डॉ. भीमराव रामजी तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तेजस्वी व विजयी जीवन यात्रा म्हणजे एका जन्मजात,
Read More
डॉ. भीमराव रामजी तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तेजस्वी व विजयी जीवन यात्रा म्हणजे एका जन्मजात, स्वयंभू, बुद्धिमान, कर्तृत्वान आणि थोर विचारवंत अशा महामानवाची जनकल्याणकारी राष्ट्रहित कार्य अवघ्या मानवतेच्या भल्याची निस्वार्थ त्यागाची आणि सार्थक समर्पणाची जीवन यात्रा होती. ते अखेरपर्यंत आपल्या जीवन कार्यात मनापासून रममान होते. म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबीया विद्यापीठाने एल.एल.डी. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले. भारतातील हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने डि.लीट पदवी देऊन गौरविले आणि भारत सरकारने भारतरत्न हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन गौरविले. खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वार्थाने महामानवच होते. जगात ज्या प्रकारच्या सद्गुण संपन्नतेमुळे मानव महामानव म्हणून सिद्ध होऊ शकतो, त्या प्रकारच्या सद्गुण संपन्नतेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव म्हणून सिद्ध होऊ शकले आहेत. जगात ज्या प्रकारच्या श्रेष्ठ धैर्याने व अतुल शौर्याने अपयशावरही मात करून मानवलोक कल्याणाच्या व देशहिताच्या सत्कार्यात विजयी होऊन महामानव सिद्ध होतो. त्या प्रकारच्या श्रेष्ठ धैर्याने व अतुल शौर्याने अपयशावरही मात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोककल्याणाच्या व देशहिताच्या सत्कार्यात विजयी होऊन महामानव सिद्ध झाले आहेत. जगात ज्या प्रकारच्या आपल्या थोरपणामुळे मानव महामानव सिद्ध होऊन सदैव स्वतःची व सत्कार्य करीत राहण्याची उदात्त व आनंददायक प्रेरणा देत राहतो, त्या प्रकारच्या आपल्या थोरपणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव सिद्ध होऊन सदैव स्वधाराची आणि सत्कार्य करीत राहण्याची उदात्त व आनंददायक प्रेरणा देत राहिले आहेत.
Show Less