दामिनी मधुकर चौरे (विद्यार्थी )
“जॉर्ज वाशिंगटन कार्व्हर यांचा जीवनपट”
“एक होता कार्व्हर” ही वीणा गवाणकर यांनी लिहिलेली कादंबरी, प्रसिद्ध कृषितज्ज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या जीवनावर आधारित आहे. कादंबरीत कार्व्हर यांच्या संघर्षमय जीवनाचे, विज्ञानात केलेल्या अमूल्य योगदानाचे, आणि मानवतेच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे सविस्तर वर्णन केले आहे.
कादंबरीतील जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे जीवनचरित्र
1. मिस्टर आणि मिसेस कार्व्हर (पालकसमान व्यक्तिमत्त्वे)
जॉर्ज आज जगेल की नाही अशी त्यावेळची त्याची परिस्थिती होती दुबळा असल्याकारणाने मिस्टर कार्व्हर यांनी त्याच्याकडून कधीच गुलामाप्रमाणे काम करून घेतले नाही.
जॉर्जच्या जन्मतःच्या मालकांनी गुलामगिरी संपल्यानंतरही त्याला सोडले नाही. जॉर्ज च्या आईला मेरी हिला जेम्स ला आणि जॉर्जला या जोडप्याने कधीच गुलामाप्रमाणे वागवले नाही तर घरातीलच सदस्य प्रमाणे त्यांनी मेरीला व तिच्या दोन्ही मुलांना वागवले.
मिसेस सुसन कार्व्हरने त्याला मुलासारखे जपले. तीच त्याला “जॉर्ज” हे नाव देते.
त्या दोघांनी जॉर्जला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी त्याच्या सुरुवातीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली.
जॉर्जच्या आयुष्यात हे दोघे आधारस्तंभ होते.
3. सुसन कार्व्हर (प्रेमळ आईसमान व्यक्ती)
सुसन यांना मूलबाळ नव्हते म्हणूनच त्यांनी जॉर्ज याला आपल्या मुलाप्रमाणे वागवले,
सुसन कार्व्हर जॉर्जची सख्खी आई नसली तरी तिचा जॉर्जवर मातृप्रेमाचा मोठा प्रभाव होता.
तिने जॉर्जला शिस्त, स्वावलंबन, आणि चांगल्या सवयी शिकवल्या. एक वेळ लोकांना वाटत की जॉर्ज लवकरच या संसाराचा निरोप घेईल परंतु अशा कठीण परिस्थितीत आईप्रमाणे जॉर्ज ज्याला श्वास घेता येत नव्हता त्याला जगवण्याचे कार्य सुसन यांनी केले. त्याच्या शिक्षणासाठी आणि मानसिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका निभावली.
9. सहकारी व विद्यार्थी वर्ग
जॉर्जने टस्केगी इन्स्टिट्यूटमध्ये काम करताना अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले.त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या प्रयोगांसाठी मदत केली, त्याच्यासोबत काम करून ज्ञान मिळवले.
पुस्तकाचा महत्त्वाचा भाग
पुस्तकात जॉर्जच्या संघर्षशील बालपणापासून ते जगप्रसिद्ध वैज्ञानिक बनण्यापर्यंतच्या प्रवासाचे उत्कट वर्णन आहे.वर्णभेद, आर्थिक अडचणी, शिक्षणासाठी झगडणे, आणि समाजासाठी केलेले योगदान यावर विशेष भर आहे.त्याचे जीवन मानवतेसाठी समर्पित होते, त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि साधेपणा पुस्तकात ठळकपणे येतो.
1. बालपणाचा संघर्ष तत्कालीन समाजात गुलामगिरी ही प्रथा रूढ होती त्यामुळे अत्यंत हलतेचे जीवन कृष्णवर्णी यांना जगावं लागत होते यामुळे जॉर्ज त्याची आई मेरी व त्याचा भाऊ जेम्स हे गुलाम म्हणून कार्व्हर कुटुंबाकडे होते. गुलामांना अत्यंत हीन प्रकारची वागणूक या काळात दिली जात होती.
