महाराज्ञी येसूबाई

By डॉ. सदाशिव स शिवदे

Share

Availability

available

Original Title

महाराज्ञी येसूबाई

Publish Date

2006-01-01

Published Year

2006

ISBN

B07NVX566D

Format

Paperback

Country

India

Average Ratings

Readers Feedback

महाराज्ञी येसूबाई

‘महाराज्ञी येसूबाई’ ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. महाराणी येसूबाई यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी असून या मध्ये येसूबाई यांचे राजकारणातील महत्त्व आणि त्यांनी केलेल्या सर्व...Read More

Tanaji Dinkarrao Jadhav

Tanaji Dinkarrao Jadhav

×
महाराज्ञी येसूबाई
Share

‘महाराज्ञी येसूबाई’ ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. महाराणी येसूबाई यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी असून या मध्ये येसूबाई यांचे राजकारणातील महत्त्व आणि त्यांनी केलेल्या सर्व कार्याची माहिती या कादंबरी मध्ये सर्व इतिहास व्यवस्थित मांडला आहे. छान कादंबरी आहे इतिहासाची पूर्ण माहिती मिळण्याचां हा स्त्रोत आहे.

महाराज्ञी येसूबाई

हे माझे आवडते पुस्तक आहे. प्राचीन काळी राजा शिवाजी महाराजांनी स्वराज्य बांधले आणि नंतर संभाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला आणि मुघलांपासून त्यांचे रक्षण केले पण...Read More

Dr. Rupali Phule

Dr. Rupali Phule

×
महाराज्ञी येसूबाई
Share

हे माझे आवडते पुस्तक आहे. प्राचीन काळी राजा शिवाजी महाराजांनी स्वराज्य बांधले आणि नंतर संभाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला आणि मुघलांपासून त्यांचे रक्षण केले पण १६८९ मध्ये सुदैवाने औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडले. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर कोणीही बलवान आणि शक्तिशाली शासक शिल्लक राहिला नाही म्हणून राणी येसूबाईंनी राजाराम महाराजांना तिसरे छत्रपती बनवले आणि त्यांना आणि त्यांच्या पत्नी ताराबाईंना रायगड किल्ला सोडण्यास सांगितले. त्यानंतर येसूबाईंनी रायगडाचे रक्षण केले पण शेवटी औरंगजेबाने येसूबाई आणि तिच्या मुलाला आणि किल्ल्यावरील इतर लोकांना कैदी बनवले. येसूबाईंना ३४ वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले. तिच्या मुलाचे नाव शिवाजी होते पण औरंगजेबाने ते शाहू केले म्हणून नाव बदलून त्याचे नाव शाहू ठेवण्यात आले. शाहू महाराज मोठे झाल्यावर आणि औरंगजेबाच्या मृत्युनंतर औरंगजेबाच्या मुलाने त्याला सोने आणि मनसबदारी देऊन दक्षिणेला पाठवले. पण येसूबाईंना फक्त तुरुंगातच ठेवण्यात आले. म्हणून शाहू महाराजांनी दख्खानकडे जाऊन मजबूत सैन्य गोळा केले आणि येसूबाईंना मुघलांच्या तुरुंगातून मुक्त केले आणि स्वराज्यात परत आणले. म्हणून राणी येसूबाई त्या राणींपैकी एक होत्या ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्य घडवण्यात घालवले.

महाराज्ञी येसूबाई

Review By Mrs Jagtap Nilam Kashiram, Baburaoji Gholap College, Pune 'महाराज्ञी येसूबाई’ ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. महाराणी येसूबाई यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी असून...Read More

