उद्धव शेळके यांच्या 'धग' या कादंबरीने मराठी ग्रामीण वास्तवाचे आणि अत्यंत अस्वस्थ करणारे असे
Read More
उद्धव शेळके यांच्या ‘धग’ या कादंबरीने मराठी ग्रामीण वास्तवाचे आणि अत्यंत अस्वस्थ करणारे असे विदर्भातील ग्रामीण जीवनाचे प्रभावी चित्रण केले आहे. या कादंबरीतून व्यापक समाजजीवन लेखकाने मांडले आहे. कौतिक आणि महादेव यांचे कष्ट, दुःख आणि वेदना याबरोबरच विदर्भातील व्यापक प्रदेशाचे, शिंप्याच्या जीवनातील काळानुसार झालेल्या बदलाचे, तेथील शेतीजीवनाचे चित्रण अत्यंत वास्तवपणे लेखकाने केले आहे. त्यामुळे मराठी कादंबरी विश्वातील ‘धग’ ही एक उत्कृष्ट कादंबरी ठरली आहे. आजवरच्या साठोत्तरी मराठी कादंबरीत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कादंबरीत ‘धग’ कादंबरीला महत्त्वाचे स्थान दिलेले दिसून येते. या कादंबरीची नायिका कौतिक ही एका सामान्य शिंपी कुटुंबातली स्त्री आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितिविरुद्ध तिने दिलेल्या लढ्याची ही गाथा आहे.
सार:-
‘धग’ ही कादंबरी म्हणजे विदर्भातील ग्रामीण जीवनाचे प्रभावी चित्रण करणारी कलात्मकतेचे नवे शिखर गाठणारी आणि मराठी कादंबरीतील मैलाचा दगड ठरणाीर एक उत्कृष्ट कादंबरी आहे. वऱ्हाडकडील एका खेड्यातील सामान्य आयुष्य जगणाऱ्या काबाडकष्ट करणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या एका कुटुंबाची विशेषतः कौतिकच्या जीवनाची परवड सांगणारी ही कादंबरी आहे. कौतिक आणि महादेव यांचे कष्ट, दुःख आणि वेदना याबरोबरच विदर्भातील व्यापक प्रदेशाचे, शिंप्याच्या जीवनातील काळानुसार झालेल्या बदलाचे, तेथील शेतीजीवनाचे चित्रण अत्यंत वास्तवपणे लेखकाने केले आहे. त्यामुळे मराठी कादंबरी विश्वातील ‘धग’ ही एक उत्कृष्ट कादंबरी ठरली आहे. उद्धव शेळके यांनी अगदी सहजतेने या कादंबरीची मांडणी केलेली आहे. या कादंबरीतून नवीन जीवनाचे व्यापक दर्शन घडते.
‘धग’ कादंबरीचे कथानक:
उद्धव शेळके यांच्या ‘धग’ या कादंबरीत सर्वसामान्य माणूस कैथानी आहे कौतिक आणि यांच्या कटबाची ही कथा असली तरीही कादंबरीचे कथानक वेगाने पुढे सरकत राहते आणि त्यामुळे मानवी जीवनाचे अनेक संदर्भ व व्यापक तपशील या कादंबरीत आलेले आहेत. एका शिंपी कुटुंबातील सामान्य स्त्रीने जगण्यासाठी केलेल्या धडपडीची ही कथा आहे. तिचे कौटुंबिक जीवन उनके दुःखाने व्यापले आहे की अखेरपर्यंत त्यातून तिची सुटका होत नाही. उलट आलेल्या संकटांना सामोरी जात-जात से आपल्या संसाराचा विचार करते. कौतिकच्या वाट्याला इतकी संकटे येतात की, कौतिक जिवंत राहते कशी? हा प्रश्न पडतो.
