गोष्ट पैशापाण्याची

By वानखेडे प्रफुल

Price:  
₹299
Share

Availability

available

Original Title

गोष्ट पैशापाण्याची

Publish Date

2022-01-01

Published Year

2022

Publisher, Place

ISBN

978-93-89834-84-0

Format

Paperback

Country

India

Language

Marathi

Average Ratings

Readers Feedback

गोष्ट पैशापाण्याची

Book Reviewed by DRORE NAMRATA RAJENDRA, SYBA Vidya Amrut Dnyan Prathisthan’s Arts, Science, Commerce College Shirsondi, Tal. Malegaon प्रफुल्ल वानखेडे यांचं 'गोष्ट पैशापाण्याची' आपल्याला खऱ्या...Read More

Chaudhari Jagdish Devram

Chaudhari Jagdish Devram

February 7, 2025
×
गोष्ट पैशापाण्याची
Share

Book Reviewed by DRORE NAMRATA RAJENDRA, SYBA
Vidya Amrut Dnyan Prathisthan’s Arts, Science, Commerce College
Shirsondi, Tal. Malegaon
प्रफुल्ल वानखेडे यांचं 'गोष्ट पैशापाण्याची' आपल्याला खऱ्या जगात नेणारं पुस्तक
आहे.पैशासोबत माणसं, आरोग्य, ज्ञान, विज्ञान या गोष्टींचीही किंमत सांगणारं
पुस्तक. प्रफुल्ल यांचं हे पहिलंच पुस्तक, अनेक चांगले पायंडे पाडणारं मराठी पुस्तक
ठरणार आहे..
नव्या वाटा शोधणाऱ्या, स्वतंत्र व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या, बदलत्या
परिस्थितीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून
वाचावेच असे पुस्तक. माणूस कष्ट, व्यवसाय, गुंतवणूक करून पैसे कमावू शकतो.
मात्र, हा पैसा तात्पुरता आहे; टिकून राहते ती गुंतवणूक माणसांमधली. या
गुंतवणुकीचे रिटर्न पैशांत मोजता येत नाहीत. पैशातल्या आणि माणसांतल्या दोन्ही
गुंतवणुकींचे महत्त्व हळुवारपणे समजावणारे पुस्तक
हे पुस्तक खूप सुंदर आहे. याची सुरवात मुखपृष्ठावरून झाल आहे.आपली मुल्ये
त्याच्याशी असलेली कृती यामधून आपलं साकार होणार भविष्य या पुस्तकातून
दिसून येते. आयुष्यामध्ये कोणत्या टप्प्यावर कुठली गोष्ठ योग्य आहे कुठली अयोग्य
आहे हे आपल्याला पुस्तकातून दिसून येते. कुठली माणस बरोबर आहेत कुठली चुकीचे
आहेत हे यामध्ये समजून येते.

गिग वर्क कल्चर

मला सांगायला आवडेल सकाळच्या अवतरण पुरवणी मधली प्रफुल्ल वानखेडे यांची गोष्ट पैशापाण्याची ही लेक मालिका खूप गाजली. त्या लेखांचे पुस्तक करण्याचा सकाळ प्रकाशनाने जो निर्णय...Read More

डॉ. पंकज नाईकवाडी

डॉ. पंकज नाईकवाडी

January 20, 2025January 20, 2025
×
गिग वर्क कल्चर
Share

मला सांगायला आवडेल सकाळच्या अवतरण पुरवणी मधली प्रफुल्ल वानखेडे यांची गोष्ट पैशापाण्याची ही लेक मालिका खूप गाजली. त्या लेखांचे पुस्तक करण्याचा सकाळ प्रकाशनाने जो निर्णय घेतला. हि खूप मोठी गोष्ट आहे.

जग प्रचंड वेगाने बदलत आहे त्या बदलाचा अनुभव घेत आपण सध्या जगत आहोत. त्यामुळे हे पुस्तक अतिशय योग्य वेळी आपल्या हाती येत आहे. तंत्रज्ञानाने आपले सर्व जीवन व्यापून टाकले आहे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि त्याने आपण सगळे जोडले गेलो आहोत. कुठल्याही वेळी आपण एकमेकांसाठी उपलब्ध राहू शकतो हे याआधी कधीही शक्य झाले नव्हते. इंटरनेट आणि सोशल मीडिया यांच्यामुळे सर्व जग जवळ आले आहे. आपण एकमेकांशी जोडले गेलो आणि त्यासाठीची किंमतही अतिशय माफक सर्वांना परवडणारी आहे.

