Book Reviewed by वेदश्री सुनिल जोशी (१२वी कला)
मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे ‘माझी जन्मठेप’ माझी माझी जन्मठेप हे पुस्तक विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमान निकोबार येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना आलेल्या अनुभवांवर लिहिले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योद्धे वीर सावरकर यांना दोन जन्म ठेवेची म्हणजे पन्नास वर्षाची शिक्षा झाल्यावर त्यांची परवानगी अंदमानला केली गेली. तेथे त्यांचे जीवन हे मृत्युशी झुंज देत होते. पण त्या मृत्युचा पराभव झाला व सावरकरांचा विजय झाला. सावरकरांच्या वीर रसाने ओथंबलेल्या चरित्रामध्ये अनेक कठीण प्रसंग आहेत. त्यापैकी अंदमान पर्व हे अत्यंत रौद्र व भयानक पर्व आहे. त्यांची रोमांचकारी कथा माझी जन्मठेप या आत्मकथेत सावरकरांनी सांगितली आहे. २४ डिसेंबर १९१० रोजी त्यांना काळ्या पाण्याची पहिली शिक्षा सुनावण्यात आली. तर ३० जानेवारी १९९१ रोजी दुसरी काळपाण्याची शिक्षा देण्यात आली. स्वातंंत्र्यप्राप्ती हा त्यांच्या मुख्य हेतु होता. व त्यांनी त्या मुख्य हेतुसाठी आपले जीवन पणाला लावले. काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना त्यांना अनेक यातना झाल्या परंतु त्यांचा मुख्य उद्देश समोर ठेवुन त्यांनी शिक्षा भोगली. परंतु त्यांनी हार मानली नाही. या पुस्तकातुन मी एकच शिकले की, कितीही संकट उभे आली तरी न डगमगता त्यांना सामोरे जाणे.