Mrs Jagtap Nilam Kashiram

Mrs Jagtap Nilam Kashiram

×
महाराज्ञी येसूबाई
Share

Review By Mrs Jagtap Nilam Kashiram, Baburaoji Gholap College, Pune
‘महाराज्ञी येसूबाई’ ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. महाराणी येसूबाई यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी असून बालवयातील जाऊबाई लग्नानंतरच्या येसूबाईं होय. वडील पिलाजी शिर्के यांनी वयाच्या सहाव्या वर्षी येसूबाई शिर्के यांचा विवाह शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी राजे यांच्याशी करून दिला. आणि नववधू म्हणून त्या रायगडावर आल्या. शिक्षणाला महत्त्व देऊ पाहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजे व येसूबाई यांचे शिक्षण सुरू केले. छत्रपती शिवाजी महाराज व जिजाबाई यांच्या सहवासात येसूबाईनी बारकाईने राजनीतीचे व राजकारणाचे निरीक्षण किशोर वयातच सुरू केले. त्यांच्या या शिक्षणाचा उपयोग त्यांनी भविष्यात आलेल्या संकटांचा धिरोदात्तपणे व मुत्सद्देगिरीने सामना करण्यास केला. संभाजी राजे पहिले अभिपित युवराज झाले, राजपुत्र असल्याने सौभाग्य संपन्न येसूबाई महाराजांच्या पहिल्या अभिपित युवराज्ञी झाल्या.
काही कालखंडानंतर पिलाजी शिर्के औरंगजेबांना मिळाल्यानंतर देखील येसूबाईंनी संभाजी महाराजांची साथ सोडली नाही. त्यांना बाहेरील व घरातील अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. संभाजी महाराजांना कैदी केल्यानंतर त्यांना मरण यातना अपमानकारक धिंड त्यांचा हाल हाल करून केलेला वध या महाभयंकर प्रसंगातही या रागिनीचे धीरोदत्त व पराकोटीच्या सहनशीलतेचे दर्शन घडते. त्यांनी महाराणी या नात्याने घेतलेले अनेक ऐतिहासिक निर्णय त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देते.
पुत्र प्रेमापेक्षा स्वराज्य प्रेम येसूबाईंच्या निस्वार्थी वृत्तीचे दर्शन घडविते. जीवित व अब्रूला घाला बसणार नाही या अटीवर त्या शत्रूच्या ताब्यात गेल्या. इसवी सन १६८९ ला येसूबाई व शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत होत्या. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली. ती १७०० मध्ये संपुष्टात आली. तदनंतर ताराबाईंच्या कर्तृत्वाचा व कीर्तीचा शेवट इ.स. १७०७ मध्ये झाला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची सुटका झाली. पण येसूबाईंना मोगलांनी ओलीस ठेवले. इ.स .१७१९ पर्यंत तीस वर्ष मराठ्यांच्या राणीने कैदेत काढले. भिन्न भाषा, भिन्न व्यक्ती, भिन्न संस्कृती आणि वासनेच्या विषारी दर्प दिवस काढले याची कल्पना आपण करू शकत नाही. त्यानंतर १७ वर्ष दक्षिणेस, उर्वरित आयुष्य उत्तर दिल्लीत कैदेत काढले. बादशहाने नजरबंदी केलेले असल्यामुळे बादशहाची छावणी ज्या ठिकाणी असेल तेथे येशुबाई व शाहू महाराजांना जावे लागत. अशा परिस्थितीत मराठ्यांच्या राणीला उपासमार, हालअपेष्टा यासारख्या गोष्टीलाही सामोरे जावे लागले. अशा कठीण प्रसंगी ही येशूबाई आपल्या निर्णयाप्रती ठाम उभ्या राहिल्या.
संभाजी राजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांना सलग तीस वर्ष शत्रूच्या कैदेत काढावे लागले. अशातही शत्रूच्या छावणीत स्वाभिमानी बाण्याने राहिल्या. आपले सत्व, अस्मिता टाकली नाही. पण जिद्द आणि अशावाद सोडला नाही. तसेच स्वराज्याचे स्वप्न व धर्मनिष्ठेपासून दूर गेल्या नाहीत. त्या धैर्याच्या मुत्सद्देगिरीत आणि शौर्याच्या परंपरेत कायम राहिल्या. येसूबाईंच्या आयुष्यात अनेक संकटे आली. त्यांच्या जडणघडणीची सुरुवात वैभवशाली होती व अंत मुलांच्या वैभवाच्या उत्कर्षाचा आहे. येसूबाईंच्या जीवनाचा खोल विचार केला तर मराठ्यांच्या इतिहासात सोशिक, सज्जन, सोज्वळ, सात्त्विक, धीरोदत्त, निस्वार्थी वागणुकीने मराठी साम्राज्य उभे करण्यासाठी अपूर्वत्यागाने तीस वर्ष कारावास स्वीकारला. अशा येसूबाईंची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला होणे गरजेचे आहे. महाराज्ञी येसूबाई हे पुस्तक वाचकांनी नक्की वाचले पाहिजे. ज्यातून आपल्याला येसूबाईंच्या इतिहासाची ओळख होईल.

Submit Your Review