
पराक्रमापलीकडले शिवराय
By लवटे प्रशांत बबनराव
या पुस्तकातुन अर्थातच शिवरायांची विचारधारा, त्यांचे...
Jadhav Ankita Nathrao :B.Sc(CS) College Of Computer Sciences , Wakad Pune.
” पराक्रमापलीकडले शिवराय ” या पुस्तकाचे लेखन प्रशांत बबनराव लवटे यांनी केले आहे. हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आणि त्यांच्या विचारधारावर लिखित आधारित आहे. आजवर शिवरायांवर जेवढी पुस्तकं बाजारात आली, ती शिवरायांच्या आयुष्यावर किंवा त्यांच्या पराक्रमावर व चारित्र्यावर आधारित आहेत. शिवरायांचा पराक्रम शिवरायांचे बालपण त्यांनी पार पाडलेल्या मोहिमेच्या आधारावर अनेक पुस्तकं आज बाजारात आहेत. काही लेखकांनी असंख्य ग्रंथ लिहिले गेले, ज्यामध्ये शिवरायांचे संपूर्ण जीवन कथेच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे .या सर्व माध्यमांतून आपणा सर्वांना शिवरायांचा पराक्रम कळाला व काही त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग जसे की आग्य्राहून सुटका, शिवरायांचा जन्म ,अफझलखानाचा वध, बाहशाहाच्या हातावर तूरी दिल्या , ज्यावर प्रत्येकाने त्यांचे मत मांडले आहेत.
महाराजांचे जीवन म्हणजे एक पूर्व नियोजित कथाच वाटते शिवराय हे व्यक्तिमत्व एका जन्मात समजुन घेणे अवघड आहे. पण कधी विचार केला की , का समजणार नाहीत शिवराय एका सर्वसामान्य माणसाला ? शिवरायांच्या इतिहासाकडे थोडसं वेगळ्या विचारांनी पाहिले तर ‘शिवराय’ हे व्यक्तिमत्व नक्कीच समजू शकेल.
“शिवराय म्हणजे एक गूढ”! शिवराय एका जन्मी समजूच शकतं नाहीत ! अशी काही वाक्ये बोलून शिवराय म्हणजे एक वेगळेच मिश्रण जेणेकरून सामान्य माणसाला ती व्यक्ती म्हणजे एखाद्या देवाचा अवतारच वाटली पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीचे आपोआप ‘कर्तृत्वा’ चे रूपांतर ‘दैवीशक्ती”मध्ये होऊन जाते. शिवराय हे एका सामान्य माणसांपेक्षा खूप वेगळे आहेत . शिवरायांची विचारधारा ही खूपच वेगळी होती. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये पराक्रम आणि विचारधारा या दोन्ही गोष्टींनी भरून पावलेली व्यक्ती म्हणजे ‘शिवराय’ होय. या पुस्तकात बारा भाग आहेत, यामध्ये अगदी विस्तृत पद्धतीने शिवरायांच्या पराक्रमाचे वर्णन केलेले आहे
शिवरायांच्या चरित्राकडे पाहण्याचे दोन बाजू आहेत अलीकडच्या बाजूने पाहिले तर मग आपल्याला जन कल्याणाचे व्रत बाळगणारे , रयतेचे राजे दिसतील. शिवरायांचे चरित्र पलीकडच्या बाजूने पहायला गेले तर ते एक “पराक्रमापलीकडील शिवराय” आहेत .हे या पुस्तकाद्वारे सांगण्यात आले आहे. प्रशांतरावांनी एकूण चार आवृत्ती प्रकाशित केलेल्या आहेत. त्यातील ही दुसरी आवृत्ती म्हणजेच”पराक्रमापलीकडले शिवराय “.
धन्यवाद!!!
जय जिजाऊ! जय शिवराय !