
इ.स.1971 साली मौज प्रकाषनाने प्रकाषित केलेली आनंद यादवांची पहिली कांदबरी ‘गोतावळा’.आनंद यादवाने ही कांदबरी 21 प्रकरणात आणि 143 पानंात लिहिली आहे. या कादंबरीतील कथा नारबाच्या तोंडून सांगितली आहे. यादवानी नटरंग (1980), एकलकोंडा (1980), झोंबी (1990), घरभिंती (1992), नांगरणी अषा मोजक्या पण दर्जेदार कांदब-या आनंद यादवानंी लिहिल्या. प्रत्येकाचा आषय विष्व हा वेगवेगळा आहे. मात्र आनंद यादवांच्या गोतावळा कांदबरीने मराठी कादंबरी विष्वाला नवे परिमाण दिले. निसर्ग आणि माणूस यांच्या भावसंबंध आपल्या प्रतिभेचा विषय बनवून जो आविष्कार केलेला आहे तो मराठी कांदबरी विष्वात एक मैलाचं दगड बनलेली आहे. कादंबरी विष्वात अतिषय मौलिक, अव्दितीय अषी ही कांदबरी आहे. नारबा हा गोतावळयाचा नायक आहे. त्याचप्रमाणे रामू सोनवडे, त्याची बायको, मालकीण, गंग्या, सित्या, विकास, हिंदुराव, सावित्री आणि ड्रायव्हर व पाव्हणा या गौण व्यक्तिरेखा आहेत. सोन्या, चाण्या, ओपाला आलेली पाडी, नाग्या – वाघ्या बैल, राम्या – भिम्या रेडे, म्हालिंगा बैल, चंपी कुत्री, म्हारुत्या घोडा, कोंबडा, कोंबडीची पिल्लं, राजा कुत्रा, कासव, षेळीची बकरं आणि इतर पषुपक्षी, झाडझुडपं ही नारबाच्या गोतावळयातील आहेत. नारबाच्या भावविष्वात या सर्वांना महत्वाचे स्थान आहे. रामू सोनवडे, ड्रायव्हर पाव्हणा हे खलनायकासारखे वागतात. त्यांच्यामुळे नारबाचे भावविष्व उध्वस्त होते. या कादंबरी विषयी अनेकांनी आपली मते नांेदवली आहेत. त्यात श्री.कृ.बोरकर- ‘चिरंतर दुःखाचा धगधगता प्रत्यय – गोतावळा’. नामदेव ढसाळ- ‘गोतावळा: एक श्रेष्ठ व सकस कादंबरी’ आवटी – ‘गोतावळा: बदलत्या ग्रामीण जीवनाचे चटका लावणारे चित्र’ वा.ल.कुलकर्णी- ‘मराठी कादंबरीला नवे परिणाम देणारी कादंबरी’ डाॅ. अ. वा. कुलकर्णी- ‘सर्वार्थाने पहिली मराठी कादंबरी’ डाॅ. भालचंद्र फडके यांच्यामते – ‘‘ गोतावळामध्ये आनंद यादवांनी नारबाचे भावविष्व रंगवून तिला षोकात्मिकेची उंची प्राप्त करुन दिली आहे. नारबाचे एकाकीपण आपल्या अनुभवाचा विषय बनते. आपल्या ष्षुद्र स्वार्थासाठी मालक नारबाला एकाकीपणाच्या आगीत झोकून देतो. त्याच्या जीवनात निर्माण झालेल्या भयानक पोकळीचे घडणारे दर्षन आपल्याला भारावून टाकते. अस्वस्थ करते. निसर्ग आणि माणूस यांच्यातील भावसंबंध चित्रविषय बनविण्यात आनंद यादवाच्या प्रतिभेचे एक अपूर्व देखणेपण प्रत्ययास येते. आणि दुसरे असे की, ही कादंबरी वाचतांना तिच्या भाषेची वेगळी असी जाणीव होत नाही. या भाषेने ज्यांना बोली नाही त्या प्राणिसृष्टीलापण बोलके केले आहे. गोतावळया सारख्या कादंबरीमुळे मराठी कादंबरीचे क्षितिज विस्तारले आहे एवढे मात्र निष्चित.’’