जग बदलतेय, तथा भारतही बदलतोय जगातल्या पाच मोठ्या अर्थव्यवस्थेत सध्या आपला समावेश होतो आणि पुढच्या पाच वर्षांमध्ये जगातल्या तीन मोठ्या अर्थव्यवस्थेत आपला समावेश होईल.

कोरोनाने सगळे वर्क कल्चर बदलून गेले आहे. आपल्यातल्या अनेकांना वर्क फ्रॉम होम करायला करून आणि भाग पाडले आहे. गेल्या दोन वर्षात Work from Home चे आता Work from Anywhere झाले आहे. कुठूनही आणि कोणासाठीही काम करण्याच्या लवचिकपणाचा एक परिणाम म्हणजे आपण गिग इकॉनोमी कडे जात आहोत. आयुष्यभरासाठी कायम लोकरी किंवा रोजगार ही संकल्पना आता इतिहास जमा झाली आहे. आता आयुष्यभरात एकाच वेळी अनेक कामे करावी लागतील नोकरी एके नोकरी असे करून चालणार नाही. तसेही पूर्णपणे नवीन नाही अनेक क्रिएटिव्ह प्रोजेक्ट मध्ये हे होत असते एखाद्या चित्रपटाची निर्मिती करताना अनेक क्रिएटिव्ह लोक एकत्र येतात तो प्रोजेक्ट पूर्ण झाला की ती टीम विखुरली जाते. तुम्ही स्वतःची क्षमता दाखवून दिली आणि प्रभाव निर्माण केला तर तुमची मागणी वाढू शकते नव्या गिग साठी तुम्हाला निवडण्यात येऊ शकते.

गिग वर्क कल्चर हे जग खूप वेगळे आहे. त्यासाठी नवा दृष्टिकोन आणि नवे कौशल्य यांची गरज आहे. हा दृष्टिकोन देण्याचे काम हे पुस्तक करेल त्यामुळेच गोष्ट पैशापाण्याची या पुस्तकाचे महत्व आणि गरज खूप जास्त आहे. या नव्या जगाची ओळख करून घ्यायची असेल तर हे पुस्तक सर्वोत्तम मार्गदर्शकाचे काम करेल यात शंका नाही.

भविष्यातल्या कामाचे स्वरूप आणि गिग कल्चरमध्ये काम करण्यासाठी जी कौशल्य लागणार आहेत. त्याचा विचार केला तर पाच प्रमुख गोष्टी लक्षात येतात.

