Original Title
हृदयस्थ
Subject & College
Series
Publish Date
2004-01-01
Published Year
2004
Total Pages
309
Format
Paperback
Country
India
Language
Marathi
Readers Feedback
हृदयस्थ
डॉ. नीतू मांडके यांची कहाणी ही त्यांच्या पत्नी डॉ. अलका मांडके यांनी लिहिलेली आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्या सहजीवनाच्या अनुभवांचा आणि डॉ. मांडके यांच्या असामान्य...Read More
Chavhan Tejaswi Ram
हृदयस्थ
डॉ. नीतू मांडके यांची कहाणी ही त्यांच्या पत्नी डॉ. अलका मांडके यांनी लिहिलेली आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्या सहजीवनाच्या अनुभवांचा आणि डॉ. मांडके यांच्या असामान्य कार्यकर्तृत्वाचा वेध घेतला आहे. डॉ. नीतू मांडके हे प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ होते. पुस्तक प्रेरणादायी आहे आणि डॉ. मांडके यांच्या कामातील गांभीर्य, शिस्त, आणि पेशंट व समाजहितासाठी असलेली त्यांची तळमळ यांचा उल्लेख यात ठळकपणे दिसून येतो. डॉ. मांडके यांचा जन्म 1 जानेवारी 1948 रोजी पुण्यात झाला. बारावी नंतर त्यांनी बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तेथेच अलका मांडके यांच्याशी परिचय झाला. डॉ. मांडके अतिशय बुद्धिमान विद्यार्थी होते. अभ्यासाबरोबरच फुटबॉल आणि बॉक्सिंग यांसारख्या क्रिडांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असे. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर त्यांनी हृदयविकार आणि हृदय शस्त्रक्रियेचे शिक्षण घेतले, तर डॉ. अलका मांडके यांनी एनेस्थेसियामध्ये शिक्षण घेतले. डॉ. अलका मांडके यांचे हे पुस्तक केवळ डॉ. नीतू मांडके यांच्या व्यावसायिक जीवनाचा धावता आढावा नसून, त्यांचा महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनही दाखवते. आधुनिक व अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे त्यांचे स्वप्न होते. समाजातील गरीब आणि सर्वसामान्यांसाठी उपचार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी 200 कोटींची गुंतवणूक करून 18 मजली हॉस्पिटलची उभारणी सुरू केली. या पुस्तकातून डॉ. मांडके यांचे थोर कार्य, पेशंटविषयी असलेली आत्मीयता, समाजासाठी झटण्याची त्यांची तळमळ, आणि कामाबद्दलची निष्ठा हे सारे उलगडते. अनेक नामवंत रुग्णांवर त्यांनी उपचार केले आणि समाजातील गरीब रुग्णांपर्यंतही उपचार पोहोचवले. त्यांच्या निधनानंतर, डॉ. अलका मांडके यांनी त्यांच्या स्वप्नाला साकार केले. हे पुस्तक डॉ. मांडके यांचे एक डॉक्टर आणि एक व्यक्ती म्हणून दर्शन घडवते आणि त्यांच्या जीवनाचा व कार्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडते.
