द ऑडॅसिटी ऑफ होपः थॉट्स ऑन रिक्लेमिंग द अमेरिकन ड्रीम हे बराक ओबामा यांनी 2006 मध्ये लिहिलेले
Read More
द ऑडॅसिटी ऑफ होपः थॉट्स ऑन रिक्लेमिंग द अमेरिकन ड्रीम हे बराक ओबामा यांनी 2006 मध्ये लिहिलेले आत्मचरित्र व राजकीय विचारधारा मांडणारे पुस्तक आहे. या पुस्तकात, ओबामा यांनी त्यांच्या वैयक्तिक प्रवासाचा, राजकीय कारकिर्दीचा आणि अधिक समावेशक व एकत्रित अमेरिकेसाठी त्यांच्या दृष्टीकोनाचा विचार मांडला आहे. वैयक्तिक अनुभवांबरोबरच त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा करताना प्रगती व बदलासाठीच्या त्यांच्या तत्त्वांचा आढावा घेतला आहे.
या पुस्तकांवरून बराक ओबामा एकानव्या वाटेवरच्या राजकारणाची साद घालतात.
समन्वयाचं राजकारण; असे राजकारण जे जनतेतलं सामंजस्य, समान भावना यांच्या पायावर उभं असेल आणि सर्व समाजाला ऐक्याच्या बळावर प्रगतिपथावर घेऊन जाईल अशा समन्वयाच्या राजकारणाची आज सर्वत्र आवश्यकता आहे.
या ग्रंथात अमेरिकेत जगातलं स्थान त्याचप्रमाणे स्वतःच कौटुंबिक जीवन, ‘सिनेट’ मधली कारकीर्द अशा विविध बाबींवर त्यांनी समरसुन आणि प्रांजळपणे लिहिल आहे. ओबामा यांनी रानकारणाविषयी ठाम मत व्यक्त करत असताना, अमेरिकन समाजाला घडविणारा दुर्दम्य आशावादचं त्या राष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर ठेवले, असा विश्वास व्यक्त केला आहे.
बराक ओबामा यांनी व्यक्त केलेला विचार, त्यांची अमेरिकन राजकारणाविषयी अन् राजकारण्यांविषयीची परखड निरिक्षणे आपल्या इथेही दुस्वी वाटत नाहीत.
●वैयक्तिक कथा आणि मुख्य मूल्ये
पुस्तकाच्या सुरुवातीस, ओबामा त्यांच्या बालपणीच्या अनुभवांबद्दल सांगतात. हवाई आणि इंडोनेशिया येथे झालेल्या त्यांच्या बहुसांस्कृतिक संगोपनाची माहिती ते देतात. त्यांचे संघर्ष, शिक्षण घेताना आलेले अनुभव आणि हार्वर्ड लॉ कॉलेजमधून पदवी मिळवून ते सिनेटर होण्यापर्यंतचा प्रवास हा कठोर परिश्रम, सहनशीलता आणि आशावादाचे प्रतीक आहे. हेच मूल्ये त्यांना अमेरिकन स्वप्नावर दृढ विश्वास ठेवण्यास प्रेरित करतात.
●राजकीय विभागणीची समस्या
पुस्तकात ओबामा यांनी अमेरिकन राजकारणातील वाढत्या ध्रुवीकरणावर चर्चा केली आहे. राजकीय मतभेदांमुळे होणाऱ्या अडचणींवर ते स्पष्ट भाष्य करतात, पण विचारांच्या विविधतेचे स्वागत करणे आणि परस्पर सन्मान राखणे किती महत्त्वाचे आहे, हेही ठळकपणे मांडतात. त्यांच्यासाठी राजकीय विभागणी सोडवून लोकांना एकत्र आणणे हे लोकशाही टिकवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
●धोरणांवरील चर्चा
ओबामा यांनी आरोग्यसेवा, शिक्षण, आर्थिक विषमता, परराष्ट्र धोरण आणि सरकारची भूमिका यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी धोरण सुधारणा सुचवल्या आहेत, जसे की स्वस्त व सुलभ आरोग्यसेवा, परवडणारे शिक्षण आणि आर्थिक न्याय. जागतिक राजकारणातील गुंतागुंतीची जाणीव ठेवून त्यांनी संतुलित परराष्ट्र धोरणांची मागणी केली आहे, ज्यामध्ये सैन्यबळा बरोबरच कूटनीतीला महत्त्व आहे.
●आशावादाचा संदेश
द ऑडॅसिटी ऑफ होप या पुस्तकाच्या शेवटी ओबामा यांनी अमेरिकन स्वप्न आणि आशेची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली आहे. ते म्हणतात की सर्व लोकांना समान संधी मिळावी, यासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, सकारात्मक बदल आणि प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न करणे हाच लोकशाहीचा खरा अर्थ आहे.
Show Less