सतत शिकत रहा– डार्विन असे म्हणतो वेगाने बदलणाऱ्या जगात जे सक्षम आहेत तेच जगतील असे नाही. तर जे परिस्थितीशी जुळवून घेतील ते जिवंत आणि टिकून राहतील या गतिशील जगात वाट शोधताना आपल्याला प्रगती करायची असेल तर नवी कौशल्य शिकण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही.
नेटवर्किंग शिका– आपण सगळेच एकमेकांशी अनेक अर्थाने जोडले गेलेल्या दुनियेत जगत आहोत. त्यामुळे आपले नेटवर्क किती मजबूत आहे. त्यावर आपली यश अवलंबून असते आपण निवडलेला भवताल आणि भविष्यातील उद्दिष्टे यांचे अतूट नाते असते. तो भवताल कसा आहे त्यावरच यश अवलंबून असते. आपण नातेवाईक निवडू शकत नाही. पण निश्चितच आपण आपले मित्र सोबती सवंगडी कुठले असावेत हे निवडू शकतो.
आर्थिक व्यवस्थापनाची जाणीव– सध्या बहुतांश तरुण मंडळी आपल्या पालकांपेक्षा जास्त पैसे कमवतात गिग वर्क कल्चर मुळे महिन्याचे ठराविक उत्पन्न ही संकल्पना आता बाद होत आहे. प्रोजेक्ट पूर्ण करा आणि पैसे घ्या असा आता जमाना आहे. अशा काळात पैशांचे व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाच्या आणि कठीण काम आहे.त्यामुळे वेळेचे आणि पैशांचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य शिकून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
विक्रीचे कौशल्य– सेल्स म्हणजे विक्री करणे हे आपले नाही तर दुसऱ्यांचे काम आहे. असे इंजिनियर आणि तंत्रज्ञ यांना वाटते असे मला आढळून आले आहे. याउलट वस्तूस्थिती ही आहे की विक्री करण्याचे कौशल्य हे प्रत्येकाला आले पाहिजे सध्याच्या गिग कल्चर मधला हा गंभीर मुद्दा आहे. नवीन का मिळवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मध्ये असलेले कौशल्य हे सेल करता आलेच पाहिजे.
संयम आणि सातत्य– आयुष्य हे थोड्या अंतरासाठी धावण्यासारखे नाही तर मॅरेथॉन सारखे आहे. उत्तम व्यवसाय करायचा असेल करियर घडवायचे असेल तर दीर्घकाळ प्रयत्न करावे लागतात त्यासाठी सगळ्यात आवश्यक घटक आहेत संयम आणि सातत्य
प्रत्येक गोष्ट ही शक्य तितकी इतकी सोपी करावी हा अल्बर्ट आईन्स्टाईन चा सिद्धांत प्रफुल्ल वानखेडे यांनी मांडला. पण ही सोपी गोष्ट आचरणात आणायला तेवढी सोप्पी नसते हे या पुस्तकातून दिसून येते. अतिशय उगवत्या शैलीत लिहिलेले हे पुस्तक वाचायला सोपे आणि चित्त वेदक आहे प्रफुल्ल देशपांडे यांनी अनुभवांच्या गोष्टींच्या आणि सल्ल्यांच्या माध्यमातून अनेक संकल्पना मांडल्यामुळे त्या वाचनीय झाल्या आहेत. त्यातून वाचकांना अनेक गोष्टी शिकायला मिळतील गोष्ट सांगण्याच्या त्यांच्या रोजच्या शैलीमुळे त्यातला आशय हा वाचकांच्या कायम आठवणीत राहील याची खात्री आहे.

प्रफुल्ल देशपांडे यांचा सगळा प्रवास हा विलक्षण आहे. साताऱ्यात वाढलेला एक बुद्धिमान युवक मोठे स्वप्न पाहतो स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतो नियोजन सातत्य आणि कठीण परिश्रमाची जोड देऊन ते स्वप्न पूर्ण करतो अपूर्व यश मिळवतो. आणि करियरच्या एका नव्या उंचीवर नेतो त्यांचा हा प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे.

आपण जे शिकलो ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा निश्चय आणि धडपड अतिशय कौतुकास्पद आहे. या पुस्तकात त्यांनी सांगितलेली जीवनमूल्ये आणि विचार सर्वांसाठी उपयुक्त ठरणारे आहेत.

या पुस्तकाला रिव्ह्यू करण्याची संधी मला मिळाली हा माझा सन्मान समजतो प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावी असे हे पुस्तक आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला मार्गदर्शनाची गरज भासेल कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागेल तेव्हा हे पुस्तक घ्या आणि त्यातल्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल नवी उमेद मिळेल.

आपलाच

डॉ. पंकज नाईकवाडी

सहाय्यक प्राध्यापक , रसायनशास्त्र विभाग

गोष्ट पैशापाण्याची

माणसाच्या आर्थिक दृष्टिकोनाला चालना देणारे पुस्तक - 'गोष्ट पैशापाण्याची' नाव - माहेश्वरी गोरडे (एम.ए. प्रथम वर्ष) ग्रंथालय आणि माहितीशास्र विभाग, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे मागील...Read More

माहेश्वरी गोरडे

माहेश्वरी गोरडे

January 20, 2025
×
गोष्ट पैशापाण्याची
Share

माणसाच्या आर्थिक दृष्टिकोनाला चालना देणारे पुस्तक – ‘गोष्ट पैशापाण्याची’
नाव – माहेश्वरी गोरडे (एम.ए. प्रथम वर्ष)
ग्रंथालय आणि माहितीशास्र विभाग, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे

मागील २० वर्षांहून अधिक काळ औष्णिक उर्जा, विविध इंधनाचे सुरक्षित ज्वलन, उर्जा संवर्धन या क्षेत्रांतील एक सुपरिचित व केल्व्हिन व लिक्विगॅससह पाच कंपन्यांचे संस्थापक व अध्यक्ष असलेले श्री. प्रफुल्ल वानखेडे हे सर्वाना परिचित आहेत. ते भारतात व जगभरातील १८ देशांच्या कंपन्यांच्या व्यवहारात कार्यरत आहेत. सर्वसामान्य कुटूंबात जन्मलेल्या प्रफुल्ल यांच्याकडे उद्योगाचा परंपरागत वारसा नव्हताच पण त्याचबरोबर भांडवल उभे करायलाही बळ नव्हते अशा अव्हानात्मक व विपरीत परिस्थितीतही त्यांनी संधी शोधत आणि अव्हानाला सामोरे जात आपला प्रवास सुरू केला आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून आज त्यांचे नाव उद्योजक जगतात आदराने घेतले जाते.
‘गोष्ट पैशापाण्याची’ हे त्यांचे पुस्तक म्हणजे आर्थिक नियोजनात काय करावे आणि काय करू नये याबाबत असणारी गुंतगुंत सविस्तर मांडून व्यवसायीक क्षेत्रात पडल्यावर आपण योग्य ती कौशल्ये वापरली तर निर्विवादपणे आपल्या क्षेत्रात यश कसे मिळवू शकतो याची प्रचिती देणारे हे पुस्तक. याच्या वाचनाने मी तर भारावून गेले आहे. अस्सल भारतीय मानसिकतेला अव्हान देणारे तसेच पैसे आणि पुस्तक या दोन्हीचे महत्व सांगणारे हया पुस्तकातील विवेचन मार्गदर्शक ठरून जाते. बाजारात येण्यापूर्वीच त्याची ऑनलाईन विक्री होण्याचा विकम हे या पुस्तकाचे महत्व अधोरेखित करणार आहे.
व्यवसाय करायचा म्हटल्यावर अभ्यास, ध्यास, कष्ट, चिकाटी, सातत्य या गुणांची आवश्यकता असतेच. साखळीमध्ये अनेक कड्या असतात त्याचप्रकारे नवउद्यमीसाठी अशा कडयांचा सामना करावा लागतो. यात एखादी कडी कच्ची राहीली किंवा तुटली तर संपुर्ण उद्यम ढासळलाच म्हणून समजा ! ‘गोष्ट पैशापण्याची’ मध्ये प्रामुख्याने व्यवहारज्ञान कसे असावे आणि तुमची व्यावसायीक इमारत उभी करण्यासाठी ज्या मुलभूत गोष्टी आवश्यक आहेत त्याचा लेखाजोखा दिला आहे. हा लेखाजोखा मराठी मनास उभारी घेण्यास भाग पाडतो.
फक्त स्वप्न बघून काही उपयोग नाही तर ते रक्तात आणायला हवं आपल्याला उंच भरारी घ्यायची असेल तर काही पाश तोडता यायला हवेत. भीती आणि संकटांच्या पलीकडे ध्येय गाठायचे स्वप्न मनापासुन जपता यायला हवे प्रस्तुत पुस्तक गोष्ट पैशापाण्याची लेखक प्रफुल्लजी वानखेडे, सकाळ प्रकाशनामार्फत प्रकाशित झालेलं हे पुस्तक गेल्या दोन वर्षापासून वाचकांच्या मनात धुमाकुळ घालत आहे लेखकाने मांडलेले वेळेचे, पैशाचे, कामाचे आणि आयुष्याचेही नियोजन ध्येय गाठण्यास मदत करत आहे.
वाचकाला नव्याने उदयोग करू पाहणाऱ्यास नवा दृष्टिकोन मिळतो. उदयोजगतामध्ये बुध्दी असो पैसा योग्य ठिकाणी कसा वापरावा याविषयी मार्गदर्शन दिले आहे तसेच पैशाच्या गुंतवणूकीबरोबर माणुसकीला दिलेला मदतीचा हात व सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची तत्त्वे लेखकांमध्ये स्पष्टपणे दिसून येतात. स्वप्न, ध्यास, नियोजन, सातत्य आणि कठिण परिश्रम हा यशाकडे जाण्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात घेतो.
बुध्दी आणि पैसा योग्य ठिकाणी कसे वापरावे तसेच उभारलेल्या उदयोगाला आर्थिक शिस्त कशी दयावी गोष्ट पैशापाण्याची यात लेखकाने पुस्तकाला योग्य तो आयाम दिला आहे.
पैशाचे व बुध्दीचे योग्य नियोजन व आर्थिक साक्षरतेचे महत्व आपल्या अनुभव कथनातुन स्पष्ट केले आहे मराठी माणसांचा उदयोग क्षेत्रातील व गुंतवणूकीतील गुंता सहतेने सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रवास माणसाला घडवतो, शिकवतो आणि नवनवीन आव्हाने पेलायची ताकदही देतो माणसांतील गुंतवणुकीमुळे माणुस आर्थिकदृष्टया, सामाजिकदृष्टया तसेच एक माणुस म्हणून अधिक प्रगल्भ होतो यशस्वी होणं हातांच्या रेषावरती नाही तर, आपल्या प्रामाणिक आणि नियोजनबद्ध प्रयत्नावरती आहे.

