डॉ.सुनिल घनकुटे (मराठी विभाग ), सहाय्यक प्राध्यापक अगस्ति कला ,वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान
Read More
डॉ.सुनिल घनकुटे (मराठी विभाग ), सहाय्यक प्राध्यापक
अगस्ति कला ,वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय ,अकोले
आजच्या पुस्तकाचे परिक्षण द्यावयाचे आहे, ते पुस्तक म्हणजे आदिवासी आयकॉन्स. डॉ. तुकाराम रोंगटे यांनी लिहिलेले असून यात आदिवासी समाजातील एकूण ३० लोकांनी असामान्य कार्यकर्तुत्वाने यांनी समाज बदलण्याची दिशा दाखवली, अशा आदिवासी समाजाच्या, त्यांच्या कल्याणाच्या, समाजासाठी झगडणाऱ्या या आयकॉन्सची माहिती या पुस्तकात दिलेली आहे, असे हे आदिवासी समाजातील आयकॉन्स यांचा एक छोटासा चरित्र ग्रंथ आपल्याला म्हणावा लागेल.
डॉ. तुकाराम रोंगटे यांनी आदिवासी आयकॉन्स हा ग्रंथ लिहून केवळ आदिवासी समाजापुरतेच नव्हे तर सर्व समाजासाठी फार महत्त्वाचे काम केले आहे. जेणेकरून इतर समाजातील सुद्धा लेखक त्या त्या समाजातील असे गुणधर्म्य रत्न बाहेर काढून समाजापुढे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची उकल करतील हाच कदाचित हेतू हा ग्रंथ बनविताना लेखकाचा असावा.
या ग्रंथात त्यांनी ज्या एकूण ३० व्यक्ती निवडलेले आहेत त्याच खऱ्या अर्थाने आदिवासी आयकॉन्स आहेत, यामध्ये वीर बिरसा मुंडा ज्यांनी इंग्रजांच्या सावकारांच्या विरुद्ध जय उगलाल उभारून खऱ्या अर्थाने चळवळ काय असते, एकसंध समाज कसा तयार करायचा आणि आपला समाज, संस्कृती कशी टिकवायची हा विचार त्यांनी त्या लेखांमध्ये मांडलेला असून, सरंजामा विरुद्ध लढणारा खंदा शिपाई रेवजी पांडुरंग चौधरी, की ज्यांना कॉम्रेड रेवजी भाई म्हणतात. असे जव्हार संस्थानामधील एका खेड्या गावांमध्ये जन्मलेला पोरगा, अतिशय हलाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत समाज उद्धाराच्या चळवळीने पुढे येतो आणि एक बिनविरोध आमदार म्हणून विधानसभेमध्ये जातो आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने वाचा फोडतो. वेडबिगारी पिळवणूक, गुलामगिरी, सावकारी त्याचबरोबरच भ्रष्ट राजनीती याच्याविरुद्ध आवाज उठवणारे रेवजी भाई यांच्याही कार्याचा त्यामध्ये आढावा घेतलेला आहे.
या पुस्तकात असलेल्या 30 आयकॉन्स पैकी माझा अनेक आयकॉन्सशी संबंध आला त्यांना मी जवळून हेरलं- पाहिलं, त्यांनी समाजासाठी आणि देशासाठी त्यांचे असलेले कार्य कर्तृत्व हे हिमालयापेक्षाही उंच आपल्याला दिसून येते . त्यात अकोल्याचे सावकारशाही आणि गुंडगिरीचा कर्दनकाळ असल्यास असणारे कॉम्रेड सकृ बुधा मेंगाळ असतील किंवा आपल्या वारली चित्र लिपिने अडाणी असूनही आंतरराष्ट्रीय कीर्तीचे एक वारली चित्रकलेचे जनक म्हणून जीवा सोमा म्हसे . असा हा अवलिया सुद्धा आपल्याला यामध्ये दिसून येतो, की ज्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा भारत सरकारने दिला आहे . त्यात अकोल्याचे सच्चा दिलाचा मनमिळवणी मितभाषी कार्यकर्ता अकोल्याचे आमदार यशवंतराव सखाराम भांगरे यांच्या जीवनाचा लेखाजोखा यामध्ये घेतलेला असून, भूमी सेनेच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब, वेडबिगार, सावकारशाही, आदिवासी समाजावर अन्याय करणाऱ्या जुलमी राज सत्तेविरुद्ध आवाज उठवण्याचे काम एक छोटीशी उंचीने कमी असलेले पण विचारानं प्रघात असलेले असे काळूराम काका दोधडे .आदिवासींचे ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले जाते असे आदिवासींचे पहिले IAS डॉक्टर गोविंद गारे यांच्या जीवनातून त्यांनी आदिवासी समाज संस्कृती कशी टिकली पाहिजे एवढेच नव्हे तर त्यांच्यावर जवळजवळ ५० पुस्तकांच्याही पेक्षा जास्त पुस्तक लिहून ती समाज उपयोगी जीवन कशाप्रकारे असावे, त्याचबरोबर आदिवासींसाठी कोणकोणत्या योजना, कायदे असावेत त्याची अंमलबजावणी कशी असावी, खोट्या – बोगस आदिवासींचे कर्दनकाळ म्हणून ज्यांना उल्लेखले जाटे गोविंद गारे साहेब आणि आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड नसते तर आज आदिवासी समाजामध्ये कोटीच्या कोटी बोगस घुसकरांची टोळी तयार झाली असती, या टोळीला आळा घालावा म्हणून गोविंद गारे आणि आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड व आदिवासी नेत्यांनी विधानसभेमध्ये कायदा आणला आणि जात पडताळणी हा कायदा २००० ला लागू केला आणि तेव्हापासून आदिवासींमध्ये असलेली घुसखोरी कमी झाली. हे या व्यक्तींचा असलेले वेगळेपण आहे.
