंतरच्या काळात त्यांचा महान लोकनेते म्हणून झालेल्या त्यांच्या उदयाचे चित्रण केले आहे. प्रत्येक युगाचा स्वतःचा असा एक नायक असतो आणि अशा प्रत्येक नायकांची एक कहानी असते. एका नावाड्याच्या मुलापासून भारताचे अकरावे राष्ट्रपती बनण्यापर्यंत त्यांची वाटचाल, आश्चर्यकारक होती त्यांची ओळख मिसाइल मैन आणि जनसामान्यांचे राष्ट्रपती अशी झाली होती आणि त्यांना वैन ब्रॉन पुरस्कार, पदम भूषण, पदम विभूषण, भारतरत्न असे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वीस प्रमुख पुरस्कार मिळाले होते जगातील प्रमुख विद्यापीठ कडून 48 मानद डॉक्टरेट त्यांना देण्यात आल्या होत्या. या पुस्तकामध्ये त्यांच्या त्र्याएंशी वर्षाच्या दीर्घायुष्याचे अगदी काटेकोर बारकाईने वर्णन केले आहे. त्यांनी साध्य केलेल्या गोष्टींची, त्यांच्या महत्वाच्या कामांची, आदर्शाचे आणि वारशाची अचूक माहिती देण्यात आली आहे लेखकाने या पुस्तकात सर्व पुस्तकांसारखी एकसारखी माहीती न देता नविन पध्दतीने अब्दुल कलाम यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटकांवर प्रकाशा टाकला आहे. हे पुस्तक अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत सादर केले आहे. हे पुस्तक वाचून निश्चितच तरुण पिढी तसेच सर्वसामान्य लोकांना चांगला संदेश उर्जा आणि स्फूर्ती भेटेल. संपूर्ण पुस्तक खुप सुंदर आहे पण त्यामधील लेखक, एक, अब्दुल कलाम यांच्या सोबतचा किस्सा सांगतात तो मनाला स्पर्श करुन जातो ते सांगतात “सौराष्ट्रातील सारंगपूर या एका लहानशा गावात एका कडक उन्हाळ्याच्यादुपारी मी त्यांच्या अनुकंपा आणि मायेचा घेतला अनुभव होता, त्या आपले ट्रान्सण्डन्स हे पुस्तक प्रमुख स्वामी महाराजांना भेट देण्यासाठी आले होते, दुपारची वेळ होती डॉ. अब्दुल कलाम, खुप थकले होते. त्या वेळी त्यांच्याकडे एक सहा वर्षाचा मुलगा आला, प्रत्येक जण तेव्हा घाईत होते. तो मुलगा एक कागदाचा तुकडा हलवीत होता, तो मळकट आणि चुरगळलेला होता त्याच्या सुरक्षा कड्‌यातून आत येण्याची कलामांनी परवानगी दिली. त्या मुलाला त्यांची सही हवी होती पण त्याच्याजवळ पेन नव्हता कलामांनी पेन घेतला आणि कागदावर स्वाक्षरी दिली • त्या मुलाने तो कागद निष्काळजीपणे चुरगळून, खिशात ढकलला. डॉ. कलाम हसले आणि म्हणाले लहान मुलाला कधीही निराश करु नका कारण ते आपल्या आयुष्यातील सुरुवातीची वर्ष जगत असते. त्यानंतर एका वृद्धाची इच्छा पूर्ण करुन ते म्हणाले “वृध्द माणसाला कधीही निराश करु नका, कारण ती आपल्या आयुष्याची अखेरची वर्षे जगत असतो.” डॉ. कलाम यांचे जीवन विषयक तत्त्वज्ञान एवढे साथ-सोपे होते. या पृथ्वीतलावर एकही दुःखी चेहरा पाहण्याची त्यांची इच्छा नव्हती डॉ. कलाम यांच्या कारकिर्दीची जडणघडण आणि स्वभाव सर्वकष माहिती, त्यांच्यासोबतचा दिर्ध काळ काम करण्याचा अनुभव यांच्या साहाय्याने अरुण तिवारी ने त्यांची जीवनकथा या पुस्तकामध्ये सांगितली आहे.

Submit Your Review