आनंद यादवांनी गोतावळा या कांदबरीच्या आषय अभिव्यक्तीसाठी माध्यम म्हणून कोल्हापूर भागातील ग्रामीण बोली भाषेचा वापर केलेला आहे. ‘नारबा’ या पात्राच्या माध्यमातून षेतमजुरी करणा-या मजुराची षोकांतिका व्यक्त करणारे कथानक रचले आहे. नारबाची षोकांतिका तीव्र करण्यासाठी आणि वास्तविकता निर्माण करण्यासाठी पात्रांच्या तोंडी वापरलेली निवेदनाची जी भाषा लेखक आनंद यादवांनी वापरली आहे ती अस्सल स्वरुपाची आहे. कांदबरी वाचतांना आपल्या डोळयासमोर घडत असल्याचा भास होतो. षब्दांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील चित्रण जिवंत स्वरुपात उभे करण्यात आनंद यादव यषस्वी झालेले आहेत. जनावरे आणि पषूपक्षानांही लेखक आनंद यादवाने जिवंत साकार केले आहे. अरविंद वामनकुलकर्णीच्या मते – नारबाचा हा सारा गोतावळा तसा मुका आहे. म्हणजे ष्षब्दांच्या आधारावर तो स्वतःला व्यक्त करु ष्षकत नाही. यादवांनी लेखकाला मिळू ष्षकणारे स्वातंत्र सोडून या गुराढोरांच्या मुकेपणा जसाच्या तसा साकारलेला आहे. पण मोठया कौषल्याने त्यांनी प्रत्येक ढोराला स्वंतत्र व्यक्तिमत्व दिलेलं आहे. गाय, बैल, रेडे, कासव, म्हैस यांना गोतावळयात स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आनंद यादवांनी गिधाडाचे केलेले वर्णन भाषेचा संुदर नमुना आहे. ‘‘ गुडघ्यापतोर पांढ-या पिसाची चड्डी, अंगावर पावसाळी दांगडगा कोट’’ यातून गिधाडाचे व्यक्तिमत्व उभे राहते. ‘‘ राघवाच्या पिलाला नुकतीच हिरवी पंख फुटावित तसं दिसत हुतं ’’ या वर्णनाने माळही जिवंत केला आहे.
कोल्हापुरातील कागल परिसरातील भौगोलिक प्रदेष या कांदबरीला पाष्र्वभुमी म्हणून आनंद यादवांनी घेतले आहे. त्यामुळे या कांदबरीत विविध पिके, झाडे व पषुपक्षी यांचे वर्णन फारच सुंदर उतरले आहे. खळयाच्या उसाचं वाढलेलं वाडं, नदिची गवत, कडबा, ष्षंेगांच साल, तुरीच कोंड, तुरकाडया पडल्या हुत्या. हे पिकाचं वर्णन तसेच लिळिंबीचे झुडूप घाणीरडं, करंजीची हिरवी झाडं,उंबर, चिंच, पिंपळ, वड, इत्यादी वृक्ष आणि घुबडं, कोल्ही, वांदरे, मुगंुस, चित्तुर, मोर, टिटवी, इ. पषुपक्ष्यांचा उल्लेख यातून हा प्रदेष जिवंत स्वरुपात आपल्यापुढे उभा राहतो. भात काढून थोडं आडसाली माळत केल हुतं. ऐनं वक्ताला माळवं. तालुक्याच्या बाजाराला न्हेऊन पैसं करायच्या मालकाला नाद लागलेला. माळयाच्या आवडात काटं – वाळकं, भेंडया, दोडकं नि वांगी भराला आली हुती. ( पृष्ठ 118 ) हे माळवं खाण्यासाठी डोंगरावरुन उतरणारी वादंरं नारबाला दिसतात. माळरानं, डोंगर, मळा आणि तळं, नदी, विषिष्ट पिके