Availability
available
Original Title
अग्निपंख
Subject & College
Publisher, Place
Total Pages
179
ISBN 13
9788174348807
Country
India
Language
Marathi
Translator
शानभाग माधुरी
Print Length
179
Average Ratings
Readers Feedback
More Sayali Rajendra
संगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर विद्यार्थी - मोरे साईभी राजेंद्र वर्ग – एफ.वाय.बी.सी.ए पुस्तकाचे...Read More
Vishal Jadhav
More Sayali Rajendra
संगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर
विद्यार्थी – मोरे साईभी राजेंद्र
वर्ग – एफ.वाय.बी.सी.ए
पुस्तकाचे नाव -अग्निपंख
लेखकाचे नाव – डॉ. ए. पी अब्दुल कलाम
पुस्तक परीक्षण / पुस्तक अभिप्राय
अग्निपंख हे पुस्तक भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. हे पुस्तक भारतीय तरुणांना त्यांच्या जीवनात उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी लिहिले गेले आहे. हे लिहिले गेले आहे. हे पुस्तक कलाम त्यांचे विचार तत्वज्ञान आणि जीवनातील अनुभव याचे अनुकरण आहे, ज्यामुळे वाचकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी नवा दृष्टिकोन मिळतो.
पुस्तकाच्या सुरुवातीला डॉ. कलाम यांच्या बालपणाचे वर्णन आहे.
त्यांचा जन्म रामेश्वरम येथे एका साधारण कुटुंबात झाला.
अग्निपंख
बालपण अथक परिश्रमात व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉ. अब्दुल कलाम हे...Read More
सरोदे रुपेश बाळू
अग्निपंख
बालपण अथक परिश्रमात व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉ. अब्दुल कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व आहे. विज्ञानाचा परम भोक्ता असणाऱ्या डॉ.कलामांना लहान मुलांशी आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारताचे भविष्य उज्वल करण्याचे सामर्थ्य हातात असलेल्या तरुणाईला नेहमीच ते प्रोत्साहन देत. संपुर्ण आयुष्य देशसेवेसाठी कार्यरत राहीलेले डॉ. अब्दुल कलाम, पुढील वीस वर्षात विकसीत होणा-या भारताचे सतत स्वप्न पाहत असतं.
या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजुने आपल्या आयुष्यातील व्यक्तीगत आणि व्यवसायिक संघर्ष चितारत असतांना दुसऱ्या बाजुला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशुल, नाम या घरोघरी पोहचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडण फार सुंदरपणे वाचकांना सांगीतलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसुन स्वातंत्र्य भारताच्या अवकाश संशो धन आणि तंत्रज्ञान विषयक लढाईचे एक स्पंदन आहे. तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहर्षक खंडकाव्यच आहे.
आकाश आणि समुद्र या दोन्ही अमर्यादि गोष्टी देवाच्याच असून छोट्याश्या तळ्यातही तो आहे, या ईश्वराचे अस्तित्व सांगणाऱ्या अथर्ववेदाच्या ओळींनी या आत्मचरित्राची सुरुवात होते. तमिळनाडूमधील रामेश्वरमध्ये अशिक्षित नावाड्याच्या मोठ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. हिंदू -मुस्लिम ऐक्याची भावना जपणाऱ्या वातावरणात त्यांना लहाणपणी पासूनचं संस्काराची शिदोरी मिळाली. ईश्वराची निस्सीम भक्ती आणि कोणाचंही वाईट न करण्याची वृत्ती ही त्यांच्या आईवडीलांची शिकवण माध्यमिक शाळेत श्यादुराई सालोमन यांच्या प्रेरणेने ते आकाशात उडण्याचे स्वप्न पाहतात. पुढे एमआयटी मध्ये प्रो. स्पॉडर यांनी त्यांच्या मनात प्रचंड आत्मवि श्वास निर्माण केला. शमसुद्दीन आणि जलालुद्दीन यांच्या प्रेमळ सहवासात त्यांच्या कोवळ्या मनाला उभारी देण्याचे बळ दिले. अब्दुल कलाम यांच्या जडण घडणीत त्यांना मिळालेले पोषक वातावरण आणि सुसंस्कृत शिक्षक यांचा अनमोल वाटा आहे, याचे वाचकाला प्रत्यंतर येते.
रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरुंना होडीतून धनुढकोडीला नेण्या-आणण्याचा त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता. मुलाच्या कॉलेज प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते तेव्हा बहीणीने स्वत:चे दागीने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. कधीकाळी परिस्थितीशी सामना करत चालत्या रेल्वेतून वर्तमानपत्रांचे गठ्ठे गोळा करण्याचे काम त्यांनी केले आहे. कॉलेजातून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासामध्ये चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. 1958 साली डी. आर.डी. ओ. मध्ये सीनियर सायंटिस्ट असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट म्हणजे हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल त्यांनी तयार केले. काही अभावांमुळे त्यांना ते अर्धवट सोडावे लागले तरी ते निराश झाले नाहीत. त्यांच्यात असणाऱ्या उत्कृष्ट नेतृत्वगुणांची आणि सांघीक जबाबदारीची यावेळी कसोटी लागली. अल्पावधीतचं अनपेक्षित संधीने त्यांचे दार ठोठावले आणि डी.आर.डी.ओ च्या संचालक पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.
1962 साली बंगलोरमध्ये असतांना भारतीय अवकाश कार्यक्रमात काम करण्याची त्यांना संधी मिळाली. एरोडायनॉमिक्स डिझाइन च्या फायबर रिएन फोर्ड प्लास्टीक (FRP) प्रकल्पातही त्यांना सहभागी होता आले. कामाची कास धरलेल्या डॉ. कलमाच्या मेहनतीला प्रोफेसर विक्रम साराभाईच्या भेटीने भारावुन टाकले. 1968 साली विक्रम साराभाई स्पेंस रिसर्च सेंटर (ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SLV) प्रोग्रमचे प्रमुख म्हणून बरीच कार्ये त्यांच्या हातून पार पडली. मात्र हॉवड-क्राफ्ट नंदी चा अकाली मृत्यु, कालबाह्य म्हणून नाकारण्यात आलेले ‘शंटो’ गमविला असतांना, 1979 साली SLV ची अयशस्वी चाचणी त्यांच्या जिव्हारी लागली. डॉ. विक्रम साराभाई आणि डॉ. ब्रम्ह प्रकाश यांच्या पाठबळाने नैराश्यातून बाहेर पडण्यास त्यांना मदत झाली, हे सर्व या अग्नीपंख म्हणजेच डॉ. अब्दुलकलाम यांच्या आत्मचरित्रात सांगीतले आहे.
