
रुपयाची समस्या त्याचे मुल व त्या वरील उपाय
By Shende Tejaswini
This book is focus on critical analysis of Indian rupees. Also study on rupees from zero to till...
Books Review by Dr.Tejaswini Shende – Khadki Education Society’s Tikaram Jagannath Arts, Commerce & Science College, Khadki, Pune – 411003.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ सन 1923 लंडनमध्ये प्रकाशित केला. सहाजिकच हा ग्रंथ ब्रिटिश सरकार मधल्या मंत्रांनी मसूद्दीवाद्यांनी वाचला. या ग्रंथाने ब्रिटिश सरकारचा खरा चेहरा जगासमोर आला. जागतिकरणामध्ये भारतीय चलन व्यवस्था आज ज्या माणकावर उभी आहे, त्याचे दुष्परिणाम आपणास आजही पहावयास मिळतात. दरवर्षी केंद्र सरकारच्या अंदाज पत्रकात प्रचंड अर्थसंकल्पीय तूट असून ती भरून काढण्यासाठी रिझर्व बँक अधिकाधिक पतपुरवठा करते, दर तीमाहिला भांडवली व्याजाचा दर बदलविते. त्याचा परिणाम प्रचंड भाववाढ आणि महागाई वाढविण्यात होते. भांडवलदार, श्रीमंत व्यापारी, राजकीय नेते, आणि बेधुंद स्वार्थी नीतीमुळे कोट्यावधी रुपयांचा काळा पैसा निर्माण होतो. त्याची दुष्परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागतात आणि अर्थव्यवस्थेतील प्रचंड आर्थिक विषमताचा अनुभव आपणास येतो. या आपल्या देशाला समता, न्याय, बंधुत्व आणि स्वातंत्र आणि विकासाची उंची गाठण्यात अडथळा येतो.
रुपयाची समस्या आणि तिचे मूळ या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय इतिहासात मोगलांच्या कारकिर्दीपासून व्यापार व दळणवळण विषयक कोणते चलन विनिमयासाठी वापरले गेले. ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्यापासून ते सतराव्या शतकापासून ते 1858 पर्यंत, ब्रिटिश सरकारने भारतासाठी वापरलेले चलन 1858 ते 1920 पर्यंत ब्रिटिश सरकारने भारतासाठी जे चलन वापरले त्याची मांडणी केली. तसेच ब्रिटिश सरकारच्या 220 वर्षाच्या कालखंडात चलन पद्धतीमध्ये सोन्याची व रुपयांची नाणी कसे प्रकारात आणि प्रचारात आली. भारताचे रुपयाचे प्रत्येक वेळी बदल करण्याचे काय प्रयोजन आणि भारतीय रुपयाच्या प्रमाण प्रमाणात संबंधी सतत बदलणारे धोरण त्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि याची सविस्तर मांडणी या ग्रंथात केली आहे.
अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर केन्स यांनी आपल्या सिद्धांतात चलन व्यवस्थेमध्ये सुवर्ण (सोन्याचा) विनिमय परिमाण हे फार फलदायी ठरते याविषयी या ग्रंथात विवेचन केले आहे. 180 ग्रॅम वजनाचा चांदीचा नाणी छाप रुपया चलनात आणला आणि चांदी ऐवजी कागदी चलन रुपयाचे चलन सुरू झाले.
केन्सच्या सिद्धांतामध्ये दुसरा महत्त्वाचा घटक रुपयाचा वाटाघाटीचा दर कोणत्या प्रमाणात असावा आणि रुपयाची क्रयशक्ती किती आहे हे ध्यानात घेऊन जोपर्यंत रुपयाची करयोशक्ती वाढत नाही तोपर्यंत रुपयाची मूल्य स्थिर करता येऊ शकत नाही. हे प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून मांडले यावर कितीही टीका जरी झाले असले तरीही आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपया – सोने – चांदी आणि विनिमय दर याचा संबंध या ग्रंथाच्या (पुस्तकांनी) सिद्ध केला आहे.k