या कादंबरीतील कौतिक आणि महादेव हिंगणघाट त्याठिकाणी कौतिकच्या माहेरी रहात असतात. कौतिकचा भाऊ गोविंदा, व महादेव कपड्यांच्या शिलाईचे काम एकत्रित करीत असतात. कौतिकची आई गोदुबाई, भाऊ गोविंदा, भावजय गंगा, पती महादेव आणि तिची दोन्ही मुले भीमा, नामा एकत्र कुटुंबात गुण्यागोविंदाने रहात असतात. सर्वकाही सुरळीत चाललेले असतानाच अचानक महादेव काम करणे सोडून देतो. गोविंदाने खूप समजूत काढूनही महादेव कामाकडे लक्ष देत नाही. तेव्हा नाईलाजाने कौतिकची आई गोदुबाई महादेवला स्वतंत्र शिलाई मशीन उधारीने आणून देते. महादेवच्या नवीन व्यवसायाबरोबरच नव्याने संसारही सुरू होतो. महादेवने स्वतंत्रपणे सुरू केलेल्या नवीन व्यवसायातही प्रगती होत नाही. नव्याने सुरू केलेल्या कामात जम बसायला वेळ लागणारच. परंतु महादेवच्या चंचल स्वभावामुळे त्याला मन लावून काम करणे जमत नाही. मशीनचा महिन्याला जाणारा हप्ता आणि कुटुंबाचा खर्च भागविणे त्याला अशक्यप्राय होते. कुटुंबाच्या गरजा आपणास व्यवस्थित भागविता येत नाहीत म्हटल्यानंतर तो निराश होतो. तो बायकोस दीनवाण्या गोष्टी बोलतो. ‘माई सोडून दे…. मी कुठीसाई निघून जाईन.’ असे निर्वाणीचे बोलतो. परंतु कैतिक त्याला एकट्याला सोडत नाही. महादेवच्या म्हणण्यान घरातील कुणालाही न सांगता दोघेजण हिंगणघाट सोडण्याचा निर्णय घेतात. पहाटेच्या वेळी घरातून बाहेर पडून हिंगणघाटाहून रेल्वेने तळेगावला येतात.
तळेगावात महादेवच्या वडिलांचे रघुनाथ शिप्याचे स्वतःचे छोटे घर आहे. रघुनाथ शिंपी तयार कपडे गावोगावच्या बाजारात फिरून विकण्याचा धंदा करीत असे. वडिलांचे व महादेवचे पटत नसल्यानेच महादेवने गाव सोडले होते आणि तरीही महादेव पुन्हा गावाकडे परत आला होता. तळेगांवला परत येताना आपण तिथे कोणता धंदा करायचा याचा विचारही महादेवने केलेला नव्हता. परंतु कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा विचार कौतिकच्या डोक्यात मात्र सारखाच घोळत असतो. आपला बोचक्या बोचक्यात बांधलेला दारिद्र्याचा संसार घेऊन तळेगावला आल्यानंतर कौतिक महादेवच्या पाठीमागे लागून शेतमजुरीची कामे मिळविते. महादेवला शेतमजुरीची कामे करणे जड जाते. तो आळशी असतो. काहीवेळेस शेतमजुरीची कामे मिळत असतानाही कामच मिळत नाही असेही कौतिकला सांगतो. कौतिकला महादेवचा स्वभाव माहीत असल्यामुळे ती स्वतःच पुढे होऊन जिद्दीने शेतातील कष्टाची कामे करते. गावाकडे आल्यापासून कष्ट करून कुटुंबाचा नव्याने चांगलाच जम बसविते. दोघांच्या कष्टावर घर संसार चांगला चालल्यावर दोन्ही मुलांनाही ती शाळेत घालते. यशोदा या लहान मुलीला बरोबर घेऊन शेतात कष्ट करीत राहते. तयार कपड्यांचा धंदा करण्याच्या’ महादेवच्या इच्छेखातर कौतिक त्याला घरातील ज्वारी विकून व मुलाचे चांदीचे दागिने घेऊन वीस रुपयांचे भांडवल धंद्यासाठी उभे करून देते. अमरावतीहून तयार कपडे आणून तिवसा, शेंदुर्जना, मोझरी, शेंदाळा अशा गावी बाजारच्या दिवशी जाऊन महादेव धंदा करू लागला. त्यातून त्याला चांगला पैसा मिळू लागला आणि कौतिकही न थकता रोजगार करू लागली.