पुस्तकामधील प्रमुख पात्र जॉर्ज चा जन्म चा 1864 च्या सुमारास अमेरिकेतील मिसुरी येथे एका गुलामाच्या एका कृष्णवर्णीय कुटुंबात झाला. त्यावेळी गुलाम गुलामांना पळवण्यासाठी एक टोळी सक्रिय होती. एका अशाच टोळीने जॉब च्या आईला जॉर्ज आणि जेम्स पासून वेगळे केले. ज्याच्या लहानपणीच तो त्याच्या आईपासून वेगळा झाला, जॉर्जच्या जन्मापूर्वी वडील वारले होते, त्यामुळे जॉर्ज आणि त्याचा भाऊ जेम्स हे अनाथ झाले. त्यांना एक शेतकरी जोडपे (मॉसेस आणि सुसान कार्व्हर) यांनी सांभाळले.
जन्मापासूनच जॉर्ज शारीरिकदृष्ट्या अशक्त होता, जॉर्ज हा अत्यंत दुबळा होता त्यामुळे तो जगेल अथवा नाही, त्याला श्वास घेता येत नव्हता. त्यामुळे कार्व्हर कुटुंबाने त्याला कोणत्याही जड कामे दिली नाही. शरीराने अत्यंत दुबळा असलेला जॉर्ज. त्यामुळे शेतातील कामांपेक्षा त्याला घरकामे आणि निसर्ग अभ्यासण्यात अधिक रस होता.
2. शिक्षणासाठी जिद्द आणि प्रयत्न आणि वाचन: –
वांशिक भेदभावाच्या काळात कृष्णवर्णीय मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळणे कठीण होते. तरीही जॉर्जने शिक्षणासाठी लांबच्या शाळांमध्ये पायपीट केली. बोलताना अडखळणारा, लाजाळू स्वभावाचा जॉर्ज हा आपले शिक्षण मिळवण्यासाठी त्यावेळी समाजाच्या रोशाला जुगारून शिक्षण घेत होता.
जॉर्जला पुस्तकाचे फार आवड बायबल असो वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक असो ते वाचण्यात तो पटाईत होता.
1870 ते 1880 निग्रो मुलांना मोफत पुस्तक मिळत नसेल. पुस्तक विकत घेणे त्यावेळी जो आजीला परवडत नव्हतं
जॉर्जला वाचन करण्यास फार आवडे मग कोणताही पुस्तक असो कसलेही पत्रक असो नवं जुनं वर्तमानपत्रे असो पुस्तिका असो काही भेटलं तरी तरी ते वाचावे अशी त्याची धारणा होती
शिक्षण मिळवताना कृष्णवर्णी असल्यामुळे जॉर्जला त्याचे प्रवेश नाकारण्यात आले होते. तरीही त्या प्रसंगाला न डगमगता जॉर्जने आपले शिक्षण हे चालूच ठेवले. शिक्षण मिळवताना उपाशी राहून गोठ्यात राहून मिळेल ते काम करून जॉर्ज आपले शिक्षण घेत होता. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य मिळवण्यासाठी तत्पर होता.
तो पुस्तके आणि निसर्गामधून ज्ञान मिळवायचा. त्याला विज्ञान, विशेषतः वनस्पती विज्ञानात प्रचंड रुची होती.
वयाच्या 30 व्या वर्षी त्याने आयोवा स्टेट अॅग्रिकल्चरल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला, जिथे त्याने शेती विज्ञानात प्रावीण्य मिळवले.त्याच्या मेहनतीमुळे तो कॉलेजमधील पहिला कृष्णवर्णीय पदवीधर ठरला. हे त्या काळी घडणे समाजाचा रोष पत्करून जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर यांनी यश संपादन केले हे सांगता येईल.
