Share

“मन मै है विश्वास” या आत्मकथनातून विश्वास नांगरे पाटील हे वाचकांना जिद्द आत्मविश्वास, धैर्य संयम आणि कठोर अशा परिश्रमाच्या यश कसे मिळवता येते हे सांगू इच्छितात. हे पुस्तक म्हणजे लेखकाचा प्रवास आणि अनुभवांची शिदोरी आहे. मा.श्री विश्वास नारायण नांगरे हे आय.पी.एस अधिकारी आहेत, त्यांचे हे पुस्तक मनाला हट्ट पकडून ठेवणाऱ्या लेखनशैलीमुळे आमच्यासारख्या तरुणांना आकर्षित करते.
लेखक आपल्या जीवनातील पहिल्या काळापासून लेखनाला सुरुवात करतात. कोकरूड गावातील एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या आणि कष्टाच्या दुनियेत वाढलेला, तो यशाच्या मार्गावर जात असतांना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.त्यांच्या बालपणीच्या आठवणीमध्ये ते सांगतात की त्यांच्या शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी शिक्षकांनी दिलेली शिकवण आणि वडिलांनी त्यांच्या समोर ठेवलेले स्वप्न त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी मार्ग दाखवतात. शालेय शिक्षणापासून ते मुंबई,पुणे मधील विद्यालयीन शिक्षण तसेच दिल्लीतील यू.पी.एस सी ची मुलाखत गाठण्यापर्यंत त्यांनी परिस्थितीशी दिलेली झुंज असामान्य म्हणावी लागेल.स्पर्धापारीक्षेच्या अभ्यासाला लागणारी साधनसामग्री,पुस्तके,नोट्स यांची जमवाजमव असेल किवा परिस्थितीचे चटके सारं काही सोसत; आपले ध्येय गाठण्यासाठी डिटरमाइड राहिले.त्यांचे जीवन, वाचनाच्या आणि एकाग्रतेच्या कौशल्याने शिकत राहण्याचे प्रतिक बनले आहे. पुस्तक कसे वाचावे,परीक्षेच्या तासांची योग्य नियोजनबद्ध आखणी करून उत्तर कसे लिहावे या बद्दल तंत्र त्यांनी स्वत: विकसित केले आणि ते प्रभावीपणे मांडले.
‘तरुणपण घोडचुका,प्रौढत्व संघर्ष, म्हातारपण पश्चाताप’ या वाक्यातून त्यांना समजलेला प्रामाणिकतेचा अर्थ आणि सावधपणा तुयांच्या कृतीतून साहजिकच दिसतो. ‘शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर, युद्धाच्या काळात कमी रक्त सांडाव लागत’ , त्यांच्या यशामागे असलेला संघर्ष, त्यांची घेतलेली मेहनत आणि प्रत्येक टप्प्यावर केलेलं नियोजन वाचकांना नेहमीच प्रेरणा देते. त्यांची स्वतःची चुकांचे, अविचारांचे आणि चुकीच्या निर्णयांचे तपशील देत वाचकांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे. बेभरवशाच्या स्पर्धा परीक्षेच्या मृगजळात उतरून त्यांनी १९९६-१९९७ च्या काळात सलग तीन परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केल, ते म्हणतात हे यश लक बाय चान्स नसून,वेळेच नियोजन काय करायच ? कस करायचं ? आणि कोणी करायचं ? याची पद्धतशीर मांडणी आणि मग त्यावर अंमलबजावणी म्हणजेच त्यानुसार अभ्यास आणि सराव हे, सगळ कारणीभूत होत. परिस्थिती माणसाला बनवत नाही तर त्याच्यात असणारे सामर्थ्य टी ठरवते;त्यांचे कष्ट, त्यांची प्रामाणिक मेहनत आणि कडवट उणीवा त्यांना मोठ यश मिळून देता.उतरायचं, लढायचं ,जिंकायची तयारी ठेवायची हरलो तर पुन्हा उठायचं सर्वस्वाची कसोटी लाऊन लढायचं पण रडत बसायचं नाही. हा दृढनिश्चय आपल्याला आशेचा किरण देऊन जातो. ‘ परमेश्वरा मी जे बदलू शकत नाही ते स्वीकारण्याची मला ताकद दे,जे मी बदलू शकतो ते बदलण्याच मला सामर्थ्य दे, जे बदलू शकतो व बदलू शकत नाही यातला फरक ओळखण्याचं शहाणपण दे’ , हि निर्मळ आणि प्रांजळ प्रार्थना या पुस्तकाद्वारे आपल्या मनात स्पर्श करून जाते.
अधिकारी सेवेत रुजू झाल्यानंतर परिवर्तन घडवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वीपणे पार पाडला आहे. २६ / ११ च्या दहशतवादी हल्यात त्यांनी दाखवलेल्या पराक्रमामुळे त्यांनी राष्ट्रपती पोलीस पदक (शौर्य) प्रदान करण्यात आला आहे.या आत्मकथनाणे लेखकांच्या जीवनातील अनोख्या पैलूचा शोध लावता येतो.अवघ्या तरुणाईचे आयडॉल,मोटीवेशनल स्पीकर असून त्यांची भाषा आणि वकृत्वशैली वाखाणण्याजोगी आहे. वाचकांच्या मनात नवी उमेद, उत्साह आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या या पुस्तकातील प्रेरणादायी संदेश – ‘जिथे विश्वास आहे तिथे यश आहे’.

Recommended Posts

The Undying Light

Mr. Sandip Darade
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

Mr. Sandip Darade
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More