Original Title
श्रीमान योगी
Subject & College
Publish Date
2018-01-01
Published Year
2018
Publisher, Place
Total Pages
1151
ISBN 13
9788177666403
Country
India
Language
Marathi
Print Length
1151
Average Ratings
Readers Feedback
श्रीमान योगी
रणजीत देसाई लिखित 'श्रीमान योगी' हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासीक कादंबरी आहे. या पुस्तकात महाराजांचे राजकीय, सामाजिक, आणि वैयक्तिक जीवन यथार्थपणे मांडले आहे....Read More
Prashik Anil Ahire
श्रीमान योगी
रणजीत देसाई लिखित ‘श्रीमान योगी’ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासीक कादंबरी आहे. या पुस्तकात महाराजांचे राजकीय, सामाजिक, आणि वैयक्तिक जीवन यथार्थपणे मांडले आहे. पुस्तकात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या संघर्षाला आणि त्यांच्या असामान्य नेतृत्व गुणांना संजिशा कथा-विषयाची रंगतदार मांडणी केली आहे. रणजीत देसाई यांनी केवळ ऐतिहासीक घटनांचे वर्णन न करता शिवाजी महारजांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूंची सखोल मांडणी केली आहे. शिवाजी महाराज एक कुशल योद्धा, मुत्सद्दी राज्यकर्ते, प्रजा वत्सल राजा, धर्मनिरपेक्ष नेता, आणि एक संवेदनशील माणूस होते. त्यांच्या जीवनातील अनेक चढ-उतार, विजय-पराजय, आणि व्यक्तिगत दुःख-आनंद या सर्वांशी लेखकाने च वाचकांना जोडले आहे. ही कादंबरी केवळ शिवाजी महाराजांच्या जीवना तचा इतिहास सांगत नाही, तर त्यामागील प्रेरणा, त्यांच्या निर्णयांचे राजकीय आणि सामाजीक परिणाम, आणि, त्यांच्या आदर्श नेतृत्वाचा अभ्यासही वाचकां समोर ठेवते.
कादंबरीची सुरुवात बालशिवाजींच्या जीजाऊ सह संभाजी राजांच्या घरातील धार्मिक आणि सांस्कृतीक वातावरणातून होते. शिवाजींचे बालपण, स्वराज्य स्थापनेची जिद्द, अफजलखान वध, आग्रा भेट, मुघलांच्या विरोधातील लढाया, तसेच संभाजी महाराजा सोबतचे त्यांचे नाते या सर्व बाबी पुस्तकात अधोरेखित केल्या आहेत शिवाजी महाराजांची प्रजेसाठी तळमळ, त्यांचे मुत्सद्दीपण, आणि धर्मनिरपेक्षतेचा आदर्श पुस्तकाच्या प्रत्येक पानातून दिसतो.
मुघल आणि आदिलशाहीच्या विरोधात लढातांना त्यांनी केलेली मुत्सद्दी ‘राजकारणाची ओळख, त्यांची युद्धनीती, आणि प्रजेसाठीचा त्यांचा न्यार्य दृष्टीकोन पुस्तकाच्या माध्यमातून जाणवतो, त्यांच्या वैयक्तिक जीवनातील सुख-दु:खे, पत्नींबरोबरचा संवाद, जिजाऊ बरोबरचे भावनिक नाते, आणि संभाजी महाराजांसोबतच्या आव्हानात्मक संबंधांचा देखील या कादंबरीत उल्लेख आहे.
कथेच्या ओघात वाचकांना शिवाजी जांच्या धाडसी निर्णयांचा, त्यांच्या उपार धैर्याचा आणि स्वराज्य साठीच्या त्यागाचा अनुभव येतो. ‘श्रीमान योगी’ ही केवळ ऐतिहासिक घटनांची मांड नसुन, ती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाचा एक संपुर्ण आरसा आहे.
पुस्तक वाचताना शिवाजी महाराजांचे शौर्य, मुत्सद्दीपणा आणि प्रजेसाठीची तळमळ वाचकाच्या हृदयात सजीव होते. लेखकाने कथेच्या ओघात इतिहासाला काल्पनिकतेची जोड दिलेला नाही. कादंबरीतून वाचकाला केवळ शिवाजी महाराजांचे जीवन जाणून घेता येत नाही, तर त्यांना एक आदर्श नेता, एक उत्तम पुत्र, एक न्यायप्रिय राजा, आणि एक मानवतावादी व्यक्ती म्हणून पाहता येते. ‘श्रीमान योगी’ हे पुस्तक वाचता ना केवल इतिहास शिकवले जात नाही, तर वाचकाला शिवाजी महारजांच्या आदर्श जीवनाचा अनुभव येतो. हे पुस्तक प्रत्येक मराठी वाचकानी नक्की वाचावे.