गोष्ट पैशापाण्याची

सध्या सगळे जग हे आभासी जगात जगत आहे. प्रत्येक जण एकमेकांशी तुलना करत आहे. त्याच वेळी हे करीत असताना मनुष्याला आर्थिक घडी बसवता येत नाहीय....Read More

Jitesh Jagannath Dhule

Jitesh Jagannath Dhule

January 13, 2025
×
गोष्ट पैशापाण्याची
Share

सध्या सगळे जग हे आभासी जगात जगत आहे. प्रत्येक जण एकमेकांशी तुलना करत आहे. त्याच वेळी हे करीत असताना मनुष्याला आर्थिक घडी बसवता येत नाहीय. सध्याची पिढी आपल्या आधीच्या पिढीपेक्षा जास्त कमावत आहे त्याचे आर्थिक नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना प्रचंड तणावाखाली जगावे लागत आहे. त्यातून आत्महत्या असे प्रकार घडत आहेत. या पुस्तकातून सर्वांना आर्थिक साक्षर करण्याचे अवघड असे काम अगदी सोप्या शब्दात लेखकाने केले आहे. मराठी माणूस उद्योग विश्वात आपले स्थान कसे निर्माण केले पाहिजे याचे बारकावे देखील लेखकाने अतिशय सोप्या भाषेत मांडले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण नेहमी म्हणतो की एक स्त्री शिकली पूर्ण कुटुंब शिकते म्हणूनच आर्थिक साक्षरता आणायची असेल तर आधी एक स्त्री आर्थिक साक्षर झाली पाहिजे. लेखकाने या पुस्तकात गरीब आणि श्रीमंत याची अतिशय सोप्या शब्दात व्याख्या सांगितली आहे, गरीब म्हणजे पैसे नसणे नसून पैसे कमावून सगळे खर्च करणारा आहे. प्रत्येकाने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचे असेल तर त्याला पुस्तकासारखा दुसरा मार्गदर्शक नाही. पैसे कमावत असताना एकमेकांची मने दुखवत तर नाही ना याची काळजी घेतली पाहिजे कारण ज्ञानात आणि माणसात केलेली गुंतवणूक ही आयुष्यात सगळ्यात जास्त परतावा देते. अशा सगळ्यांची जाणीव लेखकाने छोट्या छोट्या गोष्टीतून समजावून सांगितले आहे. आर्थिक साक्षरतेसाठी लेखकाने सोपे असे मार्ग सांगितले आहेत, ते म्हणजे मोठेपणा टाळून आहे तसे वागावे, प्रत्येकाने आपला रोजचा जमा – खर्च मांडावा, इतरांशी तुलना बंद करणे, गरज असेलच तरच नवीन वस्तू घ्यावी,  कोणतेही वस्तू घेत असताना लाज न बाळगता वाटाघाट करून घावी, अनावश्यक खर्च टाळावा ई. मराठी माणसाने व्यवहारात उतरण्याची तयारी दर्शविली पाहिजे यासाठीचे उत्तम मार्गदर्शन लेखकाने या पुस्तकात केले आहे. भरपुर ज्ञान आणि पैसे कमवावे पण त्याचा योग्य वापर करता आला नाही तर त्याचा शून्य उपयोग आहे. माणसाने पैसे कसे कमवावे आणि ते मिळालेला पैसे कुठे खर्च करावे याची करून देणारे हे पुस्तक आहे. थोडक्यात सांगायचे झाले हे पुस्तक प्रत्येकाला खऱ्या जगात कसे जगायचे याचे जाणीव करून देते. प्रत्येकाने आपल्या संग्रहात हे पुस्तक अवश्य ठेवावे.

Submit Your Review