
विज्ञानाच्या उज्वल वाटा
पुस्तकाचे नाव : विज्ञानाच्या उज्वल वाटा
लेखक : डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम आणि सृजनपाल सिंग
Book Reviewed by : गोराडे सानिका शिवाजी
वर्ग : S.Y.B.C.S.
College : GMD Arts, BW Commerce & Science College, Sinnar Dist. Nashik
भारताचे माजी राष्ट्रपती, जेष्ठ शास्त्रज्ञ आणि मुलांचे लाडके शिक्षक डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम आणि विख्यात तरुण लेखक सृजनपाल सिंग यांनी सखोल संशोधनातून हे पुस्तक साकारले आहे. यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अतुलनीय कामगिरीने आपण काय साध्य केले आहे व त्याचे आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार याची रंजक माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकातून त्यांनी भविष्यकालीन विज्ञानाचा, त्यातील क्षेत्रांचा वेध घेऊन त्याच्या विषयीचं व्यापक चित्र आजच्या विद्यार्थ्यांपुढे उभं केल आहे. तसंच भविष्यात विज्ञानात मोठ्या प्रमाणावर विकसित होणाऱ्या रोबोटिक्स, एरोनॉटिक्स, स्पेस सायन्स, न्यूरो सायन्स यांसारख्या ‘आऊट ऑफ द बॉक्स’ करिअर्सच्या सहज सोप्या भाषेत, पण सखोल परिचय करून दिला आहे.
रोबोट हा माणसासारखाच दिसतो. बहुतेकदा हे रोबोट दोन पायांवर उभे राहतात. त्यांना दोन हात असतात आणि ते कोपरापाशी वाकू शकतात. आधुनिक तंत्रज्ञानाने आजवर आपण बऱ्याच गोष्टी साध्य केल्या असल्या, तरी अजूनही आपल्याला निसर्गापासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि त्यातून अनेक गोष्टींमध्ये दुरुस्त्याही करता येण्यासारखा आहेत. रोबोटिक्स ही विज्ञान आणि तंत्रज्ञानातली सर्वात नाविन्यपूर्ण अशी शाखा आहे .जर तुमच्या पाल्याला या क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर तो किंवा ऑटोमोबाईल म्हणजेच कार्स-बाईक्स यांसारखी कंपन्यांसाठी काम करू शकतो. रोबोटिक इंजीनियरिंग हा विषय शिकवण्यासाठी ही शैक्षणिक क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध आहे. भारतातील तसेच परदेशातील मोठ-मोठे विद्यापीठे आता रोबोटिक्स बाबत संशोधन करणारी केंद्र उभारत आहेत. उडण्याबद्दल माणसाला नेहमीच एक आकर्षण वाटत आलं आहे. रामायणामध्ये ‘वायुयान’ या नावाच्या विमानाचा उल्लेख आहे. आधुनिक काळातही विज्ञान ही वातावरणाच्या दुसऱ्या स्तरातूनही म्हणजे स्त्रेटोसफियर मधून म्हणजे स्तरावरणातून प्रवास करू शकतात. बऱ्याच जेट इंजिनांची विमान ही 32 ते 35 हजार फुटांवर उडतात.
विमान विशिष्ट अशा पेट्रोलियमच्या इंधनांवर चालत, त्याला ‘एव्हिएशन फ्युएल’ म्हणजे विमानाचे इंधन असे म्हणतात. इंधन हे शुद्ध हवं, त्यात इंजिन किंवा इतर भागांमध्ये अडकतील असे कोणतेही कण असायला नकोत कारण विमाने हे भाग फार संवेदनशील असतात. जर का इंधनात काही अशुद्धता असेल तर ते धोक्याचं ठरू शकतं. तंत्रज्ञान कितीही प्रगती झाली असली, तरी अजूनही विमानाला उड्डाण करताना आणि खाली उतरताना म्हणजे लँडिंग करताना मोठ्या प्रमाणात इंधन लागत. सर्वसाधारणपणे, स्थानिक म्हणजे डोमेस्टिक विमान एक लिटर इंधनात 230 मीटर प्रवास करू शकते. 2000 सालापासून या प्रमाणात ४० टक्क्यांनी वाढ झाली. मानवी मेंदूच सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, तो दीर्घकालीन आठवणी साठवून ठेवू शकतो . प्रामुख्याने त्या प्रिंफटल कॉन्टॅक्टमध्ये साठवल्या जातात. एका प्रौढ माणसाच्या मेंदूतला सगळा डेटा टीव्हीवर द्यायचा असल्यास आपल्याला 26 लाख डीव्हीडी लागतील. गेल्या पाच वर्षांमध्ये या विषयावर बरेच संशोधन झालेलं असून अजूनही बराच संशोधन सुरू आहे.