यांच्या वर्णनातून कोल्हापूरचा ग्रामीण परिसर जिवंत होतो. या प्रदेषातील निसर्ग एक पात्र म्हणूनच आलेला दिसतो. कृषी जीवनात ऋतुचक्राला विषेष महत्व असते. त्या रंग बदलणा-या ऋतुचे वर्णन स्वाभाविकपणे आले आहे. नारबाच्या मानसिकतेनुरुप आलेले हे वर्णन अधिकच खुमासदार झालेले आहे. ‘‘….. आभाळात वांझढग आलेलं, अजुनही वावटळू न्हाई का वादळ न्हाई….. कुठं गेला असल हयो पाऊस ? आता लागायचा कवा नि पेरण्या हुयाच्या कवा ? वैरणीचा तुटवडा पडत चाललाय …… पिकाला पाणी तर आजिबात न्हाई. चाळीस चिरपाणी प्यायचं तिथे आता आढ धिरसुदीळ पीना झाल्याम. पाटातनं पाणी उसाला येईस्तवर हिरीतलं पाणी संपतय….. आतापतोर जीव जतन केल्यागत ऊस. त्योबी वाळून चाललाय …. पड बाबा एकदा पुढ कव्हातरी वड खा वाटलचं तर खर दुष्काळ नग पाऊ …..( पृष्ठ 33 )
उन्हाळा दुष्काळाच्या वर्णनाप्रमाणे पावसाळयाचे वर्णन …..( पृष्ठ 92- 93 ) देखील लोकजीवनावर प्रभाव गाजविणारेच असे आहे. गोतावळा नारबाची दैनदिनी आहे. त्यावर आघात होतो तेव्हा तो म्हणतो – ‘‘ मोटा हुत्या तवा मला पाटंपासनं गजबजायचा क्षणी अगवाय उठायचं त्यास्नी वैरणी टाकायच्या माझी ष्षेणघाण भरायची गडबड नि ढोरांची गपागपा वैरणी खाऊन मोटला जायची गडबड. दिसांचा गोंडा म्हवराय मोटांची झुम्मड चाकाचा नाद, लावण्या लिकडंतिकडं मारलेला हाका …. असा मळा रामपा-यातच उठून देवाचं नाव घेत उदयोगाला लागलेला. एखादा चिरा प्याला की मग दिसाचं उगवनं. पाटाच्या पाण्यात किरणाच्या आंघुळी …..( पृष्ठ 137 ) स्वाभाविक कृषीजीवनावरचं यंत्र संस्कृतीने आघात केला. ‘‘ ….. सित्या गंग्या यायच बंद होऊन आजचा पाचवा दीस. परवा दिषी मोटपावाणीच्या गळयातला नाडा सोडून काढून तिला न्हवरा बाईगत केलेलं. नाडा सोडून चाककणा,षिवाळ – नाडा समदं खोली लावून मरगळून खोपडयाला रचलेलं. मोटा पारभात आणून बाजूला अंधारात टांगण्याला टांगलेला. आता त्यास्नी कव तर उंदर कुरतडणार. भिंगरीसारख्या फिरलेल्या मोटा आता कायमच्या बंद. ‘‘ …….. आता माझं तोंडबी बंद. नुसतं ड्रायव्हरच्या गत. त्यो सांगल तेवढच करायचं …. ना-या कर, ना-यानं करायचं. ना-या उठ, ना-यानं उठायचं. ना-या बस,ना-यानं बसायचं. समद ड्रायव्हर म्हणल तस……. चाळयाचा एकच पाय मोडला, पर माझ आता हात नि पाय दोन्हीबी काढून घेतली जाणार. ना-या बंद. ( पृष्ठ 141 ) याचा अर्थ असा की मोट नाडा आणि ना-या बंद म्हणजे पारंपारिक गावगाडाच उखडला गेला. ग्रामीण समाजजीवन ढवळून निघाले. बलुतेदारांचा रोजगार बंद झाला. ष्षेवटी तर ‘ सोसंवत नसेल तर तुझी तू वाट धर’ ( पृष्ठ 140 ) असे मालक सांगतो.
