श्री रविंद्र देशपांडे

By Shende Tejaswini

समाज सुधारक धोंडो केशव...

Share

Book Review by Dr.Tejaswini Shende, Khadki Education Society’s Tikaram Jagannath Arts, Commerce & Science College, Khadki, Pune – 411003

समाज सुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा समाजासाठी केलेला स्त्री शिक्षणसाठी कार्याचा खडतर कष्टाचा इतिहास याच पुस्तकात आहे तसेच श्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लोककल्याण स्त्रियांसाठी शिक्षण आणि आश्रम वसतिगृह ची निर्मिती तसेच शाळा महाविद्यालय ची निर्मिती चा इतिहास गाथा शतकाची माध्यमाने दिसून येते.

गाथा शतकाची या पुस्तकात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शतकाची वाटचालीचा इतिहास ग्रंथरूपाने वाचण्यास मिळाला. खोलवर पोळमूळ रुजलेल्या पारंब्या -शाखा आणि विकसित झालेल्या त्यांच्या शाखेतून शाखा हे आपणास पाहण्यास मिळतात. भावी पिढीसमोर प्रतिकूल काळातही रुडीग्रस्त- समाजाला प्रेरणा म्हणून कार्य करते. संस्थेची आरंभीची खडतरचा संपूर्ण प्रवास या पुस्तकाचा अभ्यास करताना समजून आले.

महर्षी धोंडो केशव कर्वे हे का मोठे झाले?  कारण त्यांनी स्त्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून निर्माण केलेल्या आश्रम, वसतिगृहiतून निर्माण झालेल्या विद्यार्थिनी, त्यांचे आयुष्य सुधारले गेले, त्यांची पिढी सुधारली गेली.

प्रतिकूल स्त्री शिक्षण समाजव्यवस्था असताना महर्षी कर्वे यांनी नेहमीच प्रगतीच्या दिशेने केलेले कार्य हे तितकेच महत्त्वाचे आहे. समाजकार्याचे स्वप्न बाळगून सतत संघर्ष करीत समाज प्रबोधन हे तितकेच महत्त्वाचे आहे. स्त्रियांसाठी हे पुस्तक उगवत्या सूर्यासारखा असून प्रत्येकाने पुण्यातील कर्वेनगर येथील स्त्री शिक्षण संस्थेस अवश्य भेट द्यावी, जेणेकरून गाथा शतकाची ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या समाजकार्य झाले त्याची प्रत्यक्ष प्रचिती आपणास येथे असलेले आश्रम वसतिगृहच्या जुन्या इमारती आपणास ह्याचा पुरावा देतात.

महर्षी कर्वेचे कार्य एवढे मोठे होते की सर्व स्त्री जातीला कृतज्ञतेची भाऊबीज म्हणूनच स्वीकारावशी वाटते. ज्या कन्या आश्रम मध्ये राहून शिक्षण घेतले आणि नंतर त्यांच्या परिवाराला संस्कार धारणेतून त्याचा समाजाला- परिवाराला- शहराला आणि कळत नकळत देशालाही याचा परिणाम पाहण्यास मिळतो . किती परिणाम झाला ते मोजता येणे अशक्य आहे परंतु त्याचा झालेला विकास निश्चितच पाहायला मिळतो अनुभवास येतो.

मी संशोधनासाठी श्री शिक्षण संस्था यास भेट दिली. कार्य पाहिले आणि नंतर गाथा शतकाची हा महर्षी कर्वे यांचा ग्रंथ वाचला जणू काही जे पाहिले ते शब्दात उतरवले असे वाटले. जशी वर्ष दिवस जातील तसे या झाडाचे वृक्ष झाले आणि या कार्याचा व्यापही तेवढाच वाढला या संस्थेत कार्य करणारे प्रत्येक जण हा निष्ठेने कार्य करतो , संस्कार घडवतो , स्वतःवर आणि संबंधित असणारा सर्वांवर.

फक्त महर्षी धोंडो केशव कर्वे नाही तर त्यांच्या सोबत बाया कर्वे, कै गो म चिपळूणकर, भास्करराव धोंडो कर्वे ,कावेरी ताई भास्करराव कर्वे, दिनकर राव धोंडो कर्वे, इरावती दिनकरराव कर्वे ,रघुनाथराव धोंडो कर्वे, मालतीताई रघुनाथराव कर्वे, डॉक्टर शंकर धोंडो कर्वे ,सौ रेवती शंकर कर्वे, मातीताई रघुनाथ कर्वे, सौ गणू ताई सहस्त्रबुद्धे ,श्रीमंती रंगुताई लेले, श्रीमती कलम ताई गरुड या सर्वांनी संस्थेच्या मुलींचे कार्य करताना काका व मावशी झाल्या तसेच पहिल्या चार विद्यार्थिनी ही मालतीताई वानुताई सहस्त्रेबुध्ये, कमलताई , रंगूताई होत्या.

इथे असणाऱ्या शाळेत 185 मुली पहिली ते सातवी पर्यंत वसतीगृहात रहात असून ही शाळा सुसज्ज आणि प्रसन्न वातावरण यामुळे मुलं आणि पालकवर्ग दोन्ही समाधानी होते. त्याच जागेत दवाखान्याची व्यवस्था असून कायमस्वरूपी डॉक्टर सकाळ -संध्याकाळ उपलब्ध आहेत. नर्स सुद्धा 24 तास विद्यार्थिनींसाठी असतात. त्याचबरोबर येथे वृद्धाश्रम सुद्धा असून त्यात बाहेरून आलेले निवासी सेवक या संस्थेत राहून विद्यार्थीना आणि वृद्धांसाठी नेहमीच कार्य करतात.

या आश्रमासाठी आठ ते दहा स्वतंत्र विद्यार्थ्यांसाठी खोल्या असून निवासी डॉक्टर आहे.

समाजात होणारे विविध एकतर्फी प्रेम व हिंसा अल्पवयीन मुला मुलींवरील लेंगिक अत्याचार यासाठी समोरपदेशनची व्यवस्था सुद्धाया संस्थेत उपलब्ध आहे. विविध स्त्री विषयक प्रश्नांचा अभ्यास करणारे हे स्त्री अभ्यास केंद्र महिलांसाठी मोफत समुपदेशन केंद्रही चालवते. महिलांना येणारे कौटुंबिक प्रश्न त्यांचे स्व प्रतिमेशी निगडित असलेले प्रश्न, निराशा ,किरकोळ स्वरूपाचे मानसिक आजार अशा अनेक समस्यांसाठी समुपदेशन आहे. तसेच बाया कर्वे स्त्री अभ्यास व संशोधन केंद्र असून आवड असणाऱ्या विद्यार्थिनींना येथे अभ्यास करून विविध विषयांवर संशोधन प्रकल्प करण्यासही प्रोत्साहन दिले जाते. इथे एक तेजस्विनी क्लबही 2003 मध्ये निर्माण झाले, असून विद्यार्थिनींच्या आरोग्याकडे व्यायाम खेळ यांच्याकडे विशेष लक्ष दिले. 14 जून 2003 रोजी मुख्यमंत्री श्री सुशील कुमार शिंदेच्या हस्ते या तेजस्विनी क्लबची उद्घाटन झाले असून स्त्रियांनी शारीरिक दृष्ट्या सक्षम कार्यक्षम असायला पाहिजे. या दृष्टीने आधुनिक युगातल्या आव्हानांना समोरे जाण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन दिले जाते.

Original Title

गाथा शतकाची

Subject & College

Publish Date

2008-04-11

Published Year

2008

Format

Hardcover

Country

India

Language

Marathi

Submit Your Review