२००९ साली आर. रामशास्त्री या संस्कृत पंडितांना एक हस्तलिखित मिळाला. जमिनीखालून वाहणारा स्त्रोत वर उसळून जमिनीवरून वाहू लागल्यावर नजरेत भरावा तसा हा अनेक शतके ‘भूमिगत’ राहून अचानक गवसलेला ग्रंथ सर्वांच्या नजरेत भरला म्हणजेच “कौटिलीय अर्थशास्त्र”.
या कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा शोध साधारणमानाने चौथ्या शतकाच्या उत्तरार्थात लिहिला. या पुस्तकात लेखिकेने कौटिल्याचे अर्थशास्त्र आणि त्याच्या तत्वज्ञानाचा व्यापक आणि समृद्ध विश्लेषण केले आहे. कौटिल्य ज्याला चाणक्य म्हणून ही ओळखले जाते हे प्राचीन भारतातील एक महान राजकारणी, अर्थतज्ञ, आणि शिक्षक होते. त्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था , समाजव्यवस्था, प्रशासन नियंत्रण ठेवण्याच्या विविध तत्वांची मांडणी केली आहे.
मुख्य मुद्दे-
१) कौटिल्याचे जीवन आणि कार्य
२) अर्थशास्त्राचे तत्वज्ञान
३) प्रशासन आणि धोरण
४) राज्यव्यवस्था
सुस्पष्ट तशीच सुलभ भाषेत मांडणी केली आहे.