असंही जगणं असतं..!विश्व थॅलेसेमियाचे” हे थँलेसेमिया या गंभीर आजारावर आधारित पुस्तकआहे. लेखकअॅ ड. नदीम सय्यद यांनी थँलेसेमिया या आनुवंशिक रक्त विकारावर प्रकाश टाकत या आजारासोबत लढणाऱ्या रुग्णांच्या आयुष्याचे चित्रण केले आहे. त्याचं दुःख, वेदना, त्यांचे प्रश्न,जगणं आणि अगदी मरणं सुद्धा अगदी वास्तवादी पद्धतीने मांडल आहे. थँलेसेमिया
आणि समाजातील लोकांना या आजाराबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न करते.
महत्वाचे मुद्दे:
1. थँलेसेमियाची आजाराची ओळख: पुस्तकात थँलेसेमिया आजाराची माहिती, त्याचे प्रकार, लक्षणे आणि उपचार यावर अतिशय सोप्या पधतीन सविस्तर माहिती दिलेली आहे.
2. रुग्णांच्या कथा: लेखकाने विविध थँलेसेमिया रुग्णांच्या गोष्टींमधून त्यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा योग्य पधतीन घेतला आहे. त्यांचे शारीरिक, मानसिक, भावनिकतथा वैयक्तिक आव्हाने यावर आधारित अनुभव पुस्तकात कथन केलेले आहेत.
3. उपचारपद्धती आणि व्यवस्थापन: थँलेसेमिया असलेल्या रुग्णांसाठी उपलब्ध उपचारपद्धती, रक्त संक्रमण, औषधे, आहारआणि व्यायाम याविषयी सखोल माहिती दिली आहे.
4. समाजाची भूमिका: पुस्तकात थँलेसेमिया रुग्णांसोबत किंवा कुटुंबासोबत समाजातील लोकांनी कशी भूमिका घ्यावी, त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल, याबाबतचे विशेष मार्गदर्शन केले आहे.
5. वैद्यकीय मदत देणाऱ्या संस्था: पुस्तकाच्या उत्तरर्धात वैद्यकीय मदत देणाऱ्या 28 संस्थां आणि त्यांचे पत्ते दिलेले आहेत.
समीक्षण:”असंही जगणं असतं..!विश्व थॅलेसेमियाचे” हे अत्यंत संवेदनशील विषयाला हात घालणारे पुस्तक आहे. लेखकाने थँलेसेमिया या गंभीर आजाराबाबत विस्तृतपणे माहिती दिली असून, समाजात जागरूकता वाढवण्याचा योग्य प्रयत्न केला आहे. हे पुस्तक रुग्णांसाठी प्रेरणादायी ठरते, तसेच थँलेसेमियाच्या रुग्णांशी कसे वागावे याबद्दल समाजाला योग्य दिशा देते.आजही काही पालक थॅलेसेमिक मुलांना फक्त बाहेरून रक्त देतात, प्राथमिक उपचार करून तिथेच थांबतात, त्यापुढे जात नाहीत अशा लोकांच्या विचारात या पुस्तकाने नक्कीच बदल होईल. अत्यंत प्रतिकिल परिस्थितीमध्ये अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या थॅलेसेमिक रुग्णांकडून जीवनाकडे, आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देण्याचा लेखकाने यशस्वी प्रयत्न केला आहे.
सारांश:पुस्तकाची मांडणी अतिशय सुबोध आणि वाचनीय असून, लेखकाचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. हे पुस्तक थँलेसेमियावर एक महत्त्वपूर्ण माहिती स्रोत आहे आणि या आजाराशी लढणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणा देणारे आहे.
शिफारस: हे पुस्तकथॅलेसेमिक रुग्णांच्या कुटुंबीयांनी तसेच थँलेसेमियाबद्दल अधिक जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींनी, आरोग्य क्षेत्रातील लोकांनी वाचायला हवे.