“परामर्श विकासाचा"

By जागीरदार मुक्ता

Share

 

Price:  
₹150
Share

 

Original Title

“परामर्श विकासाचा"

Publish Date

2022-09-01

Published Year

2022

Format

paper

Language

मराठी

Readers Feedback

“परामर्श विकासाचा”

पुस्तक परीक्षण :- प्रा. सालके सुनील रामराव, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, अण्णासाहेब आवटे कॉलेज ,मंचर “परामर्श विकासाचा" या मुक्ता जागीरदार लिखित पुस्तकात मराठी अर्थशास्त्र परिषद, एस.एन.डी.टी...Read More

Prof. Salke Sunil Ramrao

Prof. Salke Sunil Ramrao

×
“परामर्श विकासाचा”
Share

पुस्तक परीक्षण :- प्रा. सालके सुनील रामराव, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, अण्णासाहेब आवटे कॉलेज ,मंचर
“परामर्श विकासाचा” या मुक्ता जागीरदार लिखित पुस्तकात मराठी अर्थशास्त्र परिषद, एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ व्याख्यानमाला, विदर्भ विद्यापीठ अर्थशास्त्र शिक्षक परिषदेची प्रा. भास्कर ढाले स्मृती व्याख्यानमाला डॉ.श्री.आ.देशपांडे स्मृती व्याख्यान विचार विश्व इत्यादी व्याख्यानमालांमध्ये व परिषदेमध्ये दिलेली व्याख्याने यांचे संकलन आहे. सर्व व्याख्याने ‘मानव विकास’ या संकल्पने भोवती गुंफलेली आहेत. अर्थशास्त्रीय दृष्टया शब्दरूपी व्याख्यानांचे मूल्य अमूल्य आहे.त्याची मांडणी, विश्लेषण शैली,वाखण्याजोगी आहे.
अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक पर्वणी आहे. परंतु अर्थशास्त्राचे अभ्यासक नसणाऱ्या वाचकांच्या दृष्टीने हे पुस्तक प्रश्नचिन्ह ठरते. त्यातील अर्थशास्त्रीय संकल्पना,बाबी,घटक सामान्यांच्या आकलनाच्या पलीकडच्या आहेत. त्यामुळे सामान्यांना या पुस्तका विषयी गोडी वाटेलच असे नाही. अर्थशास्त्रीय क्लिष्ट भाषेमुळे ते सर्वसामान्यांच्या आकलनाच्या बाहेर गेले आहे असे वाटते. लेखिकेने जर प्रत्येक व्याख्यानाचा सारांश सोप्या सुलभ भाषेत सामान्यांच्या आकलनातील अशा शब्दात मांडला असता तर हे पुस्तक सर्वांसाठीच वाचनीय झाले असते. सर्वसामान्यांची अर्थशास्त्र विषयाची गोडी वाढली असती.
वरील पुस्तकाशी तुलना करताना ‘अर्थ कथासंग्रह’ “नाव सांगणार नाही”हे पुस्तक उजवे वाटते प्रथमदर्शनी ते जरी अर्थशास्त्राचे वाटत नसले तरी लेखिकेने मनोगतात उल्लेख केल्याप्रमाणे स्त्री सक्षमीकरण अर्थकारणाशिवाय शून्य आहे. या मताशी मी कथा वाचल्यानंतर सहमत झालो व अप्रत्यक्षरीत्या कल्याणाच्या अर्थशास्त्राचा हा सदोहरण भाग आहे असे वाटते. फक्त ती गोष्टी रूप मांडली आहे.जर लेखिकेने सर्व कथांच्या शेवटी मूळ उद्दिष्टांशी सुसंगत असा अर्थशास्त्रीय सारांश दिला असता तर हे पुस्तक अधिक देखणे आणि गुणवान झाले असते.
लेखिकेने समाजातील 14 विविध परिस्थितीतून आलेल्या स्त्रियांची मुलाखत यात मांडलीआहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक स्त्रीची कथा वेगवेगळी असून ती आर्थिक दृष्ट्या सक्षम न झाल्याने तिला यातना झालेल्या आहेत. तिला आपल्या मनाप्रमाणे जगता आलेले नाही. नोकरी करणारी स्त्री, प्राध्यापिका अशा उच्च शिक्षित स्त्रियां पासून ते कचरा गोळा करणारी, न शिकलेली अडाणी स्त्री, आदिवासी पाड्यातील उच्चशिक्षित स्त्री, शहरात उच्च जीवन जगणाऱ्या स्त्रीचे क्षणात नाहीसे होणारे आर्थिक पाठबळ त्यामुळे तिची झालेली परवड,दुसऱ्याच्या आधाराने राजकारण करणारी स्त्री आणि तिची होणारी घुसमट अशा विविध स्त्रियांच्या जीवनाचा आढावा घेऊन त्या सर्वांच्या मनातील सल आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे, निर्णय प्रक्रियेत स्थान नसणे हीअसल्याचे जाणवते.यातील काही कथा राजकीय भाष्य करतात, काही कथा सामाजिक जीवनावर भाष्य करतात, पण कोणतीही कथा मुळ स्त्री सक्षमीकरण आणि अर्थकारण या विषयापासून बाजूला जात नाही.यातील प्रत्येक स्त्री कडे आर्थिक स्वातंत्र्य असते तर प्रत्येकीचे जीवन वेगळे घडले असते याची जाणीव पदोपदी होते.लेखिकेने जर सारांश रुपाने सर्व कार्याचा संदर्भ घेत काही लिखाण शेवटी केले असते तर पुस्तक अधिक समर्पक झाले असते.

Submit Your Review