आधुनिकीकरणाच्या प्रभावाने ग्रामीण समाज जीवनात झालेल्या बदला संदर्भा डाॅ. रा. भा.मंचरकर म्हणतात- ‘‘भारतीय ष्षेतमजूर अधिक सोषिक, सहिष्णू आणि सौजन्यषील नसते तर मालकाच्या ष्षेतावर आणि जनावरांवर, पिकांवर त्यांचे प्रेम असते. म्हणून बेंदुराच्या दिवषी हालिंग्या बैलाला अंडे देण्यास मालक विरोध करतो, तेव्हा नारबा त्याचा विरोध मोडून काढतो. असे असले तरी मालकाविरुध्द तो विद्राहे कधीच करीत नाही. नारबा संयमी, सहिष्णू आहे. अपवादाने तो ड्रायव्हर दिसतो.’’ समाजव्यवस्थेमध्ये श्रमिक उत्पादकांचा कष्टक-यांचा एक वर्ग आहे. त्याचप्रमाणे अनुत्पादक परोपजींवींचा दुसरा वर्गही आहे. नारबा, गंग्या, सित्या इ. कष्टकरी किंवा गायी, म्हैस, बैल, रेडे इ. उपयुक्त प्राणी हे उत्पादक वर्गाचे प्रतिनिधी आहेत. तर रामू सोनवडे, पाव्हणा, कोल्हे, वानर, गाढव, आणि पक्षी हा अनुत्पादक परोपजीवींचा दुसरा वर्ग आहे. याची जाणीव कांदबरी वाचतांना होते. या संदर्भात प्रा. या. वा. पडस्कर म्हणतात- ‘‘ पाव्हण्यांचे हातपाय बारक्या पोरागत बिनकामानं मऊ मऊ दिसतील.’’ म्हणजे हा ष्षहरी माणूस श्रमिक वर्गातला नसून बांडगूळ दलाल वर्गातला आहे. मालक , दलाल व श्रमिक असे तीन वर्ग या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. परिवर्तनाच्या काळामध्ये कमिषनवर डोळा ठेवून यंत्राचे महत्व ष्षहरातील लोक ष्षेतक-यांना सांगू लागले. पाव्हणा रामू सोनवाडयाला ट्रक्टरच्या षेतीचे महत्व पटवून देतो आणि ट्रक्टर खरेदी करण्यास उदयुक्त करतो. यावरुन यंत्रयुगात धूर्त, हिषोबी आणि स्वार्थी वृत्ती कषी वाढली. ष्षेतक-यांचा उपयुक्ततावादी दृष्टिकोन लेखकाने मालकाच्या रुपाने टिपला आहे. उदाहरणांनी अधिक स्पष्ट सांगता येते. टिक्की म्हैस विकण्याचा मालक निर्णय घेतो, तेव्हा म्हणतो – ‘‘ ती म्हस काढून टाकावी आता, म्हातारी झालीया, नुसती दुधाची म्हस ठेवायची. रिकाम्या वैरणीला, फार ढोर नगंत.’’( पृष्ठ 5 ) ‘‘ आणि रेडयास्नी कषाला वल्ली वैरण टाकलीया ही ? चिपाड घालत चला त्यास्नी, बैलाला तेवढी वल्ली वैरण. एखादी पात काढून घालावी….. असल्या उन्हाळयात वल्ला पाला समदयास्नी काढून ऊस वाळवून घालषील माझा. रेडयास्नी जपून काय वाट घालायच हाईत ? ( पृष्ठ 6 – 7 ) ओपावर आलेल्या पाडीवर चाण्णा सोडायला मालक नकार देतांना म्हणतो – ‘‘ …. पर तसं केल्यावर पुढची वासरं चांगली निपजत न्हाईत म्हणं ’’ ( पृष्ठ 13 ) मारुत्या घोडा विहिरीत पडतो. त्याला वाट करुन वरती काढण्याचा विचार नारबा करतो मालक म्हणतो – ‘‘ …. पर तसं केल्यावरा पुढची वासरं चांगली निपजंत न्हाईत म्हण. खुळा काय ? तेवढया खर्चात दुसरा घोडा येईल. ( पृष्ठ 51) सित्या – गंग्या या मजुरांना मळयात ठेवून नारबा गावात येतो तेव्हा मालक म्हणतो – ‘‘ ….. पंर्पच्याच्या वाडीची माणसं ती, कुठंची कायबी न्हेऊन इकायची ….