वैदर्भिक प्रादेशिक जीवन रेखाटणारी कादंबरी - झेलझपाट

झेलझपाट

Share

वैदर्भीय प्रादेषिक जीवन रेखाटणा-या लेखकांमध्ये गो. नि. दांडेकर, उध्दव षेळेके, बाबाराव मुसळे, पुरुषोत्तम बोरकर, भालचंद्र नेमाडे, प्रभाकर पाध्ये, अरुण साधू यांच्याइतकाच ताकदीने लेखन करणारा लेखक आहे. ‘झेलझपाट’ ही मधुकर वाकोडेंची पहिलीच कांदबरी असून विदर्भातील पष्चिमेला परतवाडयाच्या पुढे पसरलेल्या जंगलातील ‘कोरकू’ या आदिवासी लोकांच्या जीवनातील व्यथांची ही कथा आहे. ‘झेलझपाट’ ही कांदबरी 98 पृष्ठांची असून एकूण 15 प्रकरणात विभागलेली या कादंबरीची पहिली आवृत्ती इ.स. 1988 मध्ये प्रकाषित झालेली आहे. दुसरी आवृत्ती 1992 मध्ये, तिसरी आवृत्ती 1996 मध्ये, चैथी आवृत्ती 1997 मध्ये, पाचवी आवृती 2004 मध्ये प्रकाषित करण्यात आली. सदर कादंबरीला इ.स.1989 मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार मिळालेला असून या कादंबरीचे प्रकाषन देषमुख आणि कंपनी पब्लिषर्स प्रा. लि. ने प्रकाषित केले आहे. या कादंबरीचे मुखपृष्ठ अनघा निगवेकर यांनी आषयाला अनुरुप असे चित्रांकन केलेले असून आदिवासीचे जीवनाषयाला अभिव्यक्त करते. कादंबरीच्या आतील भागामध्ये आषयानुरुप रेखाचित्र मा. अरुण मोरघडे यांनी रेखाटले असून आषयाला अधिक उठावदारपणा देण्यात अधिक यषस्वी झालेले आहे.

‘झेलझपाट’ ही कादंबरी आदिवासींच्या जीवनाची परवड सांगणारी असून आजच्या व्यवहारी जगात सरकारी उपक्रमातून चालवलेल्या सोसायटयामधून वाकडया मार्गाने आपआपल्या तुमडया भरणारे षेठ लोक व निरक्षर आदिवासींना आर्थिक व्यवहारात फसवून व्याज बट्टा करणारे, त्यांच्या मालावर झडप घालणारे व्यापारीही येथे दिसतात. त्यामुळे सर्वत्र विरोधी अषा परिस्थितीत अक्षरओळख झालेला आणि आपली लुबाडणूक होते आहे हे समजणारा एकटा केरु या सर्वांचा षत्रू बनणे स्वाभाविकच आहे. लाचार मोपाला दारु आणि लालपरिची चटक लावणारा आणि फुलयसारखी कोवळी काकडी गिळू पाहणारा कामांध कासम तर अषा वातावरणात असणारच ! कोरकूंवर बाहय मूल्ये चढविलेली नाहीत. माणसातला माणूसच त्याला जाणवलेल्या मूल्यांची जपवणूक करतो, प्रसंगी त्याची त्यागाचीही तयारी असते. केरु आणि फुलय यांच्या प्रेमाची ही भावकथा. आजच्या स्त्री मुक्तीच्या काळात फुलय आणि केरु मधील लांबजाना राहण्यासंबंध्ीचा झगडा पुष्कळ गोष्टी सांगून जातो. घरात घुसण्याचे स्वांतत्र असून फुलय केरुच्या घरात कधीच घुसली नाही. आणि केरु लांबजाना होवून फुलयला कधीच मिळवू षकला असता पण तरुण, सळसळत्या रक्ताचा, नव्या जाणीवा घेऊन आलेल्या केरुला लांबजाना होणं परवडत नव्हतं. त्यांना जातीजमातीचे बंधन नव्हते. बंधन होते त्याच्या मनाचे. त्याची प्रेमकहाणी अधुरी, अपुरी चूटपुट लावणारी आणि तरीही स्वतःची मूल्ये जपणारी आणि त्यासाठी लागणारी किंमतही चुकविणारी आहे. जातीरिवाजाच्या विरुध्द आपआपल्या मूल्यकल्पना सांभाळतांना दोघेही जवळ असून दूर राहतात. त्या दोघांनाही आपल्या बावनकषी प्रेमाची कल्पना नाही. त्याचे मोठेपण नाही इतकी ती दोघे निसर्गासारखी सरळ आहेत. आणि त्यांचा झेल घेणारा व त्यांना झपाटणारा हा समाज त्यातील दृष्टप्रवृत्ती याही तितक्याच स्वार्थी माणसाइतक्याच वाकडयातिकडया त्यात हाव आहे, लालसा आहे. लाचारी आहे, फसवणूक आहे. ज्ञानाची भीती आहे. झेलझपाट ही फक्त केरु आणि फुलयची प्रेमकहाणी नसून अनेक बाबतीत विचार करायला प्रवृत्त करणारी ही कादंबरी आहे.

