
आरपार ओथंबलेपण जाणवल्याशिवाय राहत नाही. जाणिवांचा,...
लितवाङमयाचं विश्व अमर्याद आहे. कल्पनेपासून वास्तवापर्यंत आणि वास्तवापासून अतिवास्तवापर्यंत अभिव्यक्तीच्या सर्व प्रवाहांना सामील करून घेण्याचं प्रचंड सामर्थ्य या साहित्यप्रकारात आहे. मीनाक्षी गोरंटीवार यांचा ‘वेलू’ हा अशाच निरनिराळ्या विषयांचा मागोवा घेणारा सर्वांगसुंदर ललितलेखसंग्रह. प्रेमाचा अंकुर होऊन उगवलेला हा वेलू अनेक विषयांवर व्यक्त होत बहरत राहतो आणि शेवटी शेतकऱ्याच्या व्यथेला जाऊन भिडतो. यातलं व्यक्त होणं आत्माविष्काराच्या वाटेने जाणारं असलं तरी या वाटेवर अनुभूतींची असंख्य वळणं सामोरी येतात..
या पुस्तकातून मीनाक्षी गोरंटीवार यांच्यातील कवयित्रीचं दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या लेखनातलं आरपार ओथंबलेपण जाणवल्याशिवाय राहत नाही. जाणिवांचा, अभिव्यक्तीचा हा अनिवार ओघ शब्दाशब्दांतून वाहत राहतो. यातील लेखनही इतकं सहजसोपं, की प्रत्येक वाचकाला ते आपलंसं वाटावं. अधूनमधून पेरलेल्या कवितेच्या ओळी वाचकहृदयात प्रत्ययाच्या आनंदाची रुजवण करून जातात. कुठे प्रेमातली नवलाई, कुठे सौख्यातली हिरवाई, कुठे मैत्रीतलं अवखळपण, तर कुठे नात्यांतलं नवखेपण याबरोबरच ओढाताण, प्रतिकूलता, दाहकता अशा विविध अंगांनी वेलू साकारत जातो..
‘जादूगिरी सुरांची’ या लेखातील मला आवडलेल्या पुढील ओळी- ‘एक नादब्रम्ह आपल्याही अंतरात असते… कधी ऐकाल तर मनाची बासरीही सतत गुणगुणत असते… पण ते सूर ओळखता आले पाहिजेत. फुलविता आले पाहिजेत. कुरवाळता आले पाहिजेत. त्यात लिप्त होता आले पाहिजे, मग त्याचा कैफ काही निराळाच असतो.’ याबरोबरच ‘पाझर’ या लेखातून केलेलं शेतकरी कुटूंबाच्या दुर्दैवाचं चित्रण- ‘घरचा धनी सरणावर गेला म्हणून घरधनीण पार तुटली आहे… लेकरांच्या उघड्या बोडक्या अंगावर आपलंं झिरझिर पातळ हात हात टाकलं आहे… आसवांचे कढ पीत पीत लेकरं निजली आहेत… बाप आल्याचंं व पोटभर जेवल्याचं स्वप्न ती पाहत आहेत… काळोख पीत पीत माय लेकरांच्या काळजीनं रात्र काढते आहे… देवा तुला कधी पाझर फुटणार आहे..?’
प्रा. विजया मारोतकर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलीय. पुस्तकाचा वेध घेताना त्या लिहितात- ‘ललित आणि कविता यांचं फार जवळचं असं नातं आहे. या संग्रहात जवळपास प्रत्येक लेखामध्ये कविता ही आहेच आणि ती त्या लेखाशी साधर्म्य साधणारही आहे म्हणून संयुक्तिक पण वाटते. मरगळलेल्या मनाला प्रसन्नता देण्याचं काम हा ललितसंग्रह नक्कीच करणार आहे. संपूर्ण संग्रह वाचून झाल्यानंतर एका स्वप्नातून बाहेर पडल्याची अनुभूती झाली नाही तरच नवल!’ पुस्तकाचं वैशिष्ट्य यथार्थपणे अधोरेखित