( पृष्ठ85 ) बेंदराच्या दिवषी म्हालिंग्या बैलाला अंडी पाजण्यास मालक नकार देतो – ‘‘ … आरं, आता काय धन देणार हाय त्यो बैल ? हाड वैकंुठाला गेल्यात की आता त्याची … ( पृष्ठ 85 ) थोरली बैलजोडी विकण्याचा मालक निर्णय घेतांना म्हणतो की – ‘‘ … ठेऊन का अंडी घालणार हाईत ती बैल ? आता उलट त्येंच्या अंगावर मांस चढलाय. बसलेली हाईत,अंगात ताव आलाय. कुणीबी बघितलं तर चार पैसं चढ देईल. उगच सालभर बसवून ठेवण्यात कास फायदा हाय? वैरणीला रिकामाकार( पृष्ठ 114) माळावरील आणि ओढयाचे सर्व झाड तोडल्यानंतर पिंपळ तोडू नये असे नारबाला वाटते. तेव्हा मालक म्हणतो – ‘‘ ठेवून तरी काय फायदा ? ना फळ ना फूल’’( पृष्ठ 132) या सर्व प्रसंगावरुन असे म्हणता येते की या यंत्रयुगात उपयुक्ततावादी आणि प्रत्येक गोष्ट पैषात मोजली जात आहे. त्यामुळे मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण भागातील षेतमजूरांवर रोजगाराचा प्रष्न निर्माण झाला आहे.कोल्हापुरी बोलीतील नारबाच्या स्वगतावरुन बोलीचे स्वरुप हे सभोवतालच्या दैनदिंन जीवनातून साकारलेले असल्याची जाणीव होते. कृषीकेंद्रीत वास्तव हा ग्रामीण भावविष्वाचा गाभा अस्सल कलात्मकतेने व बोलीच्या लयीने अविष्कृत करणारी अव्वल दर्जाची कांदबरी आहे. नारबाचे भावविष्व कोल्हापूर कागल परिसरातल्या ग्रामीण बोलीच्या माध्यमातून लेखकाने यषस्वीपणे उभे केले आहे.
कोल्हापूर बोलीतील अपरिचित आणि नाविण्यपूर्णष्षब्द समाजवास्तवाचे दर्षन घडवितात. हुतावं – ( होते ), दीस कलतीला – ( दिवस मध्यांनावर येणे ), हिरीरिनं ( ताबडतोब / घाईने ), फंुड -( पुढे ), वकोत – ( वेळ ), वंगाळ – ( घाणेरडे ), न्हाई नाही फुडं पुढे बेंदुर पोळा, न्हेवून घेऊन, आगुदर अगोदर म्हसरं म्हषी म्हैनाभर – महिनाभर , गरवार पतीव्रता, ढामीण – धामण, गाभ- गरोदर , लांबपतोर- लांबपर्यंत, निजलो -झोपलो, कवाच- केव्हाच, चिखुल- चिखल, ऊरासंग- छातीषी, न्याहाळलं- पाहणे, ष्षेरडं- ष्षेळी, बकरं- बोकड, ताणली -झोपलो, इचवं – विंचू, घोळका – गर्दी एकबी – एकही, गेल्लं- जाणे, माखलं- पसरणे, मुस्काड – तोंड, पाट – सकाळ, च्या – चहा, हुक्की- आवाज, त्यास्नी- त्यांनी, ईत – इंच, इनाकारण – विनाकारण, माखलेली – भरलेली ष्असे अनेक षब्द कादंबरीला वेगळाच बाज आणतांना दिसतात. आनंद यादवांच्या मते ग्रामीण कादंबरीचे लेखन हे वाचकाला आवडेल असा विचार करुन तिची भाषा नसावी. तर कथानकाच्या मागणीनुसार ती मग बोली असो वा आणखी कोणती याचा विचार न करता लेखन करावे.
