
<span...
मी वाचलेल्या व मला सर्वाधिक प्रिय असणाऱ्या पुस्तकाचे नाव अग्निपंख आहे हे पुस्तक भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे. अग्निपंख ही एपीजे अब्दुल कलाम यांची आत्मकथा आहे. या पुस्तकात अब्दुल कलाम यांचा बालपणापासून तर राष्ट्रपती पदापर्यंतचा संपूर्ण प्रवास रचण्यात आला आहे. डॉक्टर अब्दुल कलाम भारताच्या यशस्वी शास्त्रज्ञा पैकी एक आहेत. त्यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो मध्ये महत्त्वाची योगदान दिले. भारताची सैन्य क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी अणुचाचणी घेतली म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन म्हणूनही संबोधले जाते ,2002 सालापर्यंत ते अत्यंत लोकप्रिय झाले होते म्हणूनच त्यांना भारताच्या राष्ट्रपती पदासाठी निवडण्यास आले .अग्निपंख या पुस्तकात अब्दुल कलाम यांनी त्यांच्या बालपणाचे जीवन ते राष्ट्रपतीपदासाठी करण्यात आलेली निवड पर्यंतचा संपूर्ण जीवन परिचय रेखाटला आहेत. या चरित्राची सुरुवात एका लहान मुलापासून होते जो नंतर इस्त्रोच्या प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती बनतो . मला या पुस्तकातील सुरुवातीचे धडे जास्तीच आवडले कारण या धड्यांमध्ये भारताच्या 1930 ते 1950 या कालखंडातील परिस्थितीचे चित्रण करण्यात आले आहे .अब्दुल कलाम यांचा जन्म धार्मिक नगरी रामेश्वरम मधील एका मुस्लिम कुटुंबात झाला. भारताच्या विभाजनापूर्वी असलेली देशातील धार्मिक एकता आणि एकात्मतेचे वर्णन अब्दुल कलाम यांनी पहिल्या दोन धड्यांमध्ये केले आहे अब्दुल कलाम यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की लहान असताना त्यांचे स्वप्न पायलेट बनण्याचे होते. परंतु पायलेट बनण्यासाठी असलेली इंटरव्यू परीक्षा ते अनुत्तीर्ण झाले ,परंतु निराश न होता त्यांनी दुसऱ्या क्षेत्रात आपले करिअर सुरू केले पुस्तकात सांगितल्याप्रमाणे कलाम यांनी सुरुवातीला विमान बनवण्याचे क्षेत्रात कार्य केले नंतर ते भारतीय अंतरिक्ष संस्था इस्त्रोकडे वळले.अग्निपंख पुस्तकात अब्दुल कलाम यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या सॅटेलाईट आणि मिसाईल कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे. अग्नी ,आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणे ही फार सुंदर पणे वाचकांना सांगितलेली आहे. जागतिक शस्त्र स्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे .तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्य ही आहे. अग्निपंख पुस्तकात फक्त स्वतःचेच चरित्र न मांडता अब्दुल कलाम यांनी अनेक कवितांच्या देखील समावेश केला आहे , हे पुस्तक तरुण तसेच प्रत्येक वयातील लोकांसाठी प्रेरणाचे अखंड स्त्रोत आहेत, म्हणून प्रत्येकाने एकदा तरी अग्निपंख पुस्तक वाचायला हवे या पुस्तकातील मला आवडलेल्या काही ओळी पुढील प्रमाणे आहे . “ जिंकण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे जिंकण्याची गरज भासू न देणे .आपण जेव्हा संभ्रमरहित असतो , ताणरहित मनाने प्रश्नांना सामोरे जातो , तेव्हा आपल्यामधील सर्वोत्तम देऊ शकतो ”