
झोंबी
परिस्थितीशी <span lang="MR" style="font-size:...
पुस्तक परीक्षक : डॉ.शैलेंद्र काळे, खडकी एज्युकेशन सोसायटीचे टीकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडकी, पुणे
झोंबी : दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात राहणाऱ्या एका ग्रामीण कुमारवयीन तरुणाची ही संघर्ष गाथा आहे. शेती आणि शेतमजूर यांची संघर्ष कहानी यामध्ये वाचावयास मिळते. माती खालच्या मातीची उब जिव्हाळ्याने जपणाऱ्या बालमानातून कुमार अवस्थेत येणाऱ्या एका तरुणाने शिक्षणासाठी दिलेली झोंबी म्हणजे संघर्ष या जीवन गाथेत वाचायला मिळते. झोंबी ही आत्मचरित्र ग्रामीण तरुणाची अवस्था आणि व्यवस्था सांगणारी, शिक्षणाची तळमळ व्यक्त करणारी एक जीवन गाथा आहे. १९६०च्या दशकात महाराष्ट्राची निर्मिती झाली. यंत्र तंत्र आणि विज्ञान युगात महाराष्ट्र आणि प्रगती साधली. सर्वसामान्य कष्टकरी आणि शेतकरी कुटुंबात शिक्षणाची गंगोत्री पोहोचली. परंतु संघर्ष करून आणि शेतीमातीशी नाते ठेवून जगणाऱ्या ग्रामीण कुटुंबातील ग्रामीण तरुणाची ही शिक्षणाविषयीची झोंबी वाचताना अस्वस्थ करते. वाचकाला संघर्ष हादरवून सोडते. आनंदा रत्नाप्पा जकाते शिक्षणाशी संघर्ष करत जगत असताना सुशिक्षित आनंद रतन यादव होतो. शिक्षणाने परिवर्तन घडते. परिस्थिती बदलता येते आणि स्वतःच्या अस्तित्व निर्माण करता येते हे आत्मचरित्राचे महत्त्वाचे सूत्र आहे.
कोल्हापुरातील कागल हा तालुका तसा ऊस बागायतदार शेतकरी वर्गाचा. ऊस भगत करण्यासाठी शेतकरी मजुरांची येथे खूप आवश्यकता असते. मुळात ज्या शेतकऱ्यांना स्वतःची शेत जमीन नाही परंतु शेतात काम करतात अशा शेतमजुरांच्या जीवनाची ही व्यथा या पुस्तकात वाचायला मिळते. स्वतःची 22 एकर शेत जमीन असणाऱ्या शेतमजुराने स्वतःची जमीन कर्जापाई घ
गहाण ठेवली. पुढे सावकाराने ती शेत जमीन बळकावली. लेखक आनंद यादव यांच्या वडिलांची ही शेत जमीन जेव्हा सावकार घेतो तेव्हा त्याच्यांच शेत जमिनीवर लेखकाला आणि त्याच्या कुटुंबांना शेतमजूर म्हणून काम करावे लागते. 22 एकराच्या या शेत जमिनीत काबाडकष्ट करणाऱ्या शेतमजुराला फक्त जगण्याची साधन म्हणून आयुष्यभर कष्ट करावे लागते. लेखकाच्या घरात असणारे आई वडील चार भावंडे तीन बहिणी या सर्वांची व्यथा या आत्मचरित्रात आली आहे.
परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लेखक आनंद यादव शिक्षणाची कास धरतात. शेती आणि शिक्षण दोन्ही सांभाळताना लेखकाच्या जीवाची व्यथा वाचताना वाचकाच्या डोळ्यात पाणी येते. दिवसरात्रभर शेतीत कष्ट करून फक्त जगायचे यासाठी आपण शिकले पाहिजे म्हणून लेखक अचानक एक दिवस घर सोडून कोल्हापूरहून मिळेल त्या बसने रत्नागिरी गाठतो रत्नागिरीत त्यांची ओळख पु ल देशपांडे यांच्याशी होते. पु ल देशपांडे या धडपडणाऱ्या मुलाकडे पाहून दहावीपर्यंत शिक्षणाची सोय करतात. घरात कोणालाही न सांगता पळून आलेला आनंद दहावीपर्यंत रत्नागिरीत शिक्षण पूर्ण करतो घरी येण्यासाठी आणि आई-वडिलांना भेटण्यासाठी भावंडांची काळजी करण्यासाठी त्याचा जीव कासावीस होतो. शेवटी माध्यमिक शिक्षण पूर्ण होते आणि आता पुढचे शिक्षण घ्यायचे आणि कुठेतरी चार पैशाची नोकरी मिळवायची हे स्वप्न आनंदा पाहतो. दहावीपर्यंतचा संघर्ष झोंबी या आत्मचरित्रातत वाचताना संघर्षातही मोठे होता येते फक्त आत्मविश्वास आणि मनामध्ये असलेली जिद्द महत्त्वाचे असते हा संदेश हे आत्मचरित्र देते. साधारणतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ग्रामीण मनात नुकतेच जन्माला आलेले शिक्षणाचे वेड आणि ओढ झोंबी मध्ये शब्द शब्दात दिसून येते. रत्नागिरी सारख्या ठिकाणी शिकत असताना पोटाचा प्रश्न आणि शिक्षणासाठी लागणारी पुस्तके यासाठी धडपड करून पैसे मिळवणे या झोंबीमध्ये आहे. अंगभूत असणाऱ्या नकला करण्याच्या कलेवर लेखक आनंद यादव गाव बाजारात खेड्यात नकल करून चार पैसे मिळवतो. शिक्षणासाठी आणि पुस्तके विकत घेण्यासाठी हे पैसे तो वापरतो. वेळप्रसंगी शिक्षणासाठी उपासमार सहन करावी लागते. अशा अवस्थेत लेखकाला खूप वेळा जीवनाचा आणि जगण्याचा टोकाचा राग येतो. स्वतःच्या जीवनाचे आत्मक्लेष करावे असा विचार येताना घरातील लहान भावंडे त्यांच्या नजरेसमोर उभे राहतात. थकलेले आई आणि वडील म्हणजे दादा त्याच्या नजरेसमोर सतत दिसतात. पोटा जगण्याचा संघर्ष जिद्दीने कष्टाने आणि परिश्रमाने आनंदात सुरू करतो. शिक्षणाची कोटी लावणारे पु ल देशपांडे त्यांचे गुरु होतात. खूप खूप मोठा हो या आशीर्वादाने लेखक आयुष्यात उच्च विद्याविभूषित होतो आणि मराठी विषयाचा प्राध्यापक होतो.