गोतावळा कांदबरीचे निवेदन आणि संवाद मुळात बोलीमध्ये आहे. आत्मनिवेदन आणि स्वगत सुध्दा बोलीतूनच लेखकाने रेखाटल्यामुळे कांदबरील घटना वास्तव आणि जिवंत वाटते. निवेदन आणि स्वगत जणू एकजिव होऊन प्रकट झाल्याची जाणीव पदोपदी येतांना दिसते. तसेच म्हणी आणिवाक्प्रचाराचा मोठया खूबीने वापर केला आहे. पोटात षिंग घुसल्यागत होते,मन पिकागत डवरणे,जीव नसल्यागत वाटणे,दोनाचे चार हात करणे,तोंड असून जीभ नसणे,ना फळ ना फूल,दिल्या दामाचे आणि सांगितल्या कामाचे,ना घर ना दार, हत्ती गेला नि षेपूट अडकली, पाणी मणकं मोडलेल्या सापागत चालणे, काळया रानावर हिरवी साय येणे, रावणागतं हात पसरणे, भराला आलेल्या बाईगत फुलणे, गुदगुल्या होणे, पोटात बियाणे पडणे, मोरागत जगणे, जल्माचं वाटुळं होणे, उताणं होणे, भुंडया बाईगत रिकामा दिसणे, नारळाचे तीन तुकडे होणे, पोटात कालीवल्यागत होणे, खुळयात काढणे, सजावारी चैकषी करणे, पाण्याचं वावडं असणे, आतडयात पाल फिरल्यागत वाटणे,तोंडचे पाणी सुटणे, डोळे कोल्हयागतं हलणे, फोडून काढणे, अषा पध्दतीने प्रतिमांच्या साहाय्य् याने केलेली अभिव्यक्ती कादंबरीला अधिक उठावदारपणा आणते.गोतावळयामध्ये नारबाच्या निवेदनाकडे पाहिले असता दैनदिन वापरात ग्राम्य किंवा अष्लील वाटणारे षब्द या कांदबरीत ग्राम्य, अष्लील वाटत नाही. उलट नारबाच्या निवेदनातील वाक्य अष्लीलपणापासून फार दूर घेऊन जातात. निवेदनाषी एकजीव झाल्याची जाणीव होते. नारबाचे अतृप्त मन यातून चित्रित होते. उदा. अंगात ढोरागत रग हाय मला काय वाटतं असल ? का आम्हीबी अंड ढाडविलेला खोडच ! ….. ( पृष्ठ 15 ) बाई नि बापयं एकातच पाहिजे हुतं. किती एकटं -हायचं ?( पृष्ठ 64 ) आयला कावळा नि कावळीण एका जागी दिसत नाहीत. रातचं घरटयात एक हुईत असतील ! ( पृष्ठ 111 ) ‘पाडीची रुखरुख ….. माझ्या का हातात हाय ते ? पाडा असतो तर एक गोष्ट न्यारी – इच्यारानं माझं मलाचं हसू आलं (पृष्ठ 16) ‘माजलेला कोंबडा चिडून जाऊन पोरावरच काय हत्तीवर सुदीक धावून जाईल. माणसागत त्यो काय गप्प बसणार हाय?(पृष्ठ 23 ) ‘आयला, एक बैलबी हुयाला येत नाही…… माणसाच्या बैलाला नेमून दिलेली गाय . म्हंजे आम्हाला दोन्हीकडून चिमटा. माणूस असूनबी जनावरात जगणं,आणि जनावरात जगणं असुनबी जनावर न्हाई.’(पृष्ठ 25) गोतावळयाची भाषा ही प्रतिमांची वाटते. या भाषे मध्ये जषी लय आहे तषी जीवनातील विविध भावसूत्रे टिपण्याची ताकदही आहे. संवेदनाचा,सौंदर्यांचा सुक्ष्म अविष्कार करणारी आहे.
थोडक्यात गोतावळा या कादंबरीचा भाषिक अभ्यास म्हणजे या कादंबरीतील कोल्हापुरी भाषेच्या षब्दांचा, षब्दबंधाचा, वाक्यांचा, निवेदनाचा, संवादाचा, ग्रामीण भागात बोलल्या जाणा-या संवादंाचा, म्हणी व वाक्प्रचारांचा, गावरानं षिव्यांचा, अष्लील व ग्राम्य बोलींचा, समीक्षकांनी मांडलेल्या विचारांचा, प्रतिमा प्रतिकांचा, स्वगताचा, काव्यमयतेचा, सूचकतेचा परामर्ष घेऊन थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.