नटसम्राट

By कुसुमाग्रज

Price:  
₹150
Share

Availability

available

Original Title

नटसम्राट

Series

Publish Date

2013-01-01

Published Year

2013

Publisher, Place

Total Pages

124

ISBN 13

978-8171857234

Format

Paperback

Language

Marathi

Readers Feedback

नटसम्राट

पुस्तकाचे नाव : नटसम्राट लेखक : वि.वा.शिरवाडकर Book Reviewed by: पाटोळे जगदीश नरहरी वर्ग : S.Y.B.C.S. College : GMD Arts, BW Commerce & Science College,...Read More

Dr.Subhash Ahire

Dr.Subhash Ahire

February 15, 2025
×
नटसम्राट
Share

पुस्तकाचे नाव : नटसम्राट
लेखक : वि.वा.शिरवाडकर
Book Reviewed by: पाटोळे जगदीश नरहरी
वर्ग : S.Y.B.C.S.
College : GMD Arts, BW Commerce & Science College, Sinnar Dist. Nashik

काल संध्याकाळी नटसम्राट हा एक अत्यंत उत्तम चित्रपट मी पाहिला! मला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करणारा माझा मित्र शामसुंदर याचे खास आभार! शामला मराठी संस्कृतीची उत्तम जाण आहे आणि मराठी संस्कृतीच्या जोपासण्यासाठी तो आपल्या परीने शक्य तितके प्रयत्न करत असतो. ह्या चित्रपटाचे विश्लेषण करण्यामागे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे गणपत आप्पा बेलवलकर यांच्या व्यक्तिरेखेचे आणि या चित्रपटातील मांडल्या गेलेल्या कथेचे विश्लेषण आणि दुसरा मार्ग म्हणजे या नाटकातील / चित्रपटातील कथेतून आपणास कोणता सामाजिक बोध घेता येईल याविषयीचे विश्लेषण! मी इथे दुसरा मार्ग स्वीकारतो आहे. पुढे कधी या नाटकाच्या मूळ संहितेचे सखोल वाचन केले तर पहिला मार्ग स्वीकारण्याचा मी प्रयत्न करीन.
आप्पा बेलवलकर नाटक या व्यवसायातून व्यवस्थित अर्थाजन करून व्यवसायिक जीवनाच्या एका टप्प्यावर निवृत्ती चा निर्णय घेतात. हा निर्णय घेताना आपण अंतर्मनाने समोर प्रेक्षकांना पाहू शकणाऱ्या दिग्गजांचे समाधान आता करू शकत नाही किंवा त्यांना अभिनयाच्या नवीन खोलीपर्यंत पोहोचवू शकत नाही म्हणून हा निर्णय अशी भावना असते.
आपलं राहतं घर मुलाच्या नावे आणि आर्थिक गुंतवणूक मुलीच्या नावे करून त्या आर्थिक जबाबदारीतून मोकळे होण्याचा प्रयत्न करत असतात. सुरुवातीच्या सुरळीत चाललेल्या संसारात हळूहळू छोट्या मोठ्या कुरकुरीवरून सुरुवात होते. आपल्या नातीला मायेचा लळा लावणाऱ्या आप्पांची आपल्याला मूळ स्वभावाला, सवयींना बदलत्या काळानुसार नवीन वळण लावण्याची तयारी नसते. तोंडी येणारे अपशब्द, दारूचे व्यसन, नातीला स्नेहसंमेलनात लावणी करायला सांगणे, या प्रकारांनी मुलगा आणि सून आप्पांवर नाराज होत असतात. हि काही वेळ आप्पांच्या घरातील कहाणी नाही. ही आपल्या समाजाची प्रतिनिधी कहाणी म्हणता येईल. दोन पिढ्या एका घरात नांदत असतात. एका पिढीची व्यावसायिक जीवन संपून गेलेलं असतं आणि ते आता निवृत्तीचे जीवन जगत असतात. त्यामुळे जीवनात काहीसा मोकळेपणा आलेला असतो. प्रत्येक गोष्ट अगदी गांभीर्याने घ्यायला नको असा काहीसा दृष्टिकोन विकसित झालेला असतो. या उलट दुसरी पिढी व्यावसायिक जीवनात सक्रिय असते तिथे अनुभवायला लागणार आहे हो, नोनसेंस दृष्टिकोन घरी सुद्धा बऱ्याचदा प्रमाणात आणण्याची त्यांची मनोवृत्ती असते. खास करून घरातील सून आपल्या नवीन पिढीला बाह्य जगासाठी सक्षम बनवण्यासाठी झटत असते आणि त्यामुळे जुन्या पिढीने दिलेली काहीशी वेगळ्या पिढीतील शिकवणूक तिला खटकत असते. मुद्दा सामंजस्याचा आहे. आजोबा-आजी घरात नातवंडाना भावनिक सुरक्षिततेची जाणीव करून देत असतात. जुन्या काळातील मूल्यांची कळत नकळत शिकवण देत असतात पण त्यातील काही गोष्टी नवीन काळाला अनुसरून नसतात.
एक निरीक्षणास आलं म्हणून मांडतो! बरीच माणसं आपल्या माणसांवर प्रेम किंवा द्वेष अगदी टोकाचे करतात. पण काळ बदलत चालला आहे. आपापल्या भावनिक संतुलन गाठीत या दोन भावनांमधील सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. या चित्रपटामध्ये घरातील माणसांचे संवाद, वादविवाद राहणीमान, याविषयी गोष्टींची मांडण्याचा एक प्रयत्न केला आहे.

