`”वाचाल तर वाचाल !”
असे आपण नेहमीच ऐकतो, पण मी तर म्हणेण वाचाल तर वाचाल आणि तेही अगदी सन्मानाने वाचाल ! खरं आहे तसा मी ला.ब.शा.वि उदगीर या नामांकित शाळेचा विद्यार्थी. चंद्रशेखर आझाद, भगतसिंह या सारखी देशभक्ती जागृत करणारी व श्यामची आई यासारखे आपल्यामधील मुल्यांची वाढ होणारी पुस्तके वेचण्यात आली. खरं तर त्या वयात ती आवड निर्माण केली ती आमच्या गुरूजींनी व त्यामुळेच जी आवड, ओढ, पुस्तकांची निर्माण झाली ती आजपर्यंत टिकून आहे. मी तर म्हणेन आजही टिकूनच नाही तर त्यात इतभर वाढ होतांना दिसून येते,
“Constitution” अर्थातच संविधान
आम्हा Law विद्यार्थ्यांचा मुलभूत व प्रमुख विषय. सहजच संविधानाची क्रमिक पुस्तके हाताळतांना मला “आपले मौलीक संविधान” हे मराठीतील पुस्तक दिसले त्यामुळे अगतिकपणे ते आवड म्हणून एकदाच नव्हे तर दोन-तीनदा वाचन केले. म्हणतात तसे घडले आणि संविधान म्हणजे एक मुलभूत कायदा तर आहेच पण त्यापेक्षा ते एक मौलिक विचार आहे त्याचा प्रत्यय आला.
यात लेखकांनी श्री रमेश पतंगे सरांनी एकदम सहज, सोप्या पध्दतीने संविधान व विचार, संकल्पनेचा उलगडा केलेला आहे.
संविधानाचा उल्लेख सामाजिक दस्तवेज वा सामाजिक न्यायाचा दस्तावेज असा सामान्यपणे उल्लेख करतो, तर मग हा सामाजिक न्यायाचे दस्त कशा पध्दतीने कोणत्या अर्थाने आहे, याचे सुस्पष्ट स्पष्टीकरण या पुस्तकातुन दिसून येते.
उद्देशिका वा प्रस्तावना हा आम्हा कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा एक प्रमुख भाग मग प्रस्तावना व त्यातील तत्त्व तारखा आम्ही अगदी सुरवातीपासून तोंडपाठ केले. उदाहरणार्थ सांगायचे झाले तर १) भारत देशाचे स्वरूप कसे आहे? असे कोणी विचारले तर आम्ही लगेचच उत्तर देतो, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य अगदी यातील शब्दांचा क्रम सुध्दा आम्ही चुकू देत नाही !
यातील प्रत्येक शब्दांचे वर्णन करतो, पण त्यामागील तत्त्व व सार समजून घेतांना कुठेतरी कमी पडतो.
आम्ही, भारताचे लोक.
स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
अर्थातच हा “आम्ही” शब्द आत्मतत्त्वाचे दर्शन कसे घडवते याचा प्रत्यय हे पुस्तक वाचतांना क्षणोक्षणी अधोरेखित होते,
सव्समावेशकता चे संविधानाचे प्रमुख वैशिष्टय व ती कशी आहे याचे समर्पक दाखले बघावयास मिळतात. समता, स्वातंत्र, न्याय हे मौलिक तत्त्व आपण सरसकट पाठ करतो पण त्यामागील आशय मर्म समजून घेतांना थोडी माझी तशी तारांबळ होत असे पण या सर्व तत्त्वांचा मतितार्थ, सार सहज सोप्या भाषेत लेखकांनी या पुस्तकामधून अगदी समर्पक पध्दतीने सांगितले आहे.
एकता, एकात्मता, बंधुता ही तीन मुल्य व त्यामागील आशेय नीट समजून घेतला तर सहजच लक्षात येते की, आपल्याला राष्ट्राची एकता आणि एकात्मता साधायची असेल तर तीचा आधार मात्र बंधुता असेल मग ती कशी साध्य करता येईल, वा साध्य होत आहेच याबद्दल सविस्तर विवेचन या पुस्तकात आढळते. लोकशाही हा राज्य घटनेचा आत्मा आहे. राष्ट्र म्हणजे जन, भुमी, सांस्कृती आणि चौथा पण महत्वाचा घटक म्हणजे बंधुत्वाची भावना अर्थातच आम्ही सर्व एक आहे. ही राष्ट्र भावना
मा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा इतर मा. सविधानकर्त्यांना अपेक्षित सामाजिक राजकीय आर्थिक न्याय कसा साध्य करता येईल यावर प्रकाश टाकलेला दिसुन येतो, जीवन जगणे म्हणजे अर्थातच सन्मानाने जीवन जगणे, कारण मनुष्य जीवनाला एक प्रतिष्ठा आहे. त्यासंबंधी सविस्तर विवेचन दिसुन येते. थोडक्यात काय तर संविधानाचे पालन करणे हे एक मुलभूत कर्तव्य आहेच व संविधान हा एक मौलिक विचार आहे याची मला जाण या पुस्तकामुळे झाली. म्हणूनच सर्वांनी संविधानाचा विचार स्विकारणे, अंगिकारणे व आत्मसात करणे किती गरजेचे आहे. याचे उत्तर “आपले मौलिक संविधान या पुस्तकातून मिळते.
म्हणून पुस्तकाच्या वाचनातून मी स्वतः “वाचाल तर वाचाल !” याची अनुभुती घेतली. हा राष्ट्रभाव जागृत केल्याबद्दल मा. श्री. रमेश पतंगे (सर) यांचे व आमच्या महाविद्यालयाचे व प्राचार्य महोदयांचे मनःपूर्वक आभार !
जय हिंद !!