कौतिक व महादेव यांधी सर्व शक्ती कुटुंबाच्या प्राथमिक गरजा भागविण्यातच खचर्ची पडते. त्यामुळे मुलांच्याकडेही त्यांचे दुर्लक्ष होते. कौतिकचा मोठा मुलगा भीमा या दोघांच्या दुर्लक्षामुळे वाया जातो. शाळेत जाण्याऐवजी हॉटेलमध्ये पडेल ते काम करायचे. सर्कसचा तंबू बांदण्याचे काम करायचे, चोरी करायची यातच तो रमतो. कौतिकच्या मनाला ही एक टोचणी लागून राहते. त्याच्या स्वभावात बदल व्हावा म्हणून प्रयत्न करते. परंतु भीमा ऐकत नाही. महादेवलाही कपडे विकण्याचा धंदा हळूहळू नकोसा वाटू लागतो. मोझरीच्या नत्थूशेठने जुनी मशीन वापरायला देतो म्हटल्यावर महादेव त्याच्यावरच विश्वास ठेवून मोझरीला जाऊन राहण्यासाठी कौतिकच्या पाठीमागे तगादा लावतो. कौतिक सहजासहजी गाव सोडण्यास तयार नसते. परंतु महादेवच्या परत परत तीच गोष्ट विचारण्याने मोझरीला जाण्यास तयार होते आपली तिथे व्यवस्था होईल का ? मशीन चांगल्या स्थितीत आहे का ? परक्या गावात जाऊन आपल्य • राहण्याची व्यवस्था होणार का ? याचा विचार न करताच महादेव मोझरीला जाण्याचा निर्णय घेतो. आपल व्यवस्था मोझरीला कशी होणार याची चिंता कौतिकला वाटत होती. ती नाईलाजास्तव मनात नसतानाही सर्व साहित्य, मुले घेऊन सुकदेवच्या गाडीतून मोझरीला जाते. मोझरीला आल्यानंतर नत्यूशेठकडून त्यांची व्यवस्था होत नाही. नत्थूशेठकडील मशीन ही वैरणीच्या चगाळचात धूळ खात पडलेली असते. तिचे चाकही हालत नाही. मशीनचा काहीच उपयोग होणार नाही हे कौतिकच्या लक्षात येते. परंतु एकदा गाव सोडून आल्यानंतर पुन्हा लगेचच परत जाणे कौतिकला अपमानास्पद वाटते म्हणून कौतिक स्वतः पुढे होऊन कासमच्या घरी रहायला जागा मिळविते आणि मोझरीलाच शेतीच्या रोजंदारीच्या कामावर जायला लागते. तिथेही त्यांच्या कुटुंबाची वाताहतच होऊ लागते.
