लेखक परिचय
रेषा सुरेश ओझरकर
भास्कर तात्याबा चंदनशिव (जन्म: १२ जानेवारी १९४५, हासेगांव-कळंब) हे प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक आहेत.
मुळचे भास्कर देवराव यादव हे दत्तकविधानानंतर भास्कर तात्याबा चंदनशिव झाले.त्यांच्या साहित्यकृतीमध्ये सातत्याने ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक नायकाच्या रूपाने वाचकांच्या समोर येतो. ज्यांची नाळ मातीशी जोडली गेलेली आहे आणि मूळ गावगाड्यात घट्ट रुतलेले आहे. चंदनशिव यांच्या ‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’, ‘अंगारमाती’, ‘बिरडे’, ‘नवी वारुळं’ या कथासंग्रहांचा आवर्जून उल्लेख केला जातो. मानवी समाजजीवनाला व्यापकपणे स्पर्श करणाऱ्या या कथासंग्रहांनी शेती क्षेत्रात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उगवून वर आलेले वेदनेचे कोंब दाखवून देण्याचे काम केले.
कथेचा गाभा
शेतकऱ्यांचे जीवन, त्याचे पिक पाणी, त्यातून उभ्या राहिलेल्या समस्या यावर चंदनशिव यांची कविता भाष्य करते.”
ह्या कथेतून किशोरवयीन शाळकरी मुलाचे भावविश्व आणि शेतमालाचे बाजारभाव या चिरपरिचित विश्वातून एक दाहक वास्तव पुढे येते.अवघ्या एक दिवसाच्या काल्क्रमातून ही कथा शेतकराचे दुख साकार करते.या कथेतील बापू हा दहावीतला मुलगा आहे.त्याचे शेतकरी आई-वडील भाजीपाला बाजारात विक्रीला आणतात. मालाची आवक आधिक झाल्याने भाव पडतात आणि सोन्यासारख्या मालाची माती होते.शेतकऱ्याला योग्य भाव न मिळाल्याने आपला माल रस्त्यावर फेकून द्यावा लागतो. सोन्यासारख्या टमाट्यांचा लाल चिखल होतो.शेतकऱ्यांचे कष्ट, त्यांचे श्रम अश्रूमध्ये परावर्तीत होऊन लाल चिखल होतो. या नित्याच्या वास्तवामागील भावनिक, व्यावहारिक सत्य ही कथा प्रभावीपणे मांडते.शेतकरी हमीभाव, दुष्काळ, सावकार, शासकीय योजना आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा वास्तवाला ही कथा अधोरेखित करते, म्हणून ती समकालीन ठरते.एक दिवसाचा कालक्रम, कमी पात्रे, मोजके घटना-प्रसंग आणि तीव्र होत जाणारा संघर्ष यां मुले हि कथा वाचकाची पकड घेते.
बापू हा मॅट्रिक मध्ये शिकणारा मुलगा आहे. सोमवारी बाजाराच्या दिवशी सकाळी माय आबांनी सांगितल्याप्रमाणे बाजार भाजीपाला विकण्यासाठी जागा पकडायची म्हणून गेला .जागा आढळून प्रत्येकाची लगबग चालू होती बापू हा जागा शोधत होता बाजारात शोधता एक जागा भेटली .बापू ती जागा आडून तिथे त्याच्या आईने कापडात बांधून दिलेली भाकर चटणी दिलेली असते . तो ते कापड घेतो त्या उपायाने मिळालेल्या जागेत हातरून पसरतो. आणि उडू नाही म्हणून त्याच्यावर दगडी ठेवतो त्या जागेवर बसून तो चटणी भाकर खातो बाजारात तो त्याच्या आई-वडिलांची वाट बघत असतो तो त्याच्या मित्राला विचारतो माझे माय आणि आबा दिसले का? बापूचा मित्र त्याला म्हणतो तुला शोधत शोधत खांद्यावरती ओझे घेऊन येत आहे. त्याला त्याचे माय आबा दिसतात त्याच्यासोबत असलेले ओझे घेऊन येतो घेऊन येतो माळवाच्या दुकान मांडतात त्यात गवार कांदा टमाटे विकायला बसतात .
शेतात टमाट्याची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेली असते .बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन झाल्यामुळे टमाट्याला जास्त मागणी नव्हती. टमाटे जास्त असल्यामुळे कमी किमतीने विकली जात होती. आबाला अशी आशा होते की आपण गुंतलेले भांडवल तरी भेटेल या आशेवर तो विकायला सुरुवात करतो .आबा हे मोठ्या मोठ्याने ओरडत होते गावरान टोमॅटो घ्या टमाटी टमाटी ख्याला यला येत होती पण भाव करून परत जात होती. स्वस्त लावली तरी घेत नव्हती माय आबाच्या पोटात अन्नाचा एकही कण नव्हता .बाजार हा मोठ्या प्रमाणात भरला होता लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत होते एकमेकांना माणसे भेटत होती. घ्यायला यायची पण चार अनाने मागायची पण आबा नाह्य व्ह्य करत द्यायची पण ग्राहक अर्धा पावशेरच घेऊन जायचे .
बापू आणि माय हे गवार आणि टमाटे विकत होते. आबा हे बापूला ओरडत होते ही शांत बसू नको काहीतरी बोल त्याशिवाय गिऱ्हाईक येणार नाही बापूला ओरडायला लाज वाटत होती. कारण की त्याला शाळेतले मित्र मैत्रिणी ओळखीची माणसे भेटत होती. पण बापूचा नाईलाज असल्यामुळे त्याला ते करावे लागत होते तो डोळे बंद करून ओरडत होता गवार घ्या गवार म्हणून दिवस हा संपत चालला होता. मावळत चालला होता. अंधार पडत चालला होता एका माणसाने तर हद्दच पार केली टमाटे ही फुकट देतो का असे विचारले आबा हे त्या माणसावरती खूप चिडले तो माणूस निघून गेला आबांना खूप राग आला होता .त्यांनी रागानी टमाटे ही रस्त्यावर फेकली आणि त्याचा ढिंग लावला आबां चे हे डोळे पाणवले होते. पाणवल्या डोळ्यांनी त्यांनी मनगट हे तोंडावर मारून जोरजोराने ओरडून रडू लागले रस्त्यावर फेकलेला टमाट्याचा ढिंग कचाकचा चिडू लागले. टमाटे ही लाल चिखलासारखी चिडून टाकली.
…… आबा लालीलाल टमाटेच्या चिखलात कव्हरच्या कव्हर नाचतच होते.