नटसम्राट

नटसम्राट' या नाटकाने प्रत्येक मराठी नाट्यरसिकाच्या मनात घर केले आहे. शेक्सपिअरच्या 'किंग लियर'ने शिरवाडकरांच्या लेखनाला चलना दिली असली तरी त्यानंतर त्यांच्या प्रतिभेने झेप घेऊन ह्या...Read More

रोहन उत्तम ठोके

रोहन उत्तम ठोके

January 30, 2025
×
नटसम्राट
Share

नटसम्राट’ या नाटकाने प्रत्येक मराठी नाट्यरसिकाच्या मनात घर केले आहे. शेक्सपिअरच्या ‘किंग लियर’ने शिरवाडकरांच्या लेखनाला चलना दिली असली तरी त्यानंतर त्यांच्या प्रतिभेने झेप घेऊन ह्या नाटकाला अत्यंत जीवघेणी आर्तता मिळवून दिली आहे. यातील गणपतराव बेलवलकर ह्या वृद्ध नटाचे आणि त्यांचे ‘सरकार’ कावेरी यांचे व्यक्तिचित्रण अनेक कलावंतांना मोह पाडणारे आहे आणि गेली चाळीसहून अधिक वर्षे अनेक जड ते जिद्दीने रंगभूमीवर आणत आहेत. ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळालेले हे केकामेव नाटक. ‘मराठीतील सर्वात वाचले, अभ्यासले गेलेले नाटक’ असे याचे वर्णन केल्यास ते अतिशयोक्त ठरू नये. ‘नटसम्राट’ची मोहिनी फक्त मराठी वाचकांनाच वाटलेली नाही त्यामुळेच ह्या नाटकाचे अनेक भाषांतून अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.
नटसम्राट या पुस्तकात नाटक सदर करण्यात आलेले आहे.यामध्ये आप्पासाहेब बेलवणकर आणि कावेरी यांना एक मुलगी व एक मुलगा असून सुद्धा म्हातारपणात त्यांच्या जीवनाची झालेली वाताहत याचे वर्णन यातून बघायला मिळते .हि दोन्ही पात्रे वृद्ध झाल्यावर आपल्या मुलाकडे राहतात.मुलीच्या सांगण्या वरून मुलीकडे राहायला जातात.तिथेही तशीच वागणूक मिळते त्यामुळे ते दोघेही घर सोडून जातात.या दरम्यान आजारी पडल्यामुळे पत्नी कावेरीचा मृत्यू होतो .शेवटी आप्पासाहेब एका बूट पॉलिश करणाऱ्या मुलाकडे राहतात .त्यांचा मुलगा ,मुलगी,सून त्यांना घ्यायला येतात.पुस्तकातील प्रसिद्ध उच्चार /संवाद पुढीलप्रमाणे
” To be or not to be
That is the question ”
रोहन उत्तम ठोके (MVP Samaj’s Vitthalrao Ganpatrao Hande College of Education Nashik)

एक अजरामर शोक नाट्य

नट सम्राट मधील प्रमुख पात्र अप्पासाहेब बेलवलकर, कावेरी, नंदा, शारदा, सुहास, नलू, सुधाकर, विठोबा आणि राजा इत्यादी नाटकाचा थोडक्यात सारांश असा कि या नाटकातील अप्पासाहेब...Read More