या आयकॉन्स पुस्तकात आदिवासींचे तारनहार मधुकर काशिनाथ पिचड यांच्या जीवनाचा वेध घेतलेला असून एक शिक्षकाचा मुलगा ते पंचायत समिती सभापती, आमदार, आदिवासी विकास मंत्री यांच्या जीवनाचा लेखाजोखायत मांडलेला असून ,आपण समाजासाठी आहोत, समाज आपल्यासाठी नाही. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या विचारांने पिचड साहेबांनी अकोले तालुक्यातीलच आदिवासींसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील आदिवासींसाठी फार मोठे योगदान त्यांचे दिसून येते. स्वतंत्र आदिवासी बजेट असेल, पेसा कायदा असेल, त्याच काळामध्ये धनगरांच्या विरोधामध्ये आंदोलन असेल, बोगस आदिवासींच्या विरोधामध्ये आंदोलन असेल, त्याच काळामध्ये महाराष्ट्र पॅटर्न म्हणून जो पेसा कायदा महाराष्ट्रात लागू झाला, तोच राज्यस्थान आणि इतर तत्सम देशातील राज्यांमध्ये सुद्धा लागू झाला, हे योगदान त्यांचे आहे. त्यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये पाणी, वीज, रस्ते, आरोग्य या सगळ्या सुविधा पुरवल्या. एक कार्यकर्ता ते मंत्र कसा असावा याचे उत्तम दृष्ट उदाहरण म्हणजे वंदनीय मधुकर रावजी पिचड. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या मुशीतून तयार झालेले कवी म्हणजे कॉ. वाहरू दादा सोनवणे, जगातील कदाचित पहिली आत्मकथनकार असलेली कॉम्रेड नजुबाई गावित यांचे आदोर, भिवा फरारी अशासारख्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून आत्मचरित्रांच्या माध्यमातून आदिवासी समाजातील असलेले वेगळेपण हे कादंबऱ्यांच्या, आत्मचरित्रांच्या माध्यमातून मांडले आहे. कवी आणि कार्यकर्त्यांचे आजोड रसायन म्हणजे रामचंद्र चिमाजी जंगले यांचे चिंधी किंवा माळीन बाईचा हुंदका अशा कितीतरी कविता संग्रामच्या माध्यमातून त्यांनी समाजाचे प्रश्न मांडले. त्याचबरोबर जर पाहिलं तर पुणे विद्यापीठामध्ये कुलसचिव म्हणून कार्यरत असणारे सिताराम रखमा जोशी एका सामान्य आदिवासी कुटुंबामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला येतो आणि आपल्या कार्यकर्तुत्वाच्या बळावर बुद्धीच्यातुरेच्या बळावर एका देशातील नव्हे तर जगातील नामांकित विद्यापीठाचा कुलसचिव होतो हा सगळा विचार हे सगळे मेहनत आणि हे करत असताना सुद्धा समाज महत्त्वाचा कसा आहे, समाजासाठी आपण काय केलं पाहिजे, म्हणून आदिवासी कृती समितीचा अध्यक्ष, अनेक आदिवासींच्या हितासाठी वेगवेगळ्या संघटना काढून त्यांनी आदिवासी समाज कसा टिकला पाहिजे याच्या दृष्टीने सिताराम रखमा जोशी यांनी काम केलं. त्याचबरोबर निसर्गाच्या गाभ्यातून उमललेले काव्य सुमन म्हणजे कविवर्य तुकाराम धांडे यांनी आपल्या वळीव कविता संग्रहातून खऱ्या अर्थाने एक निसर्ग कवी कसा असावा याची मांडणी केली आहे .
Show Less