कौतिक कोणत्याही गावी रहायला गेली तरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी धडपडते. दिवसरात्र कष्ट करते. महादेवचे मोझरीला आल्यावरही धंद्यात मन लागत नाही. कौतिक त्याला बळेच कपडे विकण्यासाठी पाठवित होती. स्वतः सकीनाबरोबर शेतीच्या कामावर जात होती. एकदा आठवडी बाजाराला गेलेला महादेव घरी परतत नाही. कौतिक त्याची काळजी करीत राहते. तो अमरावतीला आहे, असे समजल्यावर नामाला घेऊन तिथे जाते आणि महादेवची समजूत घालून त्याला घरी आणते. महादेवचे मन प्रपंचापासून दूर जाऊ लागते. त्याला प्रपंचात रसच वाटत नाही. कुटुंबाचा विचार करणेच तो सोडून देतो. कौतिकने कितीही सांगितले तरी स्वतःच्या मनास योग्य वाटेल तेच तो करीत असतो. स्वतःचा वडील वारल्यानंतरही महादेव तळेगावला जात नाही. कौतिकच नामाला घेऊन तळेगावला जाते आणि सर्व विधी पूर्ण करून येते. सासऱ्याचे शेवटचे विधी पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या पैशाची व्यवस्थाही कौतिकलाच करावी लागते. गावाकडचे घरही सासऱ्याने बाखड्याकडे केवळ गहाण ठेवलेले असताना बाखड्याने तर ते आपल्या नावेच करून घेतले. या एकापाठोपाठ उभा राहणाऱ्या संकटांना तोंड देत कौतिक जगत असते. कौतिक तळेगावहून मोझरीला येते तर महादेव कासमबरोबर यात्रेला निघून गेलेला असतो. कासमबरोबर महादेव यात्रेला गेलेला असल्यामुळे ती फारशी काळजी करीत नाही. परंतु कासम एकटाच परत आलेला पाहून कौतिक अस्वस्थ होते. महादेवला यात्रेला जातानाच कुष्ठरोग झाल्याने तो मिशनऱ्यांच्या बरोबर दवाखान्यात जातो आणि तिकडेच राहतो. कासमच्या तोंडून महादेव परत येणार नाही हे ऐकून कौतिकची होती नव्हती तेवढी शक्ती निघून जाते. ती सैरभैर होते. फाटक्या संसारातही नवऱ्याच्या जीवावर ती संसाराचा गादा ओढत होती. परंतु पती निघून गेल्यानंतर भीमा गेल्यानंतर जेवढे दुःख झाले नव्हते तेवढे पराभवाचे दुःख तिला झाले. त्यातूनही मुलांसाठी काष्ट उपसतच असते. परंतु आपला पती आता परत येत नाही या विचाराने ती भ्रमिष्ट होते. अचानक महादेवच्या निघून जाण्याने तिला वेड लागते. नामा कपडे शिवायला शिकण्याचे काम सोडून हॉटेलमध्ये कपबशा धुण्याचे काम करतो आणि आईला व यशोदीला सांभाळत राहतो. याठिकाणी कौतिकच्या जीवनाची शोकान्तिका टोकाला जाऊन पोहोचलेली असतानाच नामाच्या जीवनाची शोकान्तिका सुरू होते. वाचक कादंबरीतील या शोकान्तिकेनेच अस्वस्थ होतो.
समारोप:
‘धग’ ही कादंबरी म्हणजे ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारी उत्कृष्ट कादंबरी आहे. विदर्भातील ग्रामीण माणूस या कादंबरीतून व्यक्त झालेला आहे. कौतिक आणि महादेव यांच्या कुटुंबाची ही कथा असली तरीही मानवी जीवनाचे अनेक संदर्भ आणि तपशील सहजपणे या कादंबरीतून व्यक्त झालेले आहेत. कौतिक महादेव आणि त्याच्या सभोवतालचा एक समाज आहे. दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, हतबलता, अगतिकता, रूढी आणि परंपरा जपणारे मन जीवन जगण्याची आसक्ती, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मार्ग शोधण्याची जिद्द, अन्यायाला प्रतिकार करण्याची प्रवृत्ती इ. सर्व गोष्टींचे चित्रण कादंबरीतून आले आहे. या कादंबरीतील अहोरात्र काबाडकष्ट करणाऱ्या आणि इर्षेने जीवन जगणाऱ्या कौतिकच्या जीवनाची शेवटी झालेली शोकान्तिका ही वाचकाला अस्वस्थ करून सोडते. समाजवास्तवाचे व्यापक आकलन त्यातून व्यक्त होते. त्यामुळे ही काबंदरी वाचकाला अधिक जवळची वाटते. मराठी ग्रामीण कादंबरी विश्वातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी ठरली आहे.
Show Less