धनगर जयश्री दिगंबर

धनगर जयश्री दिगंबर

January 29, 2025
×
एक अजरामर शोक नाट्य
Share

नट सम्राट मधील प्रमुख पात्र अप्पासाहेब बेलवलकर, कावेरी, नंदा, शारदा, सुहास, नलू, सुधाकर, विठोबा आणि राजा इत्यादी
नाटकाचा थोडक्यात सारांश असा कि या नाटकातील अप्पासाहेब बेलवनकर हे आणि त्यांची पत्नी कावेरी स्वताची मुल मुली असून सुद्धा म्हातारपणात त्यांच्या जीवनाची झालेली वाताहत कशी झाली याचे दर्शन घडवते. त्याचे वर्णन या नाटकातून बघायला मिळते. हि दोन्ही वृद्ध पात्रे आपल्या मुला कडे राहतात. तेवढ्यात मुलगी म्हणते बाबा तुम्ही आमच्या कडे कधी येणार ? मुलाच्या वागणुकीला कंटाळून ते मुलीकडे जातात. पण मुलीकडे हि तशीच वागणूक मिळते. घर सोडव म्हणून चोरीचा आरोप लावला जातो आणि ते घर सोडून निघून जातात. दरम्यान त्यांची पत्नी कावेरीचा आजारपणामुळे मृत्यू होतो. हे सर्व त्यांना वृध्दपणी सहन होत नाही.
शेवटी अप्पासाहेब एक बूट पॉलिश करणाऱ्या मुलाकडे राहतात. त्यांचा मुलगा व सून हि त्यांना घ्यायला येतात परंतु अप्पासाहेब बूट पॉलिश करणाऱ्या मुलाच्या मांडीवर पार प्राण सोडतात.
धनगर जयश्री दिगंबर (M.V.P. Samaj Adv. Vitthalrao Ganpatrao Hande College of Education, Nashik)

नटसम्राट

"नटसम्राट हे वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) लिखित मराठी नाटक आहे. हे नाटक महान नट सम्राटांच्या जीवनावर आधारित आहे. नाटकाच्या मुख्य पात्रांमध्ये नटसम्राट, राजा आणि राणी यांचा...Read More

SHITAL CHHAGAN DHIVARE

SHITAL CHHAGAN DHIVARE

January 22, 2025
×
नटसम्राट
Share

“नटसम्राट हे वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) लिखित मराठी नाटक आहे. हे नाटक महान नट सम्राटांच्या जीवनावर आधारित आहे. नाटकाच्या मुख्य पात्रांमध्ये नटसम्राट, राजा आणि राणी यांचा समावेश आहे.
*नाटकाचा तपशीलवार परीक्षण*
*नाटकाची संरचना*: नाटकाची संरचना सुसंगत आणि सुसूत्र आहे. नाटकाच्या प्रत्येक अंकात एक विशिष्ट कथा आहे जी प्रेक्षकांना आकर्षित करते.
*पात्रांचा विकास*: नाटकातील पात्रे जटिल आणि वास्तविक आहेत. नटसम्राटाच्या पात्राचा विकास नाटकाच्या प्रत्येक अंकात दिसून येतो.
*संवाद*: नाटकाचे संवाद अर्थपूर्ण आणि भावनात्मक आहेत. संवादांमध्ये नटसम्राटाच्या जीवनाची विविधता आणि जटिलता दिसून येते.
*नाट्यरचना*: नाटकाची नाट्यरचना उत्तम आहे. नाटकाच्या प्रत्येक अंकात एक विशिष्ट नाट्यरचना आहे जी प्रेक्षकांना आकर्षित करते.
नटसम्राट ही वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) लिखित मराठी नाटक आहे. हे नाटक 1970 साली प्रकाशित झाले आणि तेव्हापासून ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील एक महत्त्वपूर्ण नाटक मानले जाते.
नटसम्राटाची कथा एका वृद्ध नटाच्या जीवनावर आधारित आहे. हा नट गणपतराव बेलवलकर हा आपल्या काळातील एक महान अभिनेता होता. तो आता वृद्ध झाला आहे आणि त्याच्या आयुष्यातील सर्व मानसन्मान गुमावले आहेत.
नटसम्राटाची परीक्षण करताना, या नाटकाच्या काही महत्त्वपूर्ण पैलूंचा विचार केला पाहिजे:
1. *नटाचे जीवन*: नटसम्राटाची कथा एका वृद्ध नटाच्या जीवनावर आधारित आहे. हा नट गणपतराव बेलवलकर हा आपल्या काळातील एक महान अभिनेता होता, पण आता तो वृद्ध झाला आहे आणि त्याच्या आयुष्यातील सर्व मानसन्मान गुमावले आहेत.
2. *नाट्य आणि जीवन*: नटसम्राटात नाट्य आणि जीवन यांच्यातील संबंधाचा शोध घेतला आहे. नटाच्या जीवनातील घटना आणि त्याच्या नाट्यातील भूमिका यांच्यातील साम्य आणि भेद यांचा विचार केला आहे.
3. *वृद्धत्व आणि एकाकीपन*: नटसम्राटात वृद्धत्व आणि एकाकीपन या विषयांचा शोध घेतला आहे. नटाच्या वृद्धत्वाची आणि एकाकीपनाची व्यथा यांचा विचार केला आहे.
4. *कला आणि जीवन*: नटसम्राटात कला आणि जीवन यांच्यातील संबंधाचा शोध घेतला आहे. नटाच्या जीवनातील कला आणि त्याच्या नाट्यातील भूमिका यांच्यातील साम्य आहे.

Submit Your Review