3. कृषिक्षेत्रातील क्रांतिकारी योगदान: –
कारवार कुटुंबाकडे असताना जॉर्जने निसर्गाचे झाड असतील , फुले असतील फळे असतील हे चांगलेच जवळून पाहिले होते त्यामुळे जर एखाद्या झाडाला कीड लागली तर त्याची करडी नजर त्यावर पडत असे तसेच बागेचे काम करण्यात जॉर्ज अत्यंत पटाईत होता. त्याला साफसफाई मध्ये अत्यंत रस होता त्यामुळे बाग असतील शेती असेल येथे अत्यंत सफाई पणे तो आपला काम बजावत असेलजॉर्जने आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतीत सुधारणा करण्यासाठी घालवले.
शेंगदाण्याचे संशोधन केले गोडबटाट्याचा उपयोगसांगितले मातीची सुपीकता यावर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केले
जॉर्ज यांनी लहानपणापासून जे ज्ञान मिळवले होते त्याचा समाजासाठी व समाज हितासाठी वापर करून घेतला.
गरीब शेतकऱ्यांना शेतीतून अधिक उत्पादन घेण्यासाठी तो मदत करत असे. त्याने कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी प्रभावी तंत्रज्ञान शिकवले.
4. समाजासाठी समर्पण
जॉर्जने आपले संशोधन मानवजातीच्या कल्याणासाठी समर्पित केले.त्याने स्वतःच्या नावावर कोणतेही पेटंट घेतले नाही, कारण त्याला विश्वास होता की विज्ञान हा देवाने मानवतेला दिलेला आशीर्वाद आहे.तो साध्या जीवनशैलीचा पुरस्कार करायचा.
पाक करे बाबतीत जॉर्ज चे यश जॉर्जला चांगल्या प्रकारे सोनपाक येत असे मग त्यात बिस्कीट ब्रेड पुडिंग वेगळ्या प्रकारचं स्वयंपाक असेल हे सर्व जॉर्जला करता येत होते त्याने त्यात यश संपादन केले होते
5. मानवी दृष्टिकोन आणि आदर्श
जॉर्जचे जीवन म्हणजे साधेपणा, विनयशीलता आणि निस्वार्थतेचे उदाहरण होते.त्याने कधीही संपत्ती किंवा वैभवाचा पाठपुरावा केला नाही. त्याच्या संशोधनाचे संपूर्ण श्रेय तो मानवतेला देत असे.
तो नेहमी म्हणायचा, “माझ्या ज्ञानाचा उपयोग केवळ समाजाच्या प्रगतीसाठी व्हायला हवा.”
कादंबरीतील जॉर्जच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष गुण
1. जिद्द
2. मानवतावाद
3. साधेपणा
4. प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
“एक होता कार्व्हर” मधून मिळणारे धडे
1. शिक्षण हे सगळ्यांसाठी असावे: समाजातील वांशिक भेदभाव, गरिबी आणि अन्याय असूनही शिक्षणाची ताकद कशी सगळे बदलू शकते, हे जॉर्जच्या जीवनातून शिकायला मिळते.
2. विज्ञानाचा उपयोग समाजासाठी करा: विज्ञान हे मानवतेच्या कल्याणासाठी असावे, हे जॉर्जने दाखवून दिले.
3. संघर्षातून यश: कठोर परिस्थितीतही आत्मविश्वास आणि मेहनतीने मोठे ध्येय साध्य करता येते.
4. संपत्तीपेक्षा योगदान महत्त्वाचे: समाजाच्या प्रगतीत दिलेले योगदान हे संपत्तीपेक्षा अधिक मूल्यवान असते.
जॉर्जच्या जीवनाचा प्रभाव
“एक होता कार्व्हर” वाचताना वाचकाला जॉर्जच्या जीवनातील संघर्ष, त्याचे विज्ञानातील योगदान आणि त्याची समाजसेवा यामुळे प्रेरणा मिळते. ही कादंबरी केवळ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या जीवनकथाच सांगत नाही, तर ती वाचकाला आत्मपरीक्षण करायला लावते.
निष्कर्ष:-
“एक होता कार्व्हर” मधील जॉर्ज हा संघर्ष, साधेपणा, विज्ञान आणि मानवतेच्या सेवा यांचा आदर्श आहे. वीणा गवाणकर यांनी त्याच्या जीवनाचा प्रवास अतिशय प्रभावीपणे मांडला आहे, जो प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.