कोरकूंची स्वंतत्र अषी कोरकू भाषा आहे. कोरकूंना षिकविले जाते ते मराठीतून. त्यामुळे निजभाषेची फारकत घेऊन मराठीतून षिक्षण घेणं कोरकू मुलांना जड जातं. आणि कोरकुंच्या पिढयां न् पिढया षिक्षणापासून वंचित होता. कोरकूंची भाषिक व्यथा सांगतांना मधुकर वाकोडे म्हणतात की ‘‘ अख्या कोरकू ढाण्यात मॅट्रिकपर्यंत षिकलेला तो केरु, परतंु केरुलाही षिकवतांना उल्हास कसा तो वाढला नाही.ष्षेवटी मॅट्रिक नापास होऊन उदास झाला. घरी बसला. क्रित्येकदा पुस्तक पुढयात घेऊन बसला की त्याला प्रष्न पडे भाषेचा. वस्तीत आपापसात लोक बोलतात ते कोरकू भाषेत. इतर जांगडयाषी बोलतात ते रांगडया हिंदीत पण पुस्तक मात्र मराठीत. सारचं अपरिचित असं का ?……. कोरकंूजवळ संवाद साधण्यासाठी भाषाच नाही.

‘झेलझपाट’ या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेचा वेध घेतांना असे दिसून येते की, वाकोडंेना कोरकूंच्या जीवनाविषयी केवळ सहानुभूतीचं नाही, तर त्यांच्या मानसिक,षारीरिक, आर्थिक अत्याचाराची आणि दुःखाची मुळंसुध्दा त्यांना उघडयावर ठेवावयाची आहेत. त्यांनी आपल्या व्यावहारिक अनुभवांना कलात्मक रुप देण्यासाठी, कलात्मक रचनातत्वाची मांडणी करुन उच्च पातळीवरचा कलात्मक अनुभव मांडला आहे.’

थोडक्यात असे सांगता येईल की कांदबरीची भाषिक संरचना दुहेरी असल्याचं सतत जाणवतं. कुठे भाषा वास्तवाला स्पर्ष करते तर कुठे कलात्मकतचा सोस बाळगते. भाषिक माध्यमातून अविष्कृत होणा-या भाषाद्रव्यात काव्यात्मकता, प्रतिके, प्रतिमा, उपमा यांची प्रचंड रेलचेल दिसून येते. यामुळे कादंबरीतील भाषेच्या वास्तवाचा सूर नाहक हरवला जातो. ही बाब सोडली तर भाषिक सर्जनाचे असंख्य अविष्कार झेलझपाट मध्ये अभिव्यक्त झाले आहेत.

Original Title

वैदर्भीय प्रादेषिक जीवन रेखाटणारी कादंबरी : झेलझपाट

Subject & College

Publish Date

1988-01-01

Published Year

1988

Country

India

Readers Feedback

वैदर्भीय प्रादेषिक जीवन रेखाटणारी कादंबरी : झेलझपाट
Vishnu Rathod

Vishnu Rathod

January 23, 2025

Submit Your Review