"कॉलनी" हे सिध्दार्थ पार्धे लिखित एक कादंबरी आहे, जी शहरीकरण, माणसांचे जीवन आणि त्यांच्या
Read More
“कॉलनी” हे सिध्दार्थ पार्धे लिखित एक कादंबरी आहे, जी शहरीकरण, माणसांचे जीवन आणि त्यांच्या अस्तित्वाशी संबंधित अनेक गोष्टींवर प्रकाश टाकते.या कादंबरीत, एका कॉलनीतील विविध लोकांची कथा सांगितली आहे.
कथा एका सध्या कॉलनीत राहणाऱ्या व्यक्तीचा जीवनावर आधारित आहे. त्यांच्या रोजच्या संघर्षाचा,त्यांना मिळालेल्या समाजातील स्थानाचा,आणि त्यांना दिलेल्या अपेक्षांचा मागोवा घेतला जातो.हे पात्र विविध सामाजिक,मानसिक आणि भौतिक परिस्थितीचा सामना करत असतात, आणि त्यांचा परस्पर संबंध कॉलनीतील इतर लोकांसोबत कसा आहे, हे या कादंबरीत दाखवले आहे.
त्याचप्रमाणे “कॉलनी” ही कादंबरी शहरी जीवनातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर एक सुस्पष्ट,विचारप्रवर्तक आणि संवेदनशील दृष्टिकोन मांडते.त्यात जीवनातील छोटे-मोठे निर्णय,व्यक्तिमत्वाची जाणीव,आणि मानवी स्वभावाचे असंख्य पैलू उलगडले आहेत.
सिध्दार्थ पार्धे यांनी आपल्या लेखनातून समाजाच्या विविध स्तरांतील व्यक्तिमत्त्वांचा गहन अभ्यास केला आहे.
‘आपल्या सर्वांच्या शरीरात एकाच रंगाचं रक्त वाहत आणि ते म्हणजे लाल’ अस लेखकाने या कादंबरीत व्यक्त केलं आहे.
‘शिका आणि संघर्ष करा’ हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश लेखकाने प्रत्यक्षात आणला. विपरीत परिस्थितीशी लेखकाने मोठ्या जिद्दीने संघर्ष केला. लेखक स्वतः म्हणतात “जिथे मी रडलो तिथे मी गमावलं,जिथे मी हिम्मत दाखवली तिथे मी कमावलं”.
लेखकाने काहीही लपवून ठेवलेले नाही. ज्यांनी मदतीचा हात पुढे केला त्यांच्याविषयी देखील लेखक कृतज्ञ आहेच; पण हिडीस फिडीस केलं,कुचेष्टा केली त्यांचेही लेखकांनी आभार मानले आहेत.त्यांचे आव्हान कर्तुत्वाला पोषक ठरले. लेखकानं नमूद केल्याप्रमाणे,त्यांची निंदा करणाऱ्यांपेक्षा त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांच पारड नेहमीच जास्त जड होत.
अपार दरिद्र्यावर मात करून स्वकर्तुत्वाने आपल जगणं सुफल संपूर्ण करणाऱ्या लेखकांची जीवनकथा स्फूर्तिदायक आहे.
सिध्दार्थ पार्धे हा मुलगा अशिक्षित समाजात जन्माला आला;प्रतिकूल परिस्तितिशी झगडून त्याने b.com पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि सिध्दार्थ हे नाव सिध्द केले.
या कादंबरीत महत्वाचे मुद्दे वाचले ते म्हणजे…
1) शहरीकरण आणि त्याची समस्या
2) मानवी स्वभाव आणि त्याचे नातेसंबंध
3) सामाजिक वर्गविभाजन
4) आर्थिक विषमता
5)समाजातील अशा आणि निराशा.
हे पुस्तक वाचल्यानंतर खूप छान प्रेरणा मिळाली.
Show Less