कंबोडायण

Share

कंबोडायण लेखक वाळेकर रवि परीक्षक गरुड रोहित रवींद्र व्याख्याता MSIHMCT Pune

विश्लेषण(Analysis)
लेखनशैली: लेखकाची लेखन शैली अतिशय सोपी असून, नवीन मराठी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्याला देखील समजेल अशी आहे. पुस्तकात लिहिताना अधून मधून वापरलेली,नर्मविनोदी शैली वाचताना फार आकर्षक वाटते.

विषय आणि संदेश: कंबोडिया सारख्या तुलनेने नवख्या देशात केलेले पर्यटन हा या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. अजून हि नवीन देशात फिरायला जाताना काहीतरी भीती पर्यटकांना  असते,त्या भीतीवर मात करून केलेली हि भ्रमंती आहे. नवीन देशात जाताना किंवा कंबोडिया मध्ये जाताना काय बघावे , काय प्रसिद्ध आहे याचे मुद्देसूद वर्णन लेखकाने केले आहे.
 
भावनिक परिणाम: कंबोडिया हा भारताच्या जवळ असलेला देश. नुसताच भौगोलिक जवळ नव्हे तर सांस्कृतिक दृष्टीने सुद्धा. भारत आणि कंबोडिया मध्ये खूप सारे साम्य आहे. अजूनही भारतीय देव – संस्कृती, बौद्ध कंबोडिया मध्ये काही ठिकाणी टिकून असलेली आणि सांभाळलेली आपल्याला या पुस्तकातून दिसून येते. भारताबाहेरही भारतीय संस्कृती अनुभवण्यासाठी योग्य असलेला देश अशी च ओळख आपल्याला या पुस्तकातून होते. 

ताकद आणि कमकुवत बाजू (Strengths and Weaknesses)
ताकद: भारतीय संस्कृती हि किती मौल्यवान आहे आणि ती बाहेरच्या जगात किती सांभाळली जाते, कशी सांभाळली जाते याचे वर्णन या पुस्तकात आहे. हे वाचून आपल्याला तिथे जायची नक्कीच ईच्छा होते, हे या पुस्तकाचे सामर्थ्य आहे.

कमकुवत बाजू: या पुस्तकात एकही कमकुमात बाजू आढळली नाही.

वैयक्तिक विचार (Personal Reflection)
जोडणी: ज्यांना कंबोडिया फिरायचा आहे, विचार आहे, त्यांनी तर हे पुस्तक वाचावेच पण बाकी लोकांनीही जरूर वाचावे . कारण पुस्तक वाचताना, लेखक जणू आपल्याला बोट धरून सर्व ठिकाणी फिरवून आणतो. या पुस्तकात फक्त प्रसिद्धच नाही पण काही अप्रसिद्ध ठिकाणे सुद्धा सांगितली आहेत . कोणताही नवीन देश, प्रदेश पण आपली स्वतःची संस्कृती वेगळ्या नजरेतून आपल्याला या पुस्तकात दिसते.

निष्कर्ष (Conclusion): वाचायला आणि समजायला अतिशय सोपे, रंजक पुस्तक .

अंतिम विचार: हे पुस्तक हौशी पर्यटकांनी वाचावे पण त्या बरोबर ट्रॅव्हल आणि टुरिझम चे विद्यार्थी किंवा जे लोक / विद्यार्थी  मराठी नवीन शिकत आहेत त्यांना सहज सोपे भाषा आणि देश दोन्ही उलगडून दाखवेल असे आहे.

Price:  
₹500
₹450

Original Title

कंबोडायण

Publish Date

2023

Published Year

2023

Total Pages

302

ISBN

978-81-7421-086-9

Format

Softcover

Country

India

Language

Marathi

